विरुष्काप्रमाणे पहिल्यांदाच ‘पालक’ बनताय? मग ‘या’ टिप्स खास तुमच्यासाठी…

आपणसुद्धा पहिल्यांदाच पालक बनणार असाल तर, आपल्याला पालकत्वाबद्दल पूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे. अन्यथा, आपण अशा चूक करू शकता, ज्यामुळे आपले किंवा आपल्या बाळाचे नुकसान होऊ शकते.

विरुष्काप्रमाणे पहिल्यांदाच ‘पालक’ बनताय? मग ‘या’ टिप्स खास तुमच्यासाठी...
विराट-अनुष्काच्या लेकीचं ‘वमिका’ नामकरण

मुंबई : पहिल्यांदाच ‘पालक’ बनण्याचा आनंद मोठा असतो, पण त्याचबरोबर बर्‍याच अनेक जबाबदाऱ्याही येतात. जेव्हा जोडप्यांना पहिल्यांदाच मूल होते, तेव्हा त्यांना बर्‍याच गोष्टी माहित नसतात आणि अनवधानाने त्यांच्याकडून बर्‍याच चुका होतात, जे स्वाभाविक आहे (Parental Tips For New Parents Or Parents To Be).

आपणसुद्धा पहिल्यांदाच पालक बनणार असाल तर, आपल्याला पालकत्वाबद्दल पूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे. अन्यथा, आपण अशा चूक करू शकता, ज्यामुळे आपले किंवा आपल्या बाळाचे नुकसान होऊ शकते.

घाबरून जाऊ नका.

जेव्हा आपल्या मुलाला दुधाच्या उलट्या होतात, तेव्हा पालक प्रचंड घाबरून जातात. बाळाला नेमकं काय होतंय, हे पालकांना कळत नाही. नेमक्या गोष्टी माहित नसल्याकारणाने ते खूप घाबरतात.

बहुतेकदा, जोडपे मुले झाल्यावर त्याच्या गोष्टी समजून घेण्यासाठी प्रथम वर्षभर वेळ घेतात. तथापि, या प्रकरणात आपण वृद्ध व्यक्तीचा किंवा आपल्या आईचा सल्ला घेऊ शकता. बाळ उलटी का करत आहे, आणि अशा कोणत्या गोष्टी सामान्य आहेत, हे त्यांना चांगलेच माहित असते. त्यामुळे आपण घाबरून जाऊ नये.

बाळ रडण्याचा अर्थ काय?

पहिल्यांदाच पालक झाल्यावर प्रत्येक जोडप्यास असे वाटते की, आपल्या बाळाने अजिबात रडू नये. मात्र, बोलणे सुरु होईपर्यंत बाळ रडून आपली मतं व्यक्त करत. अशा परिस्थितीत जेव्हा मूल रडते, तेव्हा पालकांना भीती वाटते. त्यांना वाटते की, आपणच काही चूक केली आहे.

बाळ रडून सर्व काही सांगण्यास सक्षम आहे, म्हणून आपल्याला हळू हळू स्वत:ला तयार करावे लागेल, जेणेकरून आपल्या मुलाच्या रडण्याचे कारण आपण समजू शकाल. चुकीच्या पद्धतीने डायपर बांधणे, पुरळ उठणे, पोटदुखीमुळे देखील बाळ रडू शकते (Parental Tips For New Parents Or Parents To Be).

रात्री जागे राहण्याची तयारी ठेवा!

तुम्ही ऐकले असेलच की, मुलाचा जन्म झाल्यानंतर,  पालकांची झोप उडून जाते. अशावेळी प्रसूतीपूर्वी भरपूर झोपे घ्यावी आणि या मोठ्या बदलासाठी स्वत:ला उत्तम रित्या तयार करावे. दर अर्ध्या तासाने बाळाला भूक लागते आणि ते रात्री दूध प्यायला जागे होते. यावेळी आईलासुद्धा मुलाला स्तनपान देण्यासाठी पुन्हा पुन्हा उठावे लागते. आपण यासाठी मानसिकदृष्ट्या स्वत:ला आधीच तयार करा.

जोडीदाराकडे दुर्लक्ष करू नये.

नवजात बाळाची काळजी घेताना, हे लक्षात ठेवणे खूप महत्वाचे आहे की पालक होण्याच्या जबाबदारीत, आपल्या नाते-संबंधात दुरावा येऊ नये. आता आपणास पालक, तसेच पती किंवा पत्नी होण्याची जबाबदारी देखील स्वीकारावी लागेल. जर आपण आपल्या बाळाची काळजी घेण्यासाठी दिवसाचे 10 तास खर्च करत असाल, तर आपल्या जोडीदारास कमीतकमी अर्धा तास देण्याचा प्रयत्न करा. हे आपण दोघांमधील प्रेम आणि नाते टिकवण्यास उपयुक्त ठरेल.

चुकीचे सल्ला टाळा.

बाळ जन्माला आले की, नातेवाईक वेगवेगळे सल्ले द्यायला सुरु करतात. त्याच वेळी, काही पालक काही चुकीच्या लोकांकडून देखील सल्ला घेतात. यातच ते काही चुका देखील करतात. पालकत्वाच्या सल्ल्याबद्दल आपण खूप सावध असणे आवश्यक आहे आणि आपल्याला माहिती स्त्रोत मिळणे आवश्यक आहे. अन्यथा आपल्याला किंवा बाळाला त्रास होऊ शकतो.

(Parental Tips For New Parents Or Parents To Be)

हेही वाचा :