AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तंदुरी चिकनला वाचवण्याच्या प्रयत्नात लागला ‘बटर चिकन’ चा शोध, कसा ते वाचा…

आज आपण चवीने 'बटर चिकन' डीशचा आस्वाद घेत असतो. परंतू या बटर चिकन डीशचा शोध एका अपघाताने लागला हे तुम्हाला माहिती आहे का ?

तंदुरी चिकनला वाचवण्याच्या प्रयत्नात लागला 'बटर चिकन' चा शोध, कसा ते वाचा...
Butter Chicken History
| Updated on: Apr 22, 2026 | 11:43 AM
Share

Butter chicken history: प्रोटीनसाठी फिटनेस प्रेमी उकडलेले चिकन खाणे पसंद करतात. परंतू जेव्हा चवीची गोष्ट येते तेव्हा लोक नेहमी बटर चिकन खाणे खूप पसंद करतात. बटर चिकनचे नाव घेताच तोंडाला पाणी सुटते. परंतू तुम्हाला माहिती आहे का या डीशला पहिल्यांदा कोणत्या शाही किचनमध्ये नव्हे एका जुगाडमुळे या डीशचा शोध लागला. नॅशनल जिओग्राफीकच्या मते डीशचा इतिहास १९४० च्या दशकात पेशा ( पाकिस्तान ) आणि नंतर दिल्लीच्या दरियागंजशी जोडलेला आहे. ही केवळ एक डीश नाही तर त्या काळातील कहानी आहे जेव्हा साहित्याच्या कमतरतेमुळे सुख्या चिकनला नवे रुप द्यायचे होते.

पाकिस्तान ते दिल्लीपर्यंतचा प्रवास..

नॅशनल जिओग्राफीकच्या मते पहिल्यांदा बटर चिकन तयार करणाऱ्या व्यक्तीचे नाव कुंदन लाल गुजराल होते. त्यांनी आपले पहिले रेस्टॉरंट ‘मोती महल’ १९२० च्या दशकात पेशावर मध्ये उघडले होते. यानंतर १९४७ मध्ये जेव्हा देशाची फाळणी झाली तेव्हा कुंदन लाल गुजराल पेशावर सोडून दिल्लीला आहे होते. त्यांनी आपल्या पहिल्या रेस्टॉरंटमध्ये पहिल्यांदा चिकनला भाजण्याची सुरुवात केली होती आणि ते तंदुरी चिकन नावाने प्रसिद्ध झाले. १९४७ पासून आतापर्यंत सुमारे ८ दशके झाली आहेत आणि त्यांची रेसिपी प्रत्येक ठिकाणी मोठ्या चवीने खाल्ली जाते.

कुंदन लाल गुजराल जेव्हा दिल्लीला आहे तेव्हा त्यांनी दरीयागंज येते मोती महल नावाच्या एका नव्या रेस्टॉरंटची सुरुवात केली. त्यांच्याकडे त्यांच्या खास तंदुरी चिकनची खूप मागणी होती. परंतू एक समस्या होती ती ही की चिकनला तंदुरमध्ये भाजल्यानंतर जर ते लागलीच विकले गेले नाही तर सुकून कडक व्हायचे. अशात ग्राहकांना सुखलेले चिकन वाढणे गुजराल यांना चांगले वाटत नव्हते.

कुंदन लाल गुजराल यांनी चिकनला सुखण्यापासून वाचवण्यासाठी एक नवा मार्ग शोधून काढला. त्यांनी टॉमेटो, लोणी, क्रिम आणि काही मसाल्यांचे एक मिश्रण तयार केले आणि सुखलेल्या तंदुरी चिकनच्या तुकड्यांना त्या मखमली ग्रेव्हीत टाकले.

याचा परिणाम हा झाला की सुखून कडक झालेले चिक पुन्हा नरम आणि रसदार झाले. यानंतर त्यांनी खूप सारे लोणी ( बटर ) टाकले आणि त्याची टेस्ट खूप वाढली. आणि केवळ चिकन वाचवण्याच्या या जुगाडामुळे बटर चिकनच्या रुपात हे समोर आले. आज बटर चिकन केवळ भारतातच नाही जगात प्रसिद्ध आहे.

डीश हळूहळू सामान्य लोकांपर्यंत पोहचली

मोती महलच्या वेबसाईटवर उपलब्ध माहितीनुसार ही डीश हळूहळू सामान्य लोकांपर्यंत पोहचली आणि सर्वांना खूपच पसंद पडू लागली. पंडित जवाहरलाल नेहरु पासून रिचर्ड निक्सन पर्यंतच्या नेत्यांनी मोती महलच्या बटर चिकनची टेस्ट घेतली आहे. आज बटर चिकन केवळ भारतातच नाही, तर न्यूयॉर्क पासून लंडनपर्यंतचे मेन्यूची शान आहे. ८० वर्षांपूर्वी टोमॅटो आणि लोण्यासोबत केलेला हा छोटासा प्रयोग आज भारतीय जेवणातील सर्वात मोठी ओळख बनली आहे.

Follow Us
रोहित पवारांच्या आंदोलनाकडे शेतकऱ्यांची लढाई म्हणून पहा, कारण...
रोहित पवारांच्या आंदोलनाकडे शेतकऱ्यांची लढाई म्हणून पहा, कारण... जरांगे पाटलांनी नेमकं काय म्हटलं?
जरांगे पाटलांची रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भेट, दोघांमध्ये...
जरांगे पाटलांची रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भेट, दोघांमध्ये महत्त्वाची चर्चा; काय घडलं?
'या' लास्ट सर्टिफिकेटची मला गरज होती, अखेर त्या प्रकरणावर CM
Video | 'या' लास्ट सर्टिफिकेटची मला गरज होती, अखेर त्या प्रकरणावर फडणवीसांचा राऊतांना मिश्कील टोला
मोठी अपडेट! रोहित पवारांची तब्येत खालावली तर पत्नी कुंती यांना अश्रू
मोठी अपडेट! रोहित पवारांची तब्येत खालावली तर पत्नी कुंती यांना अश्रू अनावर, व्हिडीओ आला समोर
ठाकरे गटाच्या बैठकीनंतर मोठी घडामोड! खासदार आष्टीकरांची पत्राकार परिषद
ठाकरे गटाच्या बैठकीनंतर मोठी घडामोड! खासदार आष्टीकरांची पत्राकार परिषद अन् तो व्हिडीओ.. पहा नेमकं काय घडलं?
ठाकरे गटाची बैठक संपली; कोण उपस्थित कोण नॉट रिचेबल, संजय राऊतांनी सगळं
ठाकरे गटाची बैठक संपली; कोण उपस्थित कोण नॉट रिचेबल, संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
NCP नेते जितेंद्र आव्हाड अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
NCP नेते जितेंद्र आव्हाड अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
पुण्यात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून थेट पर्जन्य यज्ञ; व्हिडीओ व्हायरल
Pune News | पुण्यात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून थेट पर्जन्य यज्ञ; व्हिडीओ तुफान व्हायरल
बीड पुन्हा हादरलं! मारहाणीनंतर इतका रक्तस्त्राव झाला की...विवाहितेसोबत
बीड पुन्हा हादरलं! मारहाणीनंतर इतका रक्तस्त्राव झाला की... विवाहितेसोबत भयंकर घडलं; अनैतिक संबंधामुळे...
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा'त मोठा भुकंप?