AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Do You Know : जाणून घ्या का करतात लहान मुलांचे जावळ?, काय आहेत याचे फायदे?

जावळ केल्याने मुलाला जन्माच्या वेळी आढळणाऱ्या अशुद्धतेपासून मुक्त केले जाते तसेच त्याचबरोबर त्याचे मेंदू खूप वेगवान काम करते. (know why little babies get their mundan, know what is benefits)

Do You Know : जाणून घ्या का करतात लहान मुलांचे जावळ?, काय आहेत याचे फायदे?
जाणून घ्या का करतात लहान मुलांचे जावळ?
| Updated on: Mar 22, 2021 | 8:02 PM
Share

मुंबई : आपल्या समाजात लहान मुलांचे जावळ करण्याची पद्धत प्रचलित आहे. मूल काही महिन्यांचे किंवा एक वर्षाचे झाले की त्याचे जावळ केले जाते. ही प्रथा बर्‍याच काळापासून चालू आहे. वास्तविक जावळ संस्कार हा हिंदू धर्मात वर्णन केलेल्या सोळा संस्कारांपैकी एक मानला जातो. असे मानले जाते की जावळ केल्याने मुलाला जन्माच्या वेळी आढळणाऱ्या अशुद्धतेपासून मुक्त केले जाते तसेच त्याचबरोबर त्याचे मेंदू खूप वेगवान काम करते. (know why little babies get their mundan, know what is benefits)

जाणून घ्या जावळ करण्याचे फायदे

1. असे मानले जाते की जेव्हा बाळ आईच्या गर्भाशयात असते तेव्हा बरेच हानिकारक बॅक्टेरिया त्याच्या डोके आणि केसांमध्ये जातात जे सहजपणे बाहेर पडत नाहीत. जन्माच्या वेळेस बाळाचे डोके अतिशय नाजूक असल्याने त्या वेळी त्याचे केस काढले जाऊ शकत नाहीत. वयाच्या एक वर्षाच्या आसपास, त्याचे डोके टणक होते. म्हणूनच, वयाच्या एक वर्षानंतर किंवा मुलाचे जावळ झाल्यानंतर, त्याची अशुद्धता काढून टाकली जाते.

2. असेही मानले जाते की मुलाचे जावळ केल्यामुळे डोक्याचे तापमान नियंत्रित राहते. जावळमुळे बाळाला थेट व्हिटॅमिन डी मिळते. अशावेळी त्याचा मेंदू खूप वेगवान काम करतो. यामुळे मेंदूचा विकास देखील चांगल्या प्रकारे होतो. याच कारणामुळे प्राचीन काळी मुलांना गुरुकुलमध्ये शिक्षण देण्यासाठी पाठवले जात होते तेव्हा त्यांचे केस काढून टाकले जात होते.

3. जर आपण आपल्या घरातील एखाद्या सदस्यास विचारले जावळ का केले जाते तर केस चांगले येतात असे बहुतेक उत्तर मिळेल. हे बर्‍याच प्रमाणात सत्य देखील आहे कारण बाळाला जन्मताच जे केस मिळतात ते खूप कमकुवत आणि हलके असतात. जावळ केल्यावर केसांची वाढ चांगली होते आणि मजबूत केस बाहेर येतात. हेच कारण आहे की केसांची वाढ सुधारण्यासाठी काही लोक अनेक वेळा केसांचे मुंडन करतात.

4. जावळ केल्याने मुलाला खाज सुटणे, फोड येणे आणि डोक्यात येणाऱ्या पुरळपासून देखील संरक्षण मिळते. बर्‍याच ठिकाणी जावळ दरम्यान, डोक्याच्या मध्यभागी एक छोटीसी शेंडी सोडली जाते, जी मेंदूवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य करते. (know why little babies get their mundan, know what is benefits)

इतर बातम्या

Corona Vaccine : ‘कोव्हिशिल्ड’च्या 2 डोसमधील अंतर वाढवलं, केंद्र सरकारची नवी गाईडलाईन्स

चांगली बातमी! होळीच्या आधीच सोने स्वस्त, पटापट तपासा 10 ग्रॅम सोन्याचा दर

राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.
भाजपात नाराजी, कुणाला डावललं तर कुणाचं तिकीट कापल्यानं डोळ्यात पाणी
भाजपात नाराजी, कुणाला डावललं तर कुणाचं तिकीट कापल्यानं डोळ्यात पाणी.
भाजपात AB फॉर्मवरून नाराजी, कार्यकर्त्यांकडून जिल्हाध्यक्षांचा पाठलाग
भाजपात AB फॉर्मवरून नाराजी, कार्यकर्त्यांकडून जिल्हाध्यक्षांचा पाठलाग.
भाजपचे प्रवीण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरेकर निवडणुकीच्या रिंगणात
भाजपचे प्रवीण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरेकर निवडणुकीच्या रिंगणात.
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?.
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद.
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ.
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?.
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?.