AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुरुष या ५ कारणांसाठी करतात लग्न, चौथे कारण जाणून बसेल धक्का !

विवाह ही तशी खाजगी बाब आहे, त्यामागे अनेक भावना जोडलेल्या असतात. शादी वो लड्डू है जो खाए वो पछताए जो ना खाए वो भी पछताए...असे असले तरीही पुरुष मंडळी काही ठराविक गणितं पाहून लग्न करतात. आपल्या भारतीय समाजात राहण्यासाठी विवाह ही संस्था कुटुंब पद्धतीत महत्वाची असली तरी अनेक जण लग्नाविना देखील एकटे राहून लाईफ एन्जॉय करीत आहेत.

पुरुष या ५ कारणांसाठी करतात लग्न, चौथे कारण जाणून बसेल धक्का !
| Updated on: Jan 30, 2025 | 8:24 AM
Share

आजकाल एकटे राहण्याचा मार्ग देखील अनेक तरुण आणि तरुणी निवडत आहेत. कारण विवाहामुळे त्यांचे स्वातंत्र्य धोक्यात येईल असे त्यांना वाटत आहे.त्यांना त्यांच्या जीवनाचा आनंद म्हणजे एखाद्या विकेण्डला कोणत्याही कटकटशिवाय मित्रांसोबत पार्टी करीत एन्जॉय करणे यालाच महत्व आले आहे. परंतू प्रत्येक पुरुष असा विचार करीत नाही. तरीही बऱ्याच लोकांना आता कमिटमेंट नको आहे. आणि मजेशीर गोष्ट म्हणजे जे पुरुष लग्नापासून दूर पळत असतात. ते देखील एका क्षणी राजीखुशी या लग्नाच्या बेडीत स्वत:हून अडकण्यासाठी एका पावलावर तयार होताना दिसतात. अखेर असे काय असते की पुरुष लग्नासाठी मोटीव्हेट होतात ? या मागची कारणे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत.

प्रेम आणि जीवनभराचा साथीदार हवा –

पुरुष यासाठी लग्न करतात की त्यांना कधीच प्रेमाची उणीव भासू नये आणि जीवनभर एक विश्वासार्ह साथीदार मिळावा. वास्तविक हे लग्न करण्याचे सर्वात बेसिक कारण आहे. त्यामुळे महिला देखील विवाहासाठी प्रेरित होत असतात. कारण लग्न ही एकमेव अशी गोष्ट आहे, जी दोन प्रेमाने भारलेल्या दोन जीवांना एकत्र रहाण्यासाठी प्रेरित करते.तसेच एकट्याने जीवनातील प्रत्येक मोसमातून प्रवास करणे खूपच कठीण आणि दुखदायी असते. अशात एकटे राहण्याची भीती देखील पुरुषांना लग्नासाठी प्रेरणा देत असते.

दूसऱ्यांना आनंदी करण्यासाठी –

अनेकदा पुरुष केवळ यासाठी लग्नासाठी तयार होतात, कारण ते घर, समाज वा प्रेयसीच्या वारंवार सेटल होण्याच्या सल्ल्यांनी कंटाळून जातात. त्याशिवाय त्यांना कधीच वाटत नाही की लग्न करणे गरजेचे आहे.त्यामुळे दुसऱ्यांच्या दबावाखाली येऊन लग्न करणारे पुरुष आपल्या वैवाहिक जीवनाला सर्वसाधारणपणे एन्जॉय करु शकत नाहीत.

स्वत:ची फॅमिली बनविण्यासाठी –

महिलांनासाठी मुल दत्तक घेणे किंवा सिंगल पेरेंट बनणे खूपच सोपे आहे. परंतू पुरुष असे करु शकत नाही. पुरुषांना आपले कुटुंब तयार करण्यासाठी नेहमीच महिलेची गरज असते, जी कायदेशीररित्या त्याची पत्नी असेल.अशात ज्या पुरुषांना मुलं आवडतात, आणि जे नेहमी आपल्या छोट्या कुटुंबाचे स्वप्न पाहात असतात, त्यांना लग्न करण्यात कोणतीही अडचण वाटत नाही.

जादा पैशाची बचत करण्यासाठी –

‘डीबंकिंग द बॉल एंड चेन मिथ ऑफ मॅरिज फॉर मॅन’ नावाच्या एका अभ्यासानुसार लग्न झालेले पुरुष सिंगल रहाणार्‍या पुरुषांपेक्षा जास्त कमवितात आणि अधिक बचत करतात. या अभ्यासात असेही स्पष्ट झाले आहे की लग्न झालेल्या पुरुषाची कमाई १० -२४ टक्क्यांपर्यंत वाढते. तसेच कायदेशीर रित्या देखील लग्न झालेल्या व्यक्तीला अनेक फेड्रल बेनिफिट्स देखील मिळतात.

स्टेटस मेन्टेन राखण्यासाठी –

पुरुष महिलांच्या तुलनेत कंमी इमोशनल असतात. त्यामुळे त्यांच्यासाठी पॉवर आणि त्यांचे स्टेटस खूप महत्वाचे असते. ते लग्न देखील यासाठी करतात की ते आपल्या कुटुंबाच्या लाईफस्टाईलने आपले स्टेटस दाखवू शकतील आणि त्याला वाढवू शकतील.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...