Ayurveda fruits Rules : फळांचे सेवन करताय? मग, आधी आयुर्वेदाने सांगितलेले ‘हे’ नियम जाणून घ्या!

Harshada Bhirvandekar

|

Updated on: Apr 09, 2021 | 12:18 PM

फळांचे सेवन करणे शरीरासाठी सर्वात निरोगी मानले जाते. परंतु फळे योग्यप्रकारे खाल्ल्यासच आपण त्याचा पुरेपूर फायदा घेऊ शकतो. म्हणून, फळे खाण्याची योग्य वेळी आणि योग्य मार्ग माहित असणे फार महत्वाचे आहे.

Ayurveda fruits Rules : फळांचे सेवन करताय? मग, आधी आयुर्वेदाने सांगितलेले ‘हे’ नियम जाणून घ्या!
फळे खाण्याच्या योग्य पद्धती
Follow us

मुंबई : फळं ही एक अशी गोष्ट आहे, ज्यामध्ये बरीच खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात, जी सर्वसाधारणपणे मानवी शरीरासाठी आवश्यक असतात, या बद्दल आपल्याला बहुदा माहितीच नसते. जर एखादी व्यक्ती अन्न सोडून केवळ फळे खात असेल, तर ती आपले संपूर्ण आयुष्य सहजपणे जगू शकेल. एकाच फळाच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीस जीवनसत्त्वांसह भरपूर प्रमाणात पाणी, कार्बोहायड्रेट, फॅटी अॅसिडस्, अमीनो अॅसिडस् मिळतात (Know the Ayurveda rules to eat fruit for more benefits).

फळांचे सेवन करणे शरीरासाठी सर्वात निरोगी मानले जाते. परंतु फळे योग्यप्रकारे खाल्ल्यासच आपण त्याचा पुरेपूर फायदा घेऊ शकतो. म्हणून, फळे खाण्याची योग्य वेळी आणि योग्य मार्ग माहित असणे फार महत्वाचे आहे. आयुर्वेदानुसार फळे खाण्याचे काही नियम आहेत. फळं खाताना आपण कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी ते आज आपण जाणून घेऊया…

गोड नसलेली फळं दुधामध्ये मिसळू नका

आयुर्वेदानुसार, जी फळे गोड नसतात, ती दुधात मिसळू नयेत. ज्या फळांमध्ये कमी आम्ल असते, ते दूध देखील खराब करतात. उदाहरणार्थ, बेरी दुधात घालू नयेत. केळी गोड असली तरी, त्यामध्ये दूध मिसळता कामा नये, कारण केळीत काही प्रमाणात अ‍ॅसिड असते. दुधाबरोबर एकत्रितपणे त्याचा प्रभाव बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण करतो. हे पोटासाठी आणि पचनासाठी खूप जड होते.

जेवणानंतर लगेचच फळ खाऊ नका

आयुर्वेदानुसार जेवणानंतर लगेचच फळांचे सेवन करू नये. मग, ते आपण दिवसा कोणत्याही वेळी खाल्लेले जेवण असो. अशावेळी फळांचे सेवन केल्यामुळे अन्न पचवण्यात अडचण निर्माण होते. जेवणानंतर लगेच फळ खाणं तुमच्या पाचन तंत्रावर परिणाम करते. यामुळे आम्लपित्त, गॅस आणि अपचनाची समस्या उद्भवते (Know the Ayurveda rules to eat fruit for more benefits).

फळांसह भाज्या खाऊ नका

आयुर्वेदानुसार शिजवलेल्या अन्ना बरोबर कच्चे अन्न खाऊ नये. म्हणूनच शिजवलेल्या भाज्यांबरोबर कच्चे फळ खाल्ल्यास शरीराला नुकसान होऊ शकते. फळे आणि भाज्या वेगवेगळ्या वेगाने पचतात. म्हणून दोन्ही एकत्र सेवन करणे, हा आरोग्याच्या दृष्टीने योग्य मार्ग नाही.

कधीही फळांचा पॅक्ड रस घेऊ नका

नैसर्गिक गोडपणा आणि फळांची चव ही त्यांची सर्वात पौष्टिक गोष्ट आहे. तर, बाजारात विकल्या जाणाऱ्या फळांच्या रसात कृत्रिम गोड पदार्थ असतात. आयुर्वेदानुसार आपण पॅक उघडल्यानंतर लगेचच तो रस पिणे आवश्यक आहे. तो साठवून ठेवल्यास त्यातील पोषक घटक नाहीसे होतात आणि त्यामध्ये अ‍ॅसिड देखील तयार होते.

दिवसाच्या वेळी फळे खा

आयुर्वेदानुसार फळांचे सेवन करण्याचा उत्तम काळ म्हणजे दिवस. लिंबूवर्गीय फळे वगळता बहुतेक फळे रिक्त पोटी खाल्ली जाऊ शकतात. यात केळी, नाशपाती आणि पीच इत्यादींचा समावेश आहे. विशेषत: सफरचंद सकाळी खाल्ले जावे, कारण ते पेक्टिन समृद्ध आहे, जे आपल्या आतड्यांना निरोगी ठेवण्यास मदत करते.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Know the Ayurveda rules to eat fruit for more benefits)

हेही वाचा :

Health Tips :  हाडे नेहमी मजबूत ठेवायचीत? मग, आहारात नक्की सामील करा ‘हे’ 5 सुपरफूड्स

Health Tips | मासिक पाळीच्या वेदनेत आराम मिळवून देतील ‘हे’ पदार्थ! अशा प्रकारे करा सेवन

Non Stop LIVE Update

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI