चंद्रकांत पाटलांच्या गावात आघाडीत बिघाडी, थेट अजित पवारांनी घेतली दखल, म्हणाले…

चंद्रकांत पाटलांच्या गावात आघाडीत बिघाडी, थेट अजित पवारांनी घेतली दखल, म्हणाले...

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या गावमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आले आहेत. ते अतिशय चुकीचं झालं आहे, असे अजित पवार म्हणाले. (Ajit Pawar Khalapur grampanchayat)

prajwal dhage

| Edited By: प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jan 15, 2021 | 8:02 PM

पुणे : “ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या गावामध्ये भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आले आहेत. हे अतिशय चुकीचं आहे,” असे म्हणत कोल्हापुरातील खानापूर गावातील नव्या राजकीय समीकरणाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोध केला. ते पिंपरी येथे माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. यावेळी बोलताना खानापुरात राष्ट्रवादी आणि काँग्रेसने शिवसेनेची साथ सोडली हे चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. तसेच याबाबत तेथील स्थानिकांना वरिष्ठांनी सूचना दिल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. (Ajit Pawar said that alliance for Khalapur gram panchayat election is wrong)

खानापुरात शिवसेना एकाकी

कोल्हापुरातील खानापूर गावात आघाडीत बिघाडी झाल्यामुळे येथील ग्रामपंचायत निवडणूक चांगलीच चर्चेत आली आहे. हे गाव खुद्द चंद्रकांत पाटलांचे असल्यामुळे येथील निवडणुकीला विशेष महत्त्व आले आहे. स्थानिक पातळीवर का असेना, पण शिवसेनेविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी यांनी शड्डू ठोकत चक्क भाजपशी आघाडी केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या आघाडीची राज्यात चर्चा होऊ लागल्यामुळे थेट वरिष्ठ नेत्यांनासुद्धा या खानापुरातील निवडणुकीची दखल घ्यावी लागली आहे. या निवडणुकीबाबत अजित पवार यांना विचारले असता, “येथे झालेली आघाडी ही अत्यंत चुकीची आहे. आम्ही तेथील लोकांना वरिष्ठांकडून सूचना दिल्या आहेत,” असं स्पष्टीकरण दिलं आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी जे झालं त्याचं समर्थन कुणीही करणार नही असंसुद्धा त्यांनी म्हटलं आहे.

कधीकाळी अशक्य माणले जाणारे राजकीय समीकर प्रत्यक्षात येऊन राज्य पातळीवर काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी यांनी महाविकास आघाडी स्थापन झाली. हे त्रिकूट आपला पाच वर्षांचा कार्य़काळ पूर्ण करु शकणार नाही, असा दावा विरोधकांकडून केला जातोय. असे असले तरी दुसरीकडे महाविकास आघाडी आपला राज्यकारभार व्यसवस्थितपणे हाकत असल्याचं सांगितलं जातं. राज्यात 5 महत्त्वाच्या शहरात महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्येही एकदीलाने लढण्यासाठी या पक्षांकडून चाचपणी होत आहे.

असे असले तरी सध्या राज्यभरात ग्रामपंचायतीच्या निवडणुका सुरु आहेत. या निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवर वेगवेगळी समीकरणं उदयास येत आहे.  खानापुरात आघाडीत बिघाडी झाल्यानंतर अजित पवार यांनी स्थानिक नेत्यांना सूचना दिल्याचे सांगितले आहे. मात्र, सध्यातरी येथे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने भाजपशी युती केलेली असून येथे शिवसेना हा पक्ष एकटा पडल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, अजित पवार यांनी म्हटल्याप्रमाणे खानापुरातील स्थानिकांना सूचना दिल्यानंतर आता य़ेथे काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

संबंधित बातम्या :

कोल्हापुरातून निवडून नाही आलो तर हिमालयात जाईन; चंद्रकांतदादा कडाडले

(Ajit Pawar said that alliance for Khalapur gram panchayat election is wrong)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें