Cloves Benefits | आहारात लवंग वापरताय?, वाचा महत्त्वाचे फायदे…

आपल्यापैकी बहुतेक लोकांना लवंगाबद्दल नक्कीच माहिती असेल. बर्‍याच प्रसंगी लवंगांचे सेवन केले जाते.

Cloves Benefits | आहारात लवंग वापरताय?, वाचा महत्त्वाचे फायदे…
लवंग

मुंबई : आपल्यापैकी बहुतेक लोकांना लवंगाबद्दल नक्कीच माहिती असेल. बर्‍याच प्रसंगी लवंगांचे सेवन केले जाते. लवंगाचे आरोग्याच्या दृष्टीनेही बरेच फायदे आहेत, परंतु बर्‍याच लोकांना त्याबद्दल पुरेशी माहित नाही. यामुळेच लोक तिचा योग्य मार्गाने वापर करत नाहीत. आयुर्वेदातही लवंगाशी संबंधित बरेच उपाय नमूद केले गेले आहेत. (Use cloves in the diet ? Read Important Benefits)

लवंगमध्ये यूजेनॉल असते जे साइनस आणि दातांदुखी सारख्या हेल्थ प्रॉब्लम ठिक करण्यात मदत करते. लवंग ही गरम असते. यामुळे सर्दी-खोकला झाल्यावर लवंग खावी किंवा याची चहा बनवून पिणे फायदेशीर आहे. लवंगेचा एक काळ सर्दी, पडसे किंवा खोकल्याकरिता घरगुती औषध म्हणून मोठा वापर होता. विडय़ाच्या पानाबरोबर मसाल्यात वापर म्हणून लवंग असते. लवंग दाबल्यानंतर ज्यातून तेल निघते ती लवंग चांगली.

लवंगेचे तेल पाण्यापेक्षा जड असते. लवंग तिखट, कडू रसाची असून लघु गुणांची म्हणून डोळय़ांना हितकारक आहे. पाचक व रुची उत्पन्न करणारी प्रामुख्याने कफ विकारावर व काही प्रमाणात पित्त व कफ विकारावर काम करते. ग्रंथाप्रमाणे लवंग अग्निप्रदीपक, पोटदुखी, तहान, खोकला, कफ, दमा, उचकी, क्षय, मुखदरुगधी, उलटी, पोटदुखी, रक्तविकार इत्यादींवर काम करते.
लवंगेचा फाजील वापर केल्यास डोळे, मूत्राशय व हृदयावर परिणाम वाईट होतो. तोंड येते, जिभेला जखम होते. आयुर्वेद शास्त्राप्रमाणे प्राणवह स्त्रोतसाच्या सर्व विकारात लवंग उत्तम काम करते. सर्दीने सतत नाक वाहत असेल तर एकएक करून तीन-चार लवंग लागोपाठ चघळाव्या. सर्दी लगेच थांबते. लवंगेत तेल आहे. त्याचा विशद गुण आहे. त्यामुळे घसा, गळा, गाल, जीभ सर्व स्वच्छ राहते. लवंगेचे तेल सर्दीकरिता अत्यंत उपयुक्त आहे. रुमालावर दोन थेंब तेल टाकले की, त्याच्या हुंगण्याने नाक मोकळे होते.

संबंधित बातम्या : 

Weight Loss | Intermittent Fasting दरम्यान ‘ब्लॅक कॉफी’ पिणे ठरेल फायदेशीर! जाणून घ्या कसे…

Anjeer Benefits | हिवाळ्यात अंजीर खायलाच हवे, आरोग्याला होतील अनेक फायदे!

(Use cloves in the diet ? Read Important Benefits)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI