शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांच्या कारसमोर चॉकलेट धरलं, दार उघडून फडणवीसांनी आनंदाने स्वीकारलं

म्हैसपूर येथील शेतकऱ्यांना भेटून देवेंद्र फडणवीस परत निघाले होते. त्यावेळी गोपाल रायकर या शेतकऱ्याने त्यांना चॉकलेट भेट दिलं

शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांच्या कारसमोर चॉकलेट धरलं, दार उघडून फडणवीसांनी आनंदाने स्वीकारलं

अकोला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त करण्यासाठी अकोल्यात शेतकऱ्याने फूल ना फुलाची पाकळी म्हणून
चॉकलेट भेट दिलं. मुख्यमंत्र्यांनीही चॉकलेट आनंदाने स्वीकारत शेतकऱ्याच्या भावनांचा मान (Farmer Gifts Chocolate to CM) राखला.

अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. म्हैसपूर येथील शेतकऱ्यांना भेटून फडणवीस परत निघाले होते. गाडीचा दरवाजा बंद झाल्यावर गोपाल रायकर नावाचा शेतकरी गाडीजवळ आला.

रायकर यांनी लहानसं चॉकलेट बाहेर काढून गाडीच्या काचेजवळ धरलं. मुख्यमंत्र्यांनीही ते गाडीचा दरवाजा परत उघडत आनंदाने स्वीकारलं. त्यानंतर फडणवीस तात्काळ पुढील गावाच्या पाहणीसाठी रवाना (Farmer Gifts Chocolate to CM) झाले.

कोरड्या दुष्काळाप्रमाणे हा ओला दुष्काळ आहे. त्या दृष्टीने मदत झाली पाहिजे. शेतकऱ्यांना वसुलीला सामोरं जाण्याची पाळी येऊ नये, असं मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं. या जिल्ह्यात विमा कवच चांगलं आहे, मात्र त्यांच्याकडे पुरेसा कर्मचारी वर्ग नसल्याने सरकारी पंचनाम्याच्या आधारावर मदत दिली जाईल. पंचनामा झाला नाही, परंतु त्याचा फोटो असेल तरी मदत दिली जाईल, असा दिलासा फडणवीसांनी दिला आहे.

सरकार आल्यास सातबारा कोरा, शेतकऱ्यांसोबत जमिनीवर बसून उद्धव ठाकरेंचा शब्द

गेल्या 14 दिवसांपासून पाऊस पडत आहे आणि पुढे आणखी काही दिवस पडणार आहे. यामुळे मोठं नुकसान झालं आहे.
हेल्पलाईन सर्वत्र सुरु करुन शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. जितकी जास्त मदत करता येईल तितकी केली जाईल. त्यासंदर्भात काम सुरु असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले.

रब्बीची तयारी मोठ्या प्रमाणात केली पाहिजे पाण्याची उपलब्धता असल्यामुळे त्याचा वापर केला पाहिजे, असं मतही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं. मदतीचा ओघ हा आतापर्यंतच्या मदतीपेक्षा मोठा असणार आहे. मात्र नुकसान झालेल्या व्यक्तीपर्यंत मदत पोहोचलीच पाहिजे. चांगलं काम असेल तर ते नियमाच्या बाहेर जाऊन सुद्धा करु शकता, असंही मुख्यमंत्र्यांनी सुचवलं.

सत्तास्थापनेचा पेच लवकरच सुटेल. लवकरात लवकर सत्ता स्थापन झाली पाहिजे, कारण काळजीवाहू सरकार अधिक दिवस काम काम करू शकत नाही, जनतेची सुद्धा हीच इच्छा आहे, असं फडणवीस म्हणाले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *