बटाट्याचे साल फेकून देताय? थांबा, अगोदर वाचा…

टाटाची भाजी घरातील लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच आवडते. ज्या लोकांना हिरव्या पालेभाज्या खायला आवडत नाहीत

बटाट्याचे साल फेकून देताय? थांबा, अगोदर वाचा...
बटाट्याचे साल

मुंबई : बटाटाची भाजी घरातील लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच आवडते. ज्या लोकांना हिरव्या पालेभाज्या खायला आवडत नाहीत, ते आपले संपूर्ण आयुष्य फक्त बटाटे खाऊन घालवतात. बटाटे देखील आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का? नुसते बटाटेच नसून बटाट्यांचे साल देखील आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायद्याचे आहेत. (Potato peel is beneficial for the skin)

-नितळ व सुंदर त्वचा मिळवण्यासाठी सर्व प्रथम एक छोटा कच्चा बटाटा घ्या आणि स्वच्छ धुऊन त्याची साल काढा. यानंतर बटाटा किसून घ्या. बटाटा किसताना त्याचा रस देखील निघेल, तो फेकू नका. बटाट्याच्या रसामध्ये अर्धा चमचा गुलाब पाणी मिक्स करा आणि बाजूला ठेवून द्या. आता आपला चेहरा पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावा. यानंतर किसलेला बटाटा आपल्या चेहऱ्यावर लावा आणि चेहऱ्याचा १० मिनिटे हलक्या हाताने मसाज करावा. चेहऱ्यासह तुम्ही आपल्या मानेवरही बटाटा लावू शकता.

-जर आपले केस पांढरे असतील आणि केसांना रंग करायचा असेल, तर आपण बटाट्याचे साल वापरू शकता. बटाट्याच्या सालाची एक वाटी अर्धा लिटर पाण्यात उकळा आणि जेव्हा हे पाणी आटून केवळ, चार ते पाच चमचे शिल्लक राहील तेव्हा आच बंद करून, थंड होऊ द्या. थंड झाल्यावर ते केसांच्या मुळांवर लावा. काही वेळाने केस स्वच्छ धुवा.

-कधीकधी डोळ्याखाली डार्क सर्कल्स येतात. या समस्येवर मात करण्यासाठी आपण डोळ्याखाली बटाट्याची साल वापरू शकता. बटाटाची साल बारीक करून त्याचा रस काढा आणि कापसाच्या सहाय्याने डार्क सर्कल्सवर लावा. आपण आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा रस त्वचेवर लावू शकता.

संबंधित बातम्या : 

Skin Care | सणासुदीच्या काळात ‘या’ चार गोष्टी मुरुमांपासून सुरक्षित ठेवतील!

Health | केसांपासून ते पायाच्या नखांपर्यंत, शरीरातील अनेक समस्यांवर गुणकारी ‘कांदा’!

(Potato peel is beneficial for the skin)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI