Sunetra Pawar : सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार का? महाराष्ट्रातील भाजपच्या बड्या नेत्याचं स्पष्ट मत की…
"मात्र त्यातूनच आपल्या गरीब भगिनींचा विकासच होतो आहे. त्यामुळे तो पैसा कुठे वाया जातो आहे का? तो सुद्धा विकासच आहे. माननीय मुख्यमंत्री कुशल आहेत. त्यामुळे यात जे गॅप पडलेले आहेत ते भरून काढतील. त्यामुळे त्याचा विकासावर काही फरक पडेल असं मला वाटत नाही" असं गिरीश महाजन म्हणाले.

“अजित दादा यांच्या निधनाला दोनच दिवस झाले आहेत. त्यामुळे कृपा करून यावर राजकारण करू नका. चौकशीचा भाग आहे, चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यातलं जे आहे ते बाहेर येईलच. काहीतरी संशय व्यक्त करायचा. काहीतरी राजकीय बोलायचं. बोलताना गांभीर्याने बोललं पाहिजे. एवढ्या मोठ्या गंभीर विषयावर मला वाटतं सर्वांनीच सांभाळून बोललं पाहिजे” असं मंत्री गिरीश महाजन सुषमा अंधारे यांच्याबद्दल बोलले. “अजित दादांचा गट असेल तसेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा गट असेल हा या दोन्ही राष्ट्रवादीचा विषय आहे. मला वाटत यासंदर्भात पुढे हालचाली होतील. पण त्यासाठी एक ते दोन दिवस तरी जाऊ द्यावे लागतील” असं दोन्ही राष्ट्रवादींच एकत्रीकरण, विलीनीकरणाच्या प्रश्नावर गिरीश महाजन म्हणाले.
“मला वाटतं हा अजितदादांच्या राष्ट्रवादीचा प्रश्न आहे. यावर आम्ही टीकाटिप्पणी करणे मला वाटतं योग्य होणार नाही. त्यांचे जे आमदार आहेत, दुसऱ्या फळीतले नेते आहेत. ते याबद्दल विचार करतील आणि निर्णय घेतील” असं सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या प्रश्नावर गिरीश महाजन म्हणाले.
राजकारण करण्यासाठी काही काळ वेळ असते की नाही
“मला वाटतं या विषयावर कोणीही राजकारण करू नये. दुसरा दिवस आहे आणि आपण काय काय बोलतो आहोत. बोलताना आपण नियंत्रण ठेवलं पाहिजे. दोन-चार-पाच दिवस जाऊ द्या. त्यानंतर तुम्हाला काय बोलायचं आहे ते बोला. सगळ्या गोष्टींमध्ये राजकारण केलंच पाहिजे का? आणि राजकारण करण्यासाठी काही काळ वेळ असते की नाही हा माझा प्रश्न आहे” असं संजय राऊतांच्या प्रश्नावर गिरीश महाजन यांनी उत्तर दिलं.
मुख्यमंत्री अर्थसंकल्प सादर करतील का?
“आज ते सांगणं कठीण आहे आणि अधिवेशनाला सुद्धा वेळ आहे. मला वाटतं आता पुढच्या काळात आणखी काय घडामोडी घडतात. मंत्रिमंडळाची रचना नेमकी कशी होते. अजित दादांकडे जी खाते होती ती नेमकी कुणाकडे जातात याबाबत राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांना भेटलेले आहेत ते ठरवतील” असं गिरीश महाजन मुख्यमंत्री अर्थसंकल्प सादर करतील का? या प्रश्नावर उत्तर देताना म्हणाले.
लाडकी बहिण योजनेबद्दल काय बोलले?
लाडकी बहीण योजनेमुळे राज्याची आर्थिक स्थिती बिघडली केंद्रीय सर्वेक्षणात बाब समोर आलीय. त्यावरही गिरीश महाजन यांनी उत्तर दिलं. “लाडक्या बहिणींना आपण दर महिन्याला पंधराशे रुपये देतो आहेत. त्यामुळे एवढे पैसे तिकडे गेल्यामुळे थोडाफार फरक निश्चितच पडतो आहे. थोडाफार फरक पडत असेल” असं गिरीश महाजन म्हणाले.
नेमकं काय झालं हे समोर आलं पाहिजे
“मला वाटतं हा अपघात नेमका कसा झाला हे समोर येण्यासाठी सीआयडी असो की सीबीआय सर्व चौकशी होऊ द्या. आम्हाला सुद्धा या अपघाताचं आश्चर्य आहे की हा अपघात नेमका झालाच कसा? मी सुद्धा काल त्या ठिकाणी जाऊन धावपट्टी बघितली. नेमकं काय झालं हे समोर आलं पाहिजे. त्यामुळे अपघातासंदर्भात सर्व समोर आलं पाहिजे आणि पुढच्या वेळेस असा अपघात होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे” असं गिरीश महाजन यांनी सांगितलं.
