AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray : FIR दाखल करून घेण्यात अडथळे का आणले जात आहेत ? राज ठाकरेंचा सरकारला डायरेक्ट सवाल

अजित पवार यांच्या विमान अपघाती मृत्यूला एक महिना झाला तरी घातपाताचा संशय कायम आहे. रोहित पवारांनी एफआयआर दाखल करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो नाकारण्यात आला. यानंतर त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरेंनीही पत्रकार परिषद घेऊन "धुक्याने की धोक्याने?" असा प्रश्न विचारत सरकारला चौकशीत अडथळे का आणले जात आहेत, याबाबत जाब विचारला.

Raj Thackeray : FIR दाखल करून घेण्यात अडथळे का आणले जात आहेत ? राज ठाकरेंचा सरकारला डायरेक्ट सवाल
राज ठाकरे
| Updated on: Feb 27, 2026 | 2:19 PM
Share

अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूला 1 महीना होत आला आहे. त्यांच्या विमानाचा अपघात की घातपात झाला असा संशय लोकांच्या मनात असून रोहित पवार यांनी हा मुद्दा सातत्याने लावून धरला आह. या अपघाताच्या चौकशीला झेल्या दिरंगाईमुळेही ते नाराज असून त्यांनी 25 फेब्रुवारीला मुंबईत आणि काल , 26 फेब्रुवारी रोजी बारामतीत येथील पोलिस स्टेशमनमध्ये जाऊन FIR दाखल करण्याचा प्रयत्न केल. मात्र दोन्हीकडे FIR दाखल करून घेण्यास नकार मिळाला. त्या रोहित पवार हे आक्रमक झाले असून त्यांनी आज सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. विविध मुद्दे मांडले.नंतर त्यांनी पत्रकारांशीही संवाद साधला.

रोहित पवार यांची भेट झाल्यानंतर राज ठाकरे यांनीही पत्रकार परिषद घेत अनेक मुद्यांवर भाष्य केलं. हा अपघात धुक्याने झाला की धोक्याने झाला हे महाराष्ट्राला समजत नाहीये,असं राज ठाकरे म्हणाले. रोहित पवारांनी सर्व मुद्दे, टेक्निकल गोष्टी सांगितल्या, त्यांचा FIR का दाखल करून घेतला जात नाहीये. चौकशी नीट व्हावी यासाठी एफआयआर करायचा असेल तर अडथळे का निर्माण केले जातात असा थेट सवाल राज ठाकरे यांनी केला आहे. यावरून संशय येण्यास वाव असल्याचे म्हणत त्यांनी सरकारला काही रोखठोक प्रश्नही विचारले.

काय म्हणाले राज ठाकरे ?

हा अपघात झाल्यावर मी कोणालातरी म्हणालो होतो की, अपघात धुक्याने झाला की धोक्याने झाला, हे समजत नाहीये.  आज रोहित पवारांची माझी भेट झाली, त्यांनी काही टेक्निकल गोष्टी सांगितल्या. त्यांच्याशी बोलल्यावर मला एकच गोष्ट जाणवली की, त्यांनी 3 ठिकाणी एफआयआर करण्याचा प्रयत्न केला. पण तिन्ही ठिकाणी सरकारकडून एफआयआर घेतला नाही. मरीन ड्राईव्ह पोलिस स्टेशनला ते गेल्यावर तिथले अधिकारी एफआयआर लिहून घेत होते, टाईप करत होते, पण ते टाईप करत असताचनाच तिथे डीसीपी आले. आणि त्यांनी सांगितलं की एफआयआर लिहून घ्यायचा नाही. हे कशासाठी ? असा सवाल राज ठाकरेंनी विचारला.

याची उत्तर मिळाली पाहिजेत. जर तो निव्वळ अपघात असेल, जर तो घातपात नसेल, पण त्याबद्दल घरच्या लोकांनाच काही संशय असेल. किंवा चौकशी नीट व्हावी यासाठी त्यांना एफआयआर करायचा असेल, तर त्यामध्ये सरकारकडून अडथळे का आणले जात आहेत ? असा थेट सवालही राज ठाकरे यांनी सरकारला विचारला.

काही काळंबेरं आहे का ?

आज सुनेत्रा वहिनी तिथे उपमुख्यमंत्री म्हणून बसल्या आहेत, त्यांनीही यावर विचार केला पाहिजे, कारण त्यांचेच ते पती होते. त्यांच्याच पतीच्या अपघाताबद्दलचा हा एफआयआर आहे. आणि एफआयआर घेऊ नका, असा दबाव सरकारकडून येत आहे. कुठेही एफआयआर नोंदवू शकता असं लोकांना सांगितलेलं आहे. पण एफआयआर नोंदवायला गेल्यावर जर त्या माणसासमोर अडथळे आणत असाल तर यात काही काळंबेर आहे का असा संशय निर्माण होतोच ना. सरकारच संशय निर्माण करतंय असा आरोपही राज ठाकरे यांनी केला,

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...