AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hair Care | केसगळती आणि कोंड्याच्या समस्येमुळे त्रस्त आहात?, ‘हे’ नैसर्गिक उपाय ट्राय करा

घरगुती नुस्के वापरून आपण आपले केस सुंदर, जाड, लांब आणि मजबूत करू शकतो.

Hair Care | केसगळती आणि कोंड्याच्या समस्येमुळे त्रस्त आहात?, 'हे' नैसर्गिक उपाय ट्राय करा
नारळाचे दूध आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर असते. अर्धा कप नारळाचे दूध घ्या आणि त्यात दोन चमचे मध मिक्स करा. त्यानंतर ही पेस्ट आपल्या केसांना लावा. वीस ते तीस मिनिटांनंतर आपले केस थंड पाण्याने धुवा. (टीप : औषध म्हणून वापरण्यासाठी किंवा कोणत्याही कृतीपूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.)
| Edited By: | Updated on: Mar 24, 2021 | 7:14 AM
Share

मुंबई : घरगुती नुस्के वापरून आपण आपले केस सुंदर, जाड, लांब आणि मजबूत करू शकतो. विशेष म्हणजे 2 आठवड्यांमध्ये तुम्हाला केसांमध्ये बराच बदल आढळून येईल तसेच केसांची चमक देखील वाढेल. यासाठी तुम्ही घरी तेल तयार करू शकता. कांदा, नारळाचे तेल आणि कोरफड यांचे मिश्रन करून तेल तयार केले तर तुमचे केस लांब होण्यास मदत होते. (Onion juice will benefit the hair)

-केसगळती व केस कमकुवत होण्यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे कोंडा. टाळूच्या त्वचेला योग्य प्रमाणात पोषण तत्त्वांचा पुरवठा न झाल्यास कोंड्यासह अन्य समस्या उद्भवतात. केसांचे नुकसान टाळण्यासाठी आपल्या हेअर केअर रुटीनमध्ये कांद्याच्या रसाचा समावेश करून पाहावा.

-तेल तयार करण्यासाठी सर्वात अगोदर कांदा बारीक किसून अथवा कांदा ज्यूसरमधून काढला तरी चालतो मात्र, कांद्याचा रस हा ताजा असावा. त्यानंतर कोरफड द्या कोरफडीचा बाजूचा सर्व भाग काढून टाका त्यानंतर कांद्याचा रस कोरफड आणि नारळाचे तेल एकत्र करा रोज हे तेल केसांना लावा यामुळे तुमचे केस सुंदर, जाड, लांब आणि मजबूत दिसतील.

-प्रोटीनचा उत्तम स्त्रोत म्हणजे अंडे तर कांद्यामध्ये सल्फर अधिक प्रमाणात असतात. या दोन्ही पोषक घटकांमुळे आपले केस सुंदर, काळेशार, घनदाट आणि मजबूत होण्यास मदत मिळते. हेअर मास्कच्या स्वरुपात अंड्याचा उपयोग करण्यास आपणास कोणतीही समस्या नसल्यास आठवड्यातून एकदा किंवा दोनदा अंडे- कांद्याच्या रसाचे मिश्रण केसांमध्ये लावू शकता.

-कांद्याचा रस आणि ऑलिव्ह ऑइल एकत्रित करून टाळूच्या त्वचेवर लावल्यास केसांमधील कोंड्याची समस्या दूर होण्यास मदत मिळू शकते. यातील पोषक घटक केसांमधील कोंडा कमी करण्याचे कार्य करतात. तसंच केस मऊ व चमकदार होतात. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार हा उपाय केल्यास केस लांबसडक व घनदाट होण्यास मदत मिळेल.

-केस लांबसडक होण्यासाठी हा उपाय लाभदायक ठरू शकतो. तसंच केसांचे आरोग्य निरोगी देखील राहील. हेअर पॅक लावल्यानंतर शॉवर कॅप घाला. 30 मिनिटांनंतर शॅम्पूने केस स्वच्छ धुऊन घ्या. यामुळे केस मऊ व चमकदार होतात.

-आपल्या केसांच्या लांबीनुसार कांद्याचा रस घ्यावा. यामध्ये एक ते दोन चमचे मध मिक्स करा. हे मिश्रण आपल्या टाळूसह संपूर्ण केसांवर लावा. आठवड्यातून दोनदा हा उपाय केल्यास कोंड्याची समस्या दूर होण्यास मदत मिळेल आणि केसांची वाढ देखील चांगली होईल.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

(Onion juice will benefit the hair)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.