AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता ओपीडीसाठी हॉस्पिटलमध्ये रांगेत उभं राहण्याची गरज नाही; जाणून घ्या कसं करायचं घरबसल्या बुकिंग ?

अनेक वेळा लोक सकाळपासून हॉस्पिटलमध्ये रांगेत उभे राहतात. पण आता तुम्ही या पोर्टलवर जाऊन आपल्या जवळच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये प्रीबुक करू शकता. तर कोणते आहे हे पोर्टल कसं काम करते याची माहिती जाणून घ्या सविस्तर

आता ओपीडीसाठी हॉस्पिटलमध्ये रांगेत उभं राहण्याची गरज नाही; जाणून घ्या कसं करायचं घरबसल्या बुकिंग ?
| Edited By: | Updated on: Jun 27, 2025 | 6:16 PM
Share

आजही अनेक नागरिक सरकारी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर दाखवण्यासाठी पहाटेपासून रांगेत उभं राहतात. अनेक वेळा तर रांगेतील गर्दीमुळे संपूर्ण दिवस वाया जातो, पण डॉक्टरकडे पोहोचता येत नाही. ही अडचण लक्षात घेऊन केंद्र सरकारने वर्षांपूर्वीच एक सोपी आणि डिजिटल सोय उपलब्ध करून दिली आहे, परंतु दुर्दैवाने अजूनही अनेकांना याबाबत माहिती नाही.तर चला जाणून घेऊ काय आहे ही सोय आणि ती लोकांकरिता कशी कां करते

ORS पोर्टल

सरकारी रुग्णालयात ओपीडी बुकिंगसाठी आता https://ors.gov.in/indexH.html या पोर्टलचा वापर केला जातो. हे ORS (Online Registration System) पोर्टल संपूर्ण भारतासाठी एकसारखे आहे. याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या राज्यातील किंवा शहरातील कोणत्याही सरकारी हॉस्पिटलमध्ये ओपीडी अपॉइंटमेंट सहजपणे घेऊ शकता.

ऑनलाइन अपॉइंटमेंट घेण्याची स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया

स्टेप – 1 सर्वप्रथम https://ors.gov.in/indexH.html या संकेतस्थळावर जा.

स्टेप – 2 ‘Book Appointment Now’ या पर्यायावर क्लिक करा.

स्टेप – 3 येथे तुम्हाला राज्य आणि हॉस्पिटल निवडण्याचा पर्याय दिला जाईल.

स्टेप – 4 हॉस्पिटल निवडल्यानंतर, तुम्ही “फिजिकल अपॉइंटमेंट” किंवा “टेलीकन्सल्टेशन” यापैकी एक पर्याय निवडू शकता.

पहिल्यांदा registration करत असल्यास या स्टेप फाॅलो करा

स्टेप – 1 जर तुम्ही प्रथमच हॉस्पिटलमध्ये जात असाल, तर “New Registration” या पर्यायावर क्लिक करा.

स्टेप – 2 त्यानंतर संबंधित विभाग निवडा – उदा. कानाच्या समस्येसाठी ENT, डोळ्यांसाठी Ophthalmology इ.

स्टेप – 3 शेवटी तारीख व वेळ निवडा आणि अपॉइंटमेंट कन्फर्म करा.

एम्स आणि आर्मी हॉस्पिटल्ससाठीही अपॉइंटमेंट

हेच पोर्टल एम्स (AIIMS) आणि आर्मी हॉस्पिटल्समध्ये अपॉइंटमेंट घेण्यासाठीही वापरता येतं. त्यामुळे देशभरातील महत्त्वाच्या वैद्यकीय संस्थांमध्येही ही सोय एकसंध केली आहे.

या सुविधेचा फायदा

ही सुविधा विशेषतः ज्येष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती, महिलांसाठी आणि दूरगामी ग्रामीण भागात राहणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरते. वेळ वाचतो, रांगेचा त्रास टाळतो आणि अगोदरच अपॉइंटमेंट मिळाल्याने डॉक्टरकडून योग्य वेळेत तपासणी मिळते.

महत्त्वाचं म्हणजे

यापुढे सरकारी हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी रांगेत उभं राहण्याची गरज नाही. फक्त काही क्लिकमध्ये तुम्ही तुमची अपॉइंटमेंट निश्चित करू शकता. ही सुविधा पूर्णतः मोफत असून, ती वापरणे अत्यंत सोपे आहे. आता गरज आहे फक्त जागरूकतेची!

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.