AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Wifi AC की Non-Wifi AC? खरेदीपूर्वी ‘हे’ फायदे आणि तोटे समजून घ्या

नवीन एसी खरेदी करताना तुमच्यासमोर एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो Wifi एसी घ्यावा की Non-Wifi एसी? दोघांतही वेगवेगळे फायदे आणि तोटे आहेत. तुमचं बजेट, वापराची सवय आणि तंत्रज्ञानाची गरज लक्षात घेऊनच निर्णय घेणं फायदेशीर ठरेल.

Wifi AC की Non-Wifi AC? खरेदीपूर्वी ‘हे’ फायदे आणि तोटे समजून घ्या
Wifi AC vs Non-Wifi AC : निर्णय घेण्याआधी ‘या’ गोष्टी तपासा
| Edited By: | Updated on: Jul 17, 2025 | 6:14 PM
Share

उन्हाळ्याच्या दिवसात एसी म्हणजे घरातलं एक महत्वाचं आरामदायक साधन. पण जेव्हा तुम्ही नवीन एसी खरेदी करायचा विचार करता, तेव्हा सर्वसामान्य ग्राहक एका महत्त्वाच्या प्रश्नात अडकतो Wi-Fi एसी घ्यावा की Non-WiFi एसी? कारण यातील किंमत आणि फिचर्समध्ये चांगलाच फरक असतो. मग प्रश्न असा उभा राहतो की, अधिक पैसे देऊन स्मार्ट फिचर्स मिळवणं खरंच फायदेशीर आहे का? चला, हीच शंका आज आपण स्पष्ट करूया.

Wi-Fi AC आणि Non-WiFi AC यामधला फरक?

Wi-Fi AC आणि Non-WiFi AC दोघांचं मुख्य काम आहे तुमचं घर थंड ठेवणं. परंतु, Wi-Fi एसीमध्ये मिळणारी ‘स्मार्ट टेक्नोलॉजी’ तुमचं एसी वापरण्याचं संपूर्ण अनुभवच बदलून टाकते. Wi-Fi AC तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमधून घरात असाल किंवा बाहेर कुठूनही चालू/बंद करू शकता. वेळ सेट करू शकता, वीज वापर ट्रॅक करू शकता आणि आवाजाने म्हणजेच voice command नेसुद्धा नियंत्रित करू शकता.

दुसरीकडे, Non-WiFi AC मध्ये फक्त रिमोटचा पर्याय असतो. तुम्हाला ते स्वतः चालू आणि बंद करावं लागतं. तुमचं घरातलं तापमान जर सतत बदलत असेल, किंवा तुम्हाला automation हवी असेल, तर Wi-Fi एसी एक चांगला इन्व्हेस्टमेंट ठरू शकतो.

स्मार्ट कंट्रोल

Wi-Fi AC हे इतके स्मार्ट असतात की तुम्ही त्यांना फक्त आवाजानं (voice command) देखील चालवू शकता. Alexa किंवा Google Assistant सारखे स्मार्ट डिव्हाइस असल्यास तुम्ही फक्त “AC चालू कर” असं म्हणाल, आणि एसी चालू होईल. बुजुर्ग व्यक्तींसाठी हा फिचर फारच उपयोगी आहे, जेव्हा रिमोट हाताळणं शक्य नसतं. आराम करताना रिमोट न शोधता फक्त आवाजानं एसी कंट्रोल करणं हे निश्चितच आरामदायक ठरतं.

वेळेची आणि विजेची बचत

साधारण एसीमध्ये तुम्ही वेळ ठरवून चालू/बंद करु शकता, पण Wi-Fi एसीमध्ये तुम्ही त्याचं संपूर्ण शेड्युल सेट करू शकता. उदाहरणार्थ, सकाळी 8 वाजता बंद व्हावं आणि संध्याकाळी 6 वाजता पुन्हा सुरू व्हावं अशी सेटिंग तुम्ही फोनमधूनच करू शकता. ह्यामुळे रिमोट वापरण्याची गरजच राहत नाही आणि वीजेची बचत सुद्धा होते.

वीज वापरावर नजर ठेवणं

Wi-Fi एसीसाठी खास मोबाइल अ‍ॅप्स येतात ज्यामध्ये तुम्हाला एसीने किती वीज वापरली आहे याचा तपशील मिळतो. हे फिचर तुम्हाला तुमच्या वापराच्या सवयींमध्ये सुधारणा करून वीजेची बचत करण्यात मदत करू शकतं. अशा प्रकारे तुम्ही तुमचा एसी केवळ “चालू-बंद” करण्यापुरता न ठेवता, तो किती स्मार्टपणे वापरता हेही ठरवतं.

जर तुम्हाला फक्त एसी वापरायचं आहे आणि जास्त काही हायटेक फिचर्सची गरज नाही, तर Non-WiFi एसी तुमच्यासाठी योग्य आहे. पण जर तुम्हाला स्मार्ट होम सिस्टिम, अ‍ॅप कंट्रोल, वीज बचत तपशील, आवाजावर कंट्रोल आणि ऑटो शेड्युलिंग यांसारख्या सुविधा हव्या असतील, तर Wi-Fi एसीवर थोडं अधिक खर्च करणं हे एक उत्तम आणि दीर्घकालीन फायदेशीर सौदा ठरू शकतं.

इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.