AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गाडीचा चक्काचूर, मदतीसाठी कोणीच पुढे येईना, लोक व्हिडीओ काढत राहिले अन् अचानक… तरुणांसोबत नेमकं काय घडलं?

नवापूर महामार्गावर भीषण अपघातात मृत्यूच्या दारात असलेल्या ३ तरुणांना ॲड. अविनाश पाटील यांनी स्वतःच्या कारमधून दवाखान्यात नेले. त्यांच्या या समयसूचकतेमुळे तरुणांचे प्राण वाचले असून RTO कडून त्यांचा गौरव करण्यात आला आहे.

गाडीचा चक्काचूर, मदतीसाठी कोणीच पुढे येईना, लोक व्हिडीओ काढत राहिले अन् अचानक... तरुणांसोबत नेमकं काय घडलं?
Nandurbar Highway Accident
| Updated on: Jan 08, 2026 | 3:26 PM
Share

माणुसकीचा ओलावा हरवत चाललेल्या काळात नंदुरबारच्या नवापूर महामार्गावर एका वकिलाने माणुसकीचे दर्शन घडवले आहे. भीषण अपघातात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आणि मृत्यूच्या दारात उभ्या असलेल्या धुळ्याच्या तीन तरुणांना शिरपूरचे ॲडव्होकेट अविनाश पाटील यांनी स्वतःच्या खाजगी वाहनातून रुग्णालयात पोहोचवून जीवदान दिले. त्यांच्या या समयसूचकतेची दखल घेत उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी घेत त्यांना २५ हजार रुपयांचे रोख बक्षीस देऊन गौरविले आहे.

नेमकं काय घडलं?

नवापूर शहराजवळील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या अपेक्स हॉटेलजवळ आयशर टेम्पो आणि मालवाहू ट्रक यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की वाहनांचा दर्शनी भाग पूर्णपणे चक्काचूर झाला होता. या अपघातात धुळे येथील रहिवासी असलेले योगेश राजेंद्र माळी, राकेश भील आणि आजेश हे तिघे तरुण गंभीर जखमी झाले. त्यांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता. ते मदतीसाठी याचना करत होते. यावेळी महामार्गावर मोठी गर्दी जमली होती. अनेकजण मोबाइलमध्ये व्हिडीओ काढण्यात मग्न होते, पण मदतीसाठी कोणीही जात नव्हते.

त्याच वेळी शिरपूरचे रहिवासी असलेले ॲड. अविनाश पाटील हे आपल्या खाजगी कामानिमित्त या मार्गावरून जात होते. गर्दी आणि अपघात पाहून त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपली कार थांबवली. जखमींची गंभीर अवस्था पाहून त्यांनी रुग्णवाहिकेची वाट न पाहता लोकांच्या मदतीने तिघांनाही आपल्या आलिशान कारच्या मागील सीटवर घेतले. स्वतःच्या गाडीच्या सीटला रक्त लागेल, याचा जराही विचार न करता त्यांनी गाडी नवापूर उपजिल्हा रुग्णालयाकडे वेगाने वळवली.

तिन्ही तरुणांचे प्राण वाचले

दवाखान्यात पोहोचल्यानंतर त्यांनी स्वतः डॉक्टरांना विनंती करून तातडीने उपचार सुरू करण्यास सांगितले. त्यांना वेळीच उपचार मिळाल्याने या तिन्ही तरुणांचे प्राण वाचले. या अपघाताची माहिती मिळताच नंदुरबारचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) उत्तम जाधव यांनी तातडीने नवापूर रुग्णालय गाठले. ॲड. पाटील यांनी केलेल्या मदतीची माहिती मिळताच जाधव भारावून गेले. शासनाच्या मदत करणारा नागरिक धोरणांतर्गत आणि माणुसकीच्या नात्याने उत्तम जाधव यांनी स्वतःच्या वतीने ॲड. अविनाश पाटील यांना २५,००० रुपयांचे रोख बक्षीस आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले.

या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात ॲड. अविनाश पाटील यांच्या संवेदनशीलतेचे आणि धाडसाचे मोठे कौतुक होत आहे. वकिली व्यवसायातून न्याय देणारा हात आज जीव वाचवण्यासाठी धावून आला, अशी चर्चा परिसरात रंगली आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...