AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजितदादा एकतर पालकमंत्रीपदाचा राजीनामा देतील किंवा उपमुख्यमंत्रीपद तरी सोडतील, अंजली दमानिया यांचा दावा; उद्याच्या पत्रकार परिषदेत काय बॉम्ब टाकणार?

पुणे जमीन घोटाळा प्रकरण किती किती गंभीर आहे या संदर्भात नवे खुलासे आणि आरोप करण्यासाठी आपण उद्या सकाळी दहा वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याचे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.

अजितदादा एकतर पालकमंत्रीपदाचा राजीनामा देतील किंवा उपमुख्यमंत्रीपद तरी सोडतील, अंजली दमानिया यांचा दावा; उद्याच्या पत्रकार परिषदेत काय बॉम्ब टाकणार?
Anjali Damaniya and ajit pawar
| Updated on: Nov 11, 2025 | 3:55 PM
Share

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांच्या कंपनीच्या जमीन घोटाळ्यामुळे राज्यात खळबळ उडालेली आहे. या संदर्भात ४२ एकर सरकारी जमीन कवडीमोल दरात विकत घेण्याचा प्रयत्न उघड झाल्यानंतर व्यवहार रद्द करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. मात्र, या प्रकरणात दाखल एफआयआरमध्ये पार्थ पवार यांचे नाव दाखल न केल्याने सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उद्या सकाळी दहा वाजता पत्रकार परिषद घेण्याची घोषणा केली आहे. अंजली दमानिया उद्या काय घोटाळा बाहेर काढणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

अंजली दमानिया यांनी पुणे जमीन घोटाळा प्रकरणात उद्या पत्रकार परिषद घेण्याची घोषणा केली आहे. त्यांनी आज सांगितले की आपली आत्ताच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत बैठक झाली. ज्या खऱ्या गोष्टी आहेत, त्या मला समिती पुढे सामान्य नागरिक म्हणून ठेवायच्या आहेत असं मी त्यांना सांगितल्याचे त्या म्हणाल्या. हे लँड माफिया कशा पद्धतीने स्कॅम करतात हे मला सांगायचं आहे. कोणती कोणती पावले उचलतात हे सुद्धा सांगायचं आहे. अनेक लोकांनी दिलेले पेपर मी आज बावनकुळे यांना दाखवले आहेत.

1932 मधील महार वतनाची सनद आणि नंतर सरकारकडे जमा केल्यानंतर जे कंपन्शन दिलं होतं ते त्यांनी स्वीकार केलं नाही.1930 सालचे सातबारा दिले. अनेक पत्रांच्या कॉपी देखील मी त्यांना आज पोहोचवणार आहे. गायकवाड कुटुंब आहे यांचं एक वेगळं हेरिंग घेऊन त्यांना ती जमीन द्यायचे की नाही हे सरकार ठरवेल.मी ते सगळे डॉक्युमेंट व्हेरिफाय केले आहेत. आताच्या घटकेला ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यात सरकारने 42 कोटी रुपये देऊन तो व्यवहार रद्द करण्याबाबत नोटीस काढली आहे तीच मुळात चुकीची असल्याचे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. तो अधिकार महसूल विभागाकडे नाही. हा व्यवहार रद्द झाला आणि विषय संपला असं बिलकुल नाही.याचा प्रचंड मोठा खुलासा आपण उद्या सकाळी दहा वाजता करणार असल्याचेही दमानिया यांनी म्हटले आहे.

अजित पवार प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हणाले की पंधरा-सोळा वर्ष आरोप झाले पण काही सिद्ध नाही झाले. तर मला सांगायचे आहे की आरोप झाले आणि ते सिद्ध झाले. पण तुमचे मित्र देवेंद्र फडणवीस यांनी ते सगळे बाजूला टाकले. तुमच्या वरच्या केसेस क्लोज करण्यात आल्या. सिंचन घोटाळा महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा, जरांडेश्वर साखर घोटाळा अशा सगळ्या घोटाळ्या संदर्भात आता कोर्टात अपील करणार आहे असेही दमानिया यांनी सांगितले.

अमेडिया, या सर्व कंपन्या एलएलपी कंपनी कशा बनवल्या? यामध्ये ग्रॉस रेवेन्यू शून्य आहे, यामध्ये कुठलाही व्यवहार झाला नाही अशा बोगस कंपन्या बनवून जमिनीचे व्यवहार झाले.आणि याच्या पुढच्या प्रत्येक केसमध्ये तुम्ही मोदींकडे जा, शहांकडे जा किंवा फडणवीसांकडे जा तुम्हाला कोणत्याही केसमधून बाहेर काढणार नाही.उद्या पत्रकार परिषद घेऊन मी सर्व बाहेर काढणार आणि नंतर आपण ठरवणार की हायकोर्टात जायचे की नाही असेही दमानिया यांनी सांगितले.

आपला तो बाबल्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट…

सुप्रिया सुळे असो किंवा रोहित पवार असो हे इतरांवर बोलताना कुठल्या पद्धतीने बोलतात आणि आज कुठल्या पद्धतीने बोलत आहेत. सुप्रिया सुळे यांच्याकडून मला हे अपेक्षित नव्हतं. तो माझ्या कुटुंबातील आहे मी यावर बोलणार नाही असं त्यांनी म्हटले असते तरी चाललं असतं.त्यावर वक्तव्य करणे अपेक्षित नाही.अगदी जिल्हाधिकारी पासून सर्व खुलासे आपण उद्या करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आता त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही

ज्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वर्ष 2011 मध्ये मी अपेक्षा ठेवली होती, की सिंचन घोटाळ्यात ते योग्य ती कारवाई करतील. अजित पवार ‘चक्की पिसिंग पिसिंग’ असं म्हणणारे देवेंद्र फडणवीस जेव्हा एकदा नाही तर तीन वेळा शपथविधी करतात. तेव्हा दु:ख होते की ही तिच व्यक्ती आहे जिने महाराष्ट्राला आश्वासन दिले की त्यावर कारवाई होईल. मला आता त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही.आता हे सगळे त्यांचे मित्र झाले आहेत तेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मला अपेक्षा नाही.जे पालकमंत्री आहेत आणि उपमुख्यमंत्री आहेत ते त्या जागेवर असले तर चौकशी कशी होणार ? एफआयआरवर आज पार्थ पवारचं नाव नाही. त्यामुळे नैतिकता म्हणून त्यांना दूर व्हायला हवे असेही त्यांनी सांगितले.

पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.