Healthy Fruit : विचित्र दिसणारे हे फळ आहे या रोगांवर गुणकारी, पुरुषांसाठीही आहे वरदान

रामबूटनचे सेवन केल्याने आपल्याला अनेक फायदे मिळतात आणि बऱ्याच आजारांपासून आपला बचाव होऊ शकतो. (This strange looking fruit is a cure for these diseases, it is also a boon for men)

Healthy Fruit : विचित्र दिसणारे हे फळ आहे या रोगांवर गुणकारी, पुरुषांसाठीही आहे वरदान
विचित्र दिसणारे हे फळ आहे या रोगांवर गुणकारी

मुंबई : निसर्गाने आपल्याला स्वाद आणि आरोग्यासाठी परिपूर्ण अशी अनेक फळे दिली आहेत. त्यापैकीच एक फळ म्हणजे रामबूटन. लिंबूच्या आकाराचे आणि लिचीप्रमाणे लाल केस असणारे हे फळ आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. हे फळ केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू या दक्षिणेक भारतातील राज्यांत सहजपणे आढळू शकते. या फळाची चव हलकी गोड आणि आंबट आहे. हे फळ लहान दिसत असले तरी त्यात भरपूर व्हिटॅमिन-सी असते. हे खाल्ल्याने रोग प्रतिकारशक्ती वाढते आणि शरीरातील विष बाहेर पडते. रामबूटनचे सेवन केल्याने आपल्याला अनेक फायदे मिळतात आणि बऱ्याच आजारांपासून आपला बचाव होऊ शकतो. (This strange looking fruit is a cure for these diseases, it is also a boon for men)

रक्तवाहिन्या आणि रक्तपेशींचे आरोग्य सुधारते

100 ग्रॅम रामबूटनमध्ये सुमारे 84 कॅलरीज आढळतात. फळाच्या एका सर्विंगमध्ये केवळ 0.1 ग्रॅम फॅट असते. त्यात 0.9 ग्रॅम प्रथिने देखील असतात. 100 ग्रॅम फळांमध्ये 40 टक्के व्हिटॅमिन-सी असते, जे आपल्याला दररोज आवश्यक असतात आणि सुमारे 28 टक्के लोह असते. इतकेच नव्हे तर त्यात तांबे देखील असते, जे आपल्या रक्तवाहिन्या आणि रक्त पेशींचे आरोग्य सुधारण्यासाठी लोहसोबत एकत्र काम करते.

प्रजनन क्षमता वाढवते

काही सूत्रांचे म्हणणे आहे की, रामबूटनची पाने कामोत्तेजक म्हणून काम करतात. ही पाने पाण्यात बुडवून नंतर त्याचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे कामवासना वाढणारी हार्मोन्स सक्रिय होण्यास मदत होते. रामबूटन प्रजनन क्षमता वाढवते, असेही म्हटले जाते. असे असले तरी अद्याप यावर संशोधन सुरु आहे.

बॅक्टेरियाविरोधी आणि अँटीसेप्टीक गुणांनी यु्क्त आहे रामबूटन

बर्‍याच संशोधनात असे आढळले आहे की प्राचीन काळापासूनच बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करण्यासाठी या फळाचा उपयोग केला जातो. काही संशोधनात या फळाच्या अँटीसेप्टिक गुणधर्मांबद्दलही बोलले आहे, जे शरीराला अनेक संक्रमणापासून वाचवतात. हे फळ जखम लवकर भरण्यास मदत करते आणि पस तयार होण्यास प्रतिबंधित करते.

​कँसर रोखण्यास मदत करते

रामबूटन हे उच्च अँटीऑक्सिडेंट फळांपैकी एक आहे, ज्यामुळे कर्करोग रोखता येतो. हे अँटीऑक्सिडेंट्स जळजळविरूद्ध लढू शकतात आणि शरीरातील पेशींना प्रभावित होण्यापासून बचाव करू शकतात. यातील व्हिटॅमिन-सी देखील यास मदत करते. हे हानिकारक मुक्त रॅडिकल्सचा अकार्यक्षम करते आणि कर्करोगाच्या विविध प्रकारांपासून संरक्षण प्रदान करते.

​मधुमेही रुग्णांसाठी फायदेशीर

चीनच्या कुंमिंगमधील विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठात केलेल्या अभ्यासानुसार, रामबूटनच्या सालामध्ये अँटी-डायबेटिक गुणधर्म असल्याचे आढळले. टाईप-2 मधुमेह असलेल्या उंदरांना रामबुटनच्या सालामधील अर्क इंड्युस्‍ड केले असता त्यांची फास्टींग ग्लुकोजची पातळी कमी झाल्याचे आढळले. रामबूटनमध्ये फ्रुक्टोज असते आणि हे इन्सुलिन प्रतिरोधास बढावा देते, ज्यामुळे मधुमेह अनियंत्रित देखील होतो. हे जास्त प्रमाणात घेतल्यास रक्तातील साखरेच्या पातळीत वाढ होऊ शकते. म्हणून, हे अत्यंत मर्यादित स्वरुपात सेवन केले पाहिजे.

हृदयाचे आरोग्य सुधारते

रामबूटनमध्ये उच्च फायबर असते, ज्यामुळे कोरोनरी हृदयरोगाचा धोका कमी होतो. हे उच्च रक्तदाब कमी करण्यास देखील मदत करते आणि कोलेस्टेरॉलची पातळी कमी करू शकते.

​हाडे मजबूत होतात

रामबूटनमध्ये फॉस्फरसची चांगली मात्रा असते, जे हाडे तयार करण्यासाठी आणि त्यांची देखभाल करण्यास मदत करते. यातील व्हिटॅमिन सी हाडांच्या आरोग्यासाठी योगदान देते. (This strange looking fruit is a cure for these diseases, it is also a boon for men)

इतर बातम्या

Irfan Pathan Corona : सचिन, युसूफ पाठोपाठ इरफान पठाणही कोरोना पॉझिटिव्ह!

76 वर्षांनंतर दिल्लीत तापमानात रेकॉर्ड ब्रेक नोंद, मार्चमध्येच पारा 40 अंशांच्या पार

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI