कोरोनाशी दोन हात करताय? मग, सकाळी रिकाम्या पोटी ‘हे’ पेय नक्की प्या

कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. कोरोनाचा सामना करण्यासाठी शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीची मोठी भूमिका आहे.

कोरोनाशी दोन हात करताय? मग, सकाळी रिकाम्या पोटी 'हे' पेय नक्की प्या

मुंबई : कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. कोरोनाचा सामना करण्यासाठी शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीची मोठी भूमिका आहे. जर रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असेल तर कोरोनासारख्या रोगाचा सामना करणे देखील सोपे जाईल. रोगप्रतिकारक शक्ती चांगली करण्यासाठी, लोक सर्व प्रकारचे उपाय करत आहेत. आज तुम्हाला एक खास पेय सांगणार आहोत. जे दररोज सकाळी रिकाम्या पोटी पिल्ल्यास केवळ तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होत नाहीतर, कोरोना सारख्या आजारातूनही तुम्ही लवकर बरे व्हाल. (Sip this drink on an empty stomach to overcome corona)

तयार करण्याची पध्दत
प्रथम एक ग्लास पाणी घ्या. त्यात 6-7 काळी मिरी घाला आणि बारीक करा. तुळशीची पाने घ्या, ती धुवून घ्या. तुळसीच्या पानाचे तुकडे करा आणि या पाण्यात घाला. आल्याचा एक तुकडा घ्या आणि तो बारीक करून घ्या. हे सर्व मंद आचेवर हळूहळू उकळू द्या. हे उकळले की त्यात नंतर एक चतुर्थांश चमचा हळद घाला आणि उकळी येऊ द्या. यानंतर एका भांड्यात हे गाळून घ्या. त्यात अर्धा लिंबू घालून एक चमचा मध मिसळा. यानंतर, चहासारखे प्या…

रिकाम्या पोटी पिण्याचे फायदे
हे पेय रिकाम्या पोटी प्यायला पाहिजे. रिकाम्या पोटी पिल्यामुळे हे शरीरात अधिक चांगले कार्य करते. त्यात असलेले आले, तुळस, काळी मिरी आणि हळद, खोकला आणि कफ काढून टाकण्यासाठी कार्य करते आणि हळद शरीरात उपस्थित बॅक्टेरियांची लढण्याची शक्ती वाढवते. कोरोना कालावधीत हे पेय आपल्या दैनंदिन आहारात समाविष्ट करा. हे पेय कोरोनामुळे त्रस्त रूग्णांसाठीच फायदेशीर ठरते आणि कोरोनापासून बचाव करण्यासाठी उपयुक्त मानले जाते. या व्यतिरिक्त खोकला, सर्दी आणि ताप यासाठी देखील हे पेय फायदेशीर आहे.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Sip this drink on an empty stomach to overcome corona)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI