AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईतील सर्वात मोठे शॉपिंग मार्केट, जिथे अतिशय स्वस्त दरात मिळतात ट्रेंडी कपडे

मुंबईत अनेक शॉपिंग मार्केट आहेत. पण कोणत्या मार्केटमध्ये स्वस्त आणि मस्त कपडे मिळतील याबद्दल अनेकांना माहिती नसतं... त्यामुळे मुंबईत सर्वात स्वस्त आणि मस्त शॉपिंग मार्केट कुठे आहेत जाणून घ्या...

मुंबईतील सर्वात  मोठे शॉपिंग मार्केट, जिथे अतिशय स्वस्त दरात मिळतात ट्रेंडी कपडे
Shopping Market
| Updated on: Dec 08, 2025 | 4:19 PM
Share

प्रत्येक मुलीसाठी एक समस्या म्हणजे… माझ्याकडे घालण्यासाठी चांगले कपडे नाहीत… एखाद्या ड्रेसवर फोटो काढल्यानंतर पुन्हा त्येच कपडे घालायला देखील अनेक मुलींना कंटाळा येतो… अशात मुलींना शॉपिंग करण्यासाठी मुंबईत असे काही मार्केट आहेत जिथे स्वस्त, मस्त आणि ट्रेंडी कपडे मिळतात. जर तुम्हाला मुंबईत ट्रेंडी कपडे आणि अ‍ॅक्सेसरीज स्वस्त दरात मिळणारे बाजार शोधायचे असतील तर काही मार्केटमध्ये नक्की जा… जेथू तुम्हाला चांगले आणि स्वस्त कपडे मिळतील…

लिंकिंग रोड – या मार्केटमध्ये कपडे, बूट्स, बॅग्स, अ‍ॅक्सेसरीज सगळं कही कमी दरात आणि व्यवस्थित मिळतं. बजेट मधल्या दरात पण ट्रेंडी वस्तू तुम्हाला या मार्केटमध्ये मिळतील. जर तुम्ही कॉलेजमध्ये जात असाल आणि जीनस, टॉप्स, कॅज्युअल वेअर शोधत असाल, तर हा मार्केट खूप चांगला आहे.

हील रोड – वांद्रे येथील हे मार्केट फार प्रसिद्ध आहे. वेस्टर्न कपडे, कॅज्युअल व पार्टी वेअर, फूटवेअर आणि अ‍ॅक्सेसरीझसाठी तरुणी मार्केटमध्ये जातात. या भागात फार इतकी गर्दी नाही, त्यामुळे काहीशी शांत वातावरणात खरेदी करता येते. ट्रेंडी पण बजेटमध्ये कपडे हवे असल्यास हा एक चांगला पर्याय आहे.

फॅशन स्ट्रीट – याठिकाणी तब्बल 150-300 पेक्षा अधिक स्टॉल्स आहेत. जेथे तुम्हाला ट्रेंडी टी-शर्ट्स, जीन्स, पार्टी वेअर, कॅज्युअल कपडे खूप स्वस्त दरात मिळतील… पण काही वेळा क्वॉलिटी चेक करणं फार महत्त्वाचं आहे. काही कपडे फक्त काही दिवस वापरण्यासाठी असू शकतात.

क्रॉफोर्ड मार्केट – क्रॉफोर्ड मार्केट जवळपास 150 वर्ष जुनं मार्केट आहे. या मार्केटमध्ये कपडे आणि फॅशनच्या गोष्टींसाठी प्रसिद्ध नाही. तर या मार्केटमध्ये स्वयंपाकघर आणि जीवनशैलीशी संबंधित गोष्टी, होम डेकॉरसाठी लागणाऱ्या गोष्टी मोठ्या प्रमाणात दिसून येईल.

चोर बाजार – तुम्हाला तुमच्या घराला आकर्षक लूक द्यायचा असेल तर चोर बाजार तुमच्यासाठी योग्य आहे. इतर मार्केटच्या तुलनेत इथल्या वस्तू थोड्या महाग असतील, पण तुम्हाला इथे मिळणाऱ्या गोष्टी इतर कोणत्याही मार्केटमध्ये मिळणार नाहीत. येथे तुम्हाला होम डेकॉरसाठी लागणारे दिवे, फोटो फ्रेम्स, फर्निचर आणि अशा अनेक गोष्टी मिळतील. ज्यामुळे तुमचं घर अधिक आकर्षक वाटेल…

लोखंडवाला मार्केट – मुंबईमधील लोखंडवाला मार्केट देखील फार मोठं मार्केट आहे. याठिकाणी महिलांसोबतच पुरुषांसाठी देखील कपडे, फोन अक्सेसरीज मिळतात. येथे तुम्हाला अतिशय स्टायलिश कपडे मिळू शकतात याठिकाणी मुलांसाठीही खरेदीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. जर तुम्हाला खरेदीसोबतच खाण्यापिण्याची आवड असेल तर येथे तुम्ही स्वादिष्ट खाद्यपदार्थ आणि पेये, चाट, पाणीपुरी, लस्सी इत्यादींचा आनंद घेऊ शकता.

'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'.
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश.
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?.
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले.
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं.
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल.