चांगल्या आरोग्यासाठी तुम्ही देखील जास्त बदाम खात असाल तर होऊ शकतात हे दुष्परिणाम

side effects of almonds : बदाम खाण्याचा सल्ला डॉक्टर देत असतात. त्याचे तसे अनेक चांगले फायदे देखील आहेत. पण तुम्हाला माहित आहे की, प्रमाणापेक्षा जास्त बदाम खाल्याने त्याचे दुष्परिणाम देखील होऊ शकतात. कोणते आहेत ते दुष्परिणाम जाणून घ्या.

चांगल्या आरोग्यासाठी तुम्ही देखील जास्त बदाम खात असाल तर होऊ शकतात हे दुष्परिणाम
Follow us
| Updated on: Jan 26, 2024 | 9:04 PM

almonds side effects : आपण सर्वांनी ऐकले असेल की बदाम खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात. हे खरे देखील आहे. पण असे असले तरी देखील कोणतीही गोष्ट प्रमाणातच खायला हवी. लहानपणापासून मुलांना बदाम खायला दिले जातात. त्याचे तसे आरोग्यदायी फायदे दखील आहेत. आपल्या मेंदूला तीक्ष्ण ठेवण्यापासून ते हृदय निरोगी ठेवण्यापर्यंत अनेक फायदे होतात. पण याचा अतिरेक तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. त्याचे काही तोटेही आहेत.

पचन समस्या

जास्त बदाम खात असाल तर त्याने पचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. यातील उच्च फायबरमुळे गॅस आणि पोट फुगणे अशा समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

ऍलर्जी

तुम्ही जर जास्त बदाम खाल्ले तर त्यामुळे ऍलर्जी देखील होऊ शकते. बदामाच्या ऍलर्जीमुळे मळमळ, पुरळ, श्वास घेण्यास त्रास, उच्च रक्तदाब आणि सूज येऊ शकते.

मुतखडा

बदामामध्ये ऑक्सलेट आढळते ज्यामुळे ते जर तुम्ही जास्त प्रमाणात खाल्ले तर ऑक्सलेटची पातळी वाढते. ज्यामुळे किडनी स्टोन होऊ शकतो. त्यामुळे बदाम मर्यादित प्रमाणातच खा.

जास्त प्रमाणात व्हिटॅमिन ई

जास्त बदाम खाल्ल्याने व्हिटॅमिन ई ची विषबाधा देखील होऊ शकते. ज्यामुळे अतिसार, पोटात पेटके आणि इतर पाचन समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

वजन वाढणे

जास्त प्रमाणात जर बदाम खात असाल तर याने तुमचे वजन ही वाढू शकते. यात मोठ्या प्रमाणात कॅलरी असतात. ज्याने वजन वाढते.

पोषक तत्वांची कमतरता

बदामामध्ये फायटिक नावाचे ऍसिड असते. हे शरीरातील महत्त्वपूर्ण खनिजे आणि पोषक तत्वांचे शोषण करण्यात अडथळा आणू शकते. अशा परिस्थितीत बदाम जास्त प्रमाणात खाल्ल्याने कॅल्शियम, लोह आणि झिंकसारख्या पोषक तत्वांची कमतरता निर्माण होऊ शकते.

बदान कसे खावे

बदाम जर भिजवून खालले तर त्याचा दुप्पट फायदा होऊ शकतो. भिजवून खालले तर त्यामुळे ते पचनाचा सोपे असतात. रात्री पाण्यात भिजवून सकाळी तुम्ही ते खाऊ शकता.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.