पवित्र जल आणि येशूचं लॉकेट, दोन लाखाचे नाइकीचे 'जीजस शूज' क्षणार्धात खपले

नाइकी कंपनीने नुकतंच 'नाइकी एअर मॅक्स 97 स्नीकर्स' लाँच केले. या शूजच्या सोलमध्ये पवित्र जॉर्डन नदीचं पाणी असल्याचा दावा केला जात आहे. पवित्र जल असलेल्या हे 'येशू लिमिटेड एडिशन स्नीकर्स' बाजारात येताच ते एका मिनिटाच्या आत सोल्ड आऊट झाले.

Nike Jesus Shoes, पवित्र जल आणि येशूचं लॉकेट, दोन लाखाचे नाइकीचे ‘जीजस शूज’ क्षणार्धात खपले

मुंबई : खेळाचं समान बनवणारी जगातील लोकप्रिय आणि प्रसिद्ध कंपनी नाइकीने नव्या शूजचं एडिशन लाँच केलं आहे (Nike Jesus Shoes). हे शूज बाजारात येताच हाहाकार माजला. कंपनीने नुकतंच ‘नाइकी एअर मॅक्स 97 स्नीकर्स’ लाँच केले. या शूजच्या सोलमध्ये पवित्र जॉर्डन नदीचं पाणी असल्याचा दावा केला जात आहे (Holy Jordan River Water).

पवित्र जल असलेल्या हे ‘येशू लिमिटेड एडिशन स्नीकर्स’ बाजारात येताच ते एका मिनिटाच्या आत सोल्ड आऊट झाले (Nike Jesus Shoes). पवित्र जल असलेल्या या स्नीकर्सची किंमत तब्बल 3,000 डॉलर्स म्हणजेच जवळपास दोन लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.

Nike Jesus Shoes, पवित्र जल आणि येशूचं लॉकेट, दोन लाखाचे नाइकीचे ‘जीजस शूज’ क्षणार्धात खपले

ब्रुकलीन येथील मिसचीफ यांनी डिझाईन केलेले हे ‘येशू शूज’ (Nike Jesus Shoes) हे मुख्यकरुन पांढऱ्या रंगाचे आहेत आणि यामध्ये सोलच्या जागी एक आकाशी रंगाची पारदर्शक पट्टी लावण्यात आली आहे, अशी माहिती फॉक्स न्यूजने दिली.

या शूजमध्ये बायबलची प्रकरणंही लिहिण्यात आली आहेत, असाही दावा केला जात आहे. यामध्ये मॅथ्यू 14:25 सारखं विशेष प्रकरण लिहिण्यात आलं आहे. यामध्ये ईसा मसिहच्या रक्ताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी कशाप्रकारे येशू एका रक्ताच्या थेंबावर पाण्यावर चालतात हे सांगण्यात आलं आहे, असाही दावा केला जात आहे.

या कॉन्सेप्टचे सध्या काहीच शूज तयार करण्यात आले होते. भविष्यात यावर जास्त काम करण्याची सध्या कुठलीही योजना नाही, असं कंपनीचे हेड ऑफ कॉमर्स डेनिअल ग्रीनबर्ग यांनी सांगितलं.

नाइकी कंपनीचा हा नवीन शूज ईसाई समाजाच्या भावना दुखवू शकतो. कारण या शूजवर येशू दाखवण्यात आले आहेत. त्यामुळे या शूज नव्या वादाला तोंड फूटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *