AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यातल्या किडनी रॅकेटप्रकरणी मोठी अपडेट, तावरेला अटक, अनेक गुपितं बाहेर येणार?

पुण्यातील रुबी हॉल किडनी रॅकेटप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. अजय तावरे याला पुणे पोलिसांनी आज ताब्यात घेतलं आहे.

पुण्यातल्या किडनी रॅकेटप्रकरणी मोठी अपडेट, तावरेला अटक, अनेक गुपितं बाहेर येणार?
pune ruby hall kidney racket case
| Updated on: May 29, 2025 | 6:01 PM
Share

पुण्यातील रुबी हॉल किडनी रॅकेटमध्ये मोठी माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी अजय तावरे याला पुणे पोलिसांनी आज ताब्यात घेतलं आहे. तावरे याला पोलिसांनी 2 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांच्या या कारवाईनंतर किडनी रॅकेटमध्ये आता अनेक महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ताजी अपडेट काय?

मिळालेल्या माहितीनुसार अजय तावरे याला पुणे पोलिसांनी आज ताब्यात घेतले आहे. रुबी हॉल क्लिनिकमधील किडनी रॅकेट प्रकरणात अजय तावरे याच्यावर ही कारवाई करण्यात आलीय. रुबी हॉल क्लिनिकमधील किडनी रॅकेटमध्ये ससून सर्वोपचार रुग्णालयातील तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक अजय तावरे याचा सहभाग असल्याच्या संशयाखाली त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. न्यायालयाने त्याला 2 जूनपर्यंत कोठडी सुनावल्यामुळे आता या प्रकरणात मोठे उलगडे होण्याची शक्यता आहे.

तावरे हा किडनी रॅकेटमधील सहआरोपी आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून तावरेची आता चौकशी होणार आहे.

काय आहे नेमके प्रकरण

पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक (Ruby Hall Clinic) किडनी रॅकेट प्रकरण हे 2022 सालचे आहे. कोल्हापूरमधील एका महिलेला कथितपणे 15 लाख रुपयांचे आमिष दाखवण्यात आले होते. तिने एका प्रत्यारोपणाची गरज असलेल्या पुरुषाची पत्नी असल्याचे खोटे भासवले आणि एका तरुण महिला रुग्णाला आपली किडनी दान केली. त्याच्या बदल्यात त्या तरुण महिलेच्या आईने त्या पुरुषाला किडनी दान केली होती. हे प्रकरण नंतर समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती.

नेमका काय ठपका ठेवला होता?

या प्रकरणात 2022 साली एकूण 15 डॉक्टरांवर गुन्हाद दाखल करण्यात आला होता. तसेच त्यावेळी संबंधित महिलेने आणि एजंटांनी बनवून दिलेली खोटी कागदपत्रे (False documents) याची सत्यता पडताळणी डॉ. तावरे अध्यक्ष असलेल्या विभागीय प्रत्यारोपण समितीने केली नसल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.