AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weight Loss | रात्रीच्या जेवणात डाळ-भात खाल्ल्याने वजन होईल कमी! वाचा याचे फायदे…

वाढते वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी बहुतेक लोक डाळ किंवा भात खात नाहीत, तर त्याऐवजी रात्रीच्या जेवणामध्ये सलाड, चपाती अशा निरोगी गोष्टी खातात. मात्र, डाळ-भात केवळ आपले पोटच भरत नाही, तर आपले वजनही नियंत्रित करते.

Weight Loss | रात्रीच्या जेवणात डाळ-भात खाल्ल्याने वजन होईल कमी! वाचा याचे फायदे...
डाळ-भात
| Updated on: Mar 25, 2021 | 11:08 AM
Share

मुंबई : आपल्यापैकी प्रत्येकाच्या घरी रोज डाळ-भात (Dal Rice) बनवला जातो. बर्‍याच लोकांना असे वाटते की, डाळ भात खाण्याने शरीराला असे कोणतेही विशेष पोषण मिळत नाही. जर आपल्याला असे वाटत असेल, तर आपण पूर्णपणे चुकीचा विचार करत आहात. आज आपण डाळ-भात खाण्याच्या फायद्यांविषयी जाणून घेणार आहोत. ज्यानंतर आपण हा पदार्थ आपल्या आवडीनुसार आणि मनमोकळेपाणाने खाऊ शकता (Weight Loss tips eating Dal Rice in dinner will help you to lose weight).

वाढते वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी बहुतेक लोक डाळ किंवा भात खात नाहीत, तर त्याऐवजी रात्रीच्या जेवणामध्ये सलाड, चपाती अशा निरोगी गोष्टी खातात. मात्र, डाळ-भात केवळ आपले पोटच भरत नाही, तर आपले वजनही नियंत्रित करते. चला तर, डाएटमध्ये डाळ-भात खाण्याच्या फायद्यांविषयी जाणून घेऊया…

डाळ-भात खाल्ल्याने वजन होते कमी!

बहुतेक लोकांना असे वाटते की, तांदळामध्ये कार्बोहायड्रेट असते, जे जास्त प्रमाणात खाल्ल्यास आपले वजन वाढवते. परंतु, जर तुम्ही कार्बोहायड्रेट खाणे थांबवले, तर शरीरातील उर्जेचे प्रमाण कमी होते. म्हणून, रात्रीच्या जेवणात भात खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तांदळामध्ये बर्‍याच प्रकारचे जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. पांढर्‍या तांदळाऐवजी ब्राऊन राईसही खाऊ शकता.

अनेकांना तूर डाळ पचायला त्रास होतो, म्हणून तूर डाळ शिजवण्यापूर्वी अर्धा तास भिजत घाला. याशिवाय डाळीला तडका देताना तुम्ही त्यात हिंग देखील घालू शकता (Weight Loss tips eating Dal Rice in dinner will help you to lose weight).

डाळींमध्ये भरपूर प्रथिने असतात!

डाळीत अनेक प्रकारचे प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. नेहमीच्या डाळीमध्ये विविध प्रकारच्या भाज्या घालून आपण त्याचे सांबार देखील बनवू शकता. हा पदार्थ आपल्या जेवणाचे पौष्टिक मूल्य वाढवेल आणि आपल्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरेल.

डाळ भात खाणे हे पचनास सोपे आणि हलके आहे, ज्यामुळे आपली पाचन शक्ती वाढते. आठवड्यातून चार दिवस डाळ भात खाल्ल्याने वजन वाढत नाही. डाळीमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने असतात, ज्यामुळे तुमचे पोट बर्‍याच काळासाठी भरलेले राहते. डाळ-भातामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे पोटाच्या समस्यांपासून मुक्ती मिळते. फायबरमुळे मधुमेहासारख्या रोगांपासून मुक्ती मिळू शकते आणि ब्लड शुगर लेव्हलही कंट्रोलमध्ये राहते.

अनेक डाएट एक्सपर्ट असे मानतात की, तुम्ही जर वजन कमी करण्याचे प्रयत्न करत असाल तर तुम्ही दिवसातून दोनदा भात खायला हवा. त्यासोबत भाज्यांचाही आपल्या आहारात समावेश करायला हवा. जे लोक मांस खात नाहीत, त्यांच्यासाठी डाळ हा प्रोटीनचा मोठा खजिना आहे. डाळ आणि भातामध्ये अनेक प्रकारचे वेगवेगळ्या प्रोटीन्स असतात. त्यामुळे हे दोन्ही एकत्र खाल्ल्याने आपल्याला प्रोटीन जास्त मिळतात.

(टीप : कोणत्याही आहारबदलापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Weight Loss tips eating Dal Rice in dinner will help you to lose weight)

हेही वाचा :

Hair Care | केसगळती आणि कोंड्याच्या समस्येमुळे त्रस्त आहात?, ‘हे’ नैसर्गिक उपाय ट्राय करा

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.