AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्वचा थंड ठेवणारं पेपरमिंट फेस मास्क कसं बनवायचं? काय फायदे?

आज आम्ही तुमच्यासाठी पुदिना फेस मास्क बनवण्याची पद्धत घेऊन आलो आहोत. पुदिना उन्हाळ्यात त्वचेला थंडावा देतो. त्वचेला हायड्रेट करण्यासाठी दही उपयुक्त ठरते. इतकंच नाही तर त्वचेतील लालसरपणा किंवा खाज सुटण्याची समस्याही दूर होते.

त्वचा थंड ठेवणारं पेपरमिंट फेस मास्क कसं बनवायचं? काय फायदे?
Mint facemask
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: May 09, 2023 | 4:45 PM
Share

मुंबई: पेपरमिंट एक वनस्पती आहे जिच्यात ताजेपणा असतो. याच पेपरमिंटला आपण पुदिना म्हणतो. पुदिन्यापासून चटणी खाणे लोकांना सहसा आवडते. पण तुम्हाला हवं असेल तर त्वचेची काळजी घेण्यासाठी पुदिन्याचाही समावेश करू शकता. आज आम्ही तुमच्यासाठी पुदिना फेस मास्क बनवण्याची पद्धत घेऊन आलो आहोत. पुदिना उन्हाळ्यात त्वचेला थंडावा देतो. त्वचेला हायड्रेट करण्यासाठी दही उपयुक्त ठरते. इतकंच नाही तर त्वचेतील लालसरपणा किंवा खाज सुटण्याची समस्याही दूर होते. हे आपल्या त्वचेला एक्सफोलिएट करते. रोज रात्री हा फेस मास्क लावल्याने त्वचेवर जमा झालेली सर्व धूळ आणि घाण सहज दूर होते, तर चला जाणून घेऊया पेपरमिंट फेस मास्क कसा बनवावा.

पेपरमिंट फेस मास्क बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • दही 2 चमचे
  • पुदिन्याची पाने 10-12 बारीक चिरून

पेपरमिंट फेस मास्क कसा बनवावा?

  • पेपरमिंट फेस मास्क बनवण्यासाठी तुम्ही सर्वप्रथम पुदिन्याची पाने घ्या.
  • मग त्यांना धुवून चांगले बारीक करा किंवा पेस्ट तयार करण्यासाठी बारीक करा.
  • त्यानंतर या पेस्टमध्ये 2 चमचे दही घाला.
  • मग नीट मिक्स करून गुळगुळीत पेस्ट बनवा.
  • आता तुमचा पुदिन्याचा फेस मास्क तयार आहे.

पेपरमिंट फेस मास्क कसा वापरावा?

  • पुदिन्याचा फेस मास्क लावण्यापूर्वी चेहरा धुवून पुसून घ्यावा.
  • त्यानंतर फेस मास्क संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर चांगला लावा.
  • यानंतर ते चेहऱ्यावर लावा आणि सुमारे 20 मिनिटे कोरडे होऊ द्या.
  • नंतर थंड पाण्याने चेहरा धुवून स्वच्छ करावा.
  • चांगल्या परिणामांसाठी आठवड्यातून 3 वेळा हा मास्क वापरून पहा.
  • हा फेस मास्क लावल्याने तुमच्या चेहऱ्याचा थकवा दूर होईल.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)

Follow Us
CBSE च्या पोर्टलवर मोठ्या सायबर हल्ल्याचा प्रयत्न, फक्त दोनच मिनिटांत
CBSE च्या पोर्टलवर मोठ्या सायबर हल्ल्याचा प्रयत्न, फक्त दोनच मिनिटांत.
कचऱ्याने हैराण नागरिक आक्रमक; MIDC कार्यालयाबाहेर टाकला कचऱ्याचा ढीग,
कचऱ्याने हैराण नागरिक आक्रमक; MIDC कार्यालयाबाहेर टाकला कचऱ्याचा ढीग,.
ठाकरेंचा विश्वासू नेता हे काय बोलून गेला, बड्या खासदाराविषयी केलं सूचक
ठाकरेंचा विश्वासू नेता हे काय बोलून गेला, बड्या खासदाराविषयी केलं सूचक.
महागाईविरोधात ठाकरे सेनेचा एल्गार! भायखळ्यात रस्त्यावर उतरले शिवसैनिक
महागाईविरोधात ठाकरे सेनेचा एल्गार! भायखळ्यात रस्त्यावर उतरले शिवसैनिक.
आता हातभट्टीला सरकारने थेट...पुण्याच्या दारुकांडानंतर रामदास आठवलेंची
आता हातभट्टीला सरकारने थेट...पुण्याच्या दारुकांडानंतर रामदास आठवलेंची.
विखे लवकरच भिकेला लागणार, संजय राऊतांचा विखे-पाटलांवर घणाघात
विखे लवकरच भिकेला लागणार, संजय राऊतांचा विखे-पाटलांवर घणाघात.
सर्वात मोठी घडामोड! 447.27 कोटींचा तो आदेश रद्द... रिलायन्सला सर्वोच्च
सर्वात मोठी घडामोड! 447.27 कोटींचा तो आदेश रद्द... रिलायन्सला सर्वोच्च.
NEET घोटाळ्याविरोधात रस्त्यावर उतरली युवा काँग्रेस; सरकारविरोधात....
NEET घोटाळ्याविरोधात रस्त्यावर उतरली युवा काँग्रेस; सरकारविरोधात.....
काँग्रेसची शाल घालून सुप्रिया सुळेंच स्वागत; म्हणाल्या, माझा काँग्रेस
काँग्रेसची शाल घालून सुप्रिया सुळेंच स्वागत; म्हणाल्या, माझा काँग्रेस.
लाडक्या बहिणींनी लगेच लक्ष द्या! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय
लाडक्या बहिणींनी लगेच लक्ष द्या! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय.