काँग्रेसला सर्वात मोठा धक्का! राष्ट्रीय अध्यक्षासह संपूर्ण यूनियन भाजपमध्ये सामील, CM फडणवीसांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश

काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंदभाई परमार आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

काँग्रेसला सर्वात मोठा धक्का! राष्ट्रीय अध्यक्षासह संपूर्ण यूनियन भाजपमध्ये सामील, CM फडणवीसांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
Kammgar Union
Image Credit source: X
| Edited By: | Updated on: Jan 06, 2026 | 10:49 PM

राज्यात सध्या महानगर पालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, त्यामुळे राजकीय वातावरून ढवळून निघाले आहे. प्रचार सभांना वेग आला आहे. सर्वच बडे नेते पायाला भिंगरी लावून प्रचार करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदे, अजित पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे नेते प्रचारात व्यस्त आहेत. अशातच आता काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंदभाई परमार आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस भाजपमध्ये सामील

अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस या संघटनेचे महाराष्ट्रात सुमारे पन्नास हजार पदाधिकारी वेगवेगळ्या जिल्ह्यात काम करत असतात. आज या संघटनेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंदभाई परमार यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. नादपूरमधील भाजपच्या प्रभाग क्रमांक 36 मधील मुख्य कार्यालयात हा सोहळा पार पडला. यानंतर बोलताना परमार म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कामान प्रभावित होऊन देशभरातील सर्व पदाधिकारी यांनी भाजपात प्रवेश केला. आज सर्व सफाई कामगार हे भाजपात सामील धाले आहे. आम्ही दुखावलेलो आहे, आमची बाजू मांडणारे कोणीच नाही, केंद्राने योजना दिली त्याने आधार मिळाला. आता देशभरात भाजप जनता पार्टी सफाई कामगार सेल म्हणून कार्य करू.’

भाजपने सफाई कामगारांसाठी काम केले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या पक्षप्रवेशावर बोलताना म्हटले की, ‘अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस आता भाजपमय झाली. सफाई कामगार क्षेत्रात मोठी आणि प्रमुख संघटना होती, सफाई कामगार यांच्यासाठी संघटनेने आंदोलन केले, ती पूर्ण संघटना भाजपात विलीन होत आहे, याचा आनंद आहे. 1997 मध्ये महापौर होतो तेव्हा लाडपागे समिती अंतर्गत सुशिक्षीत मुलांना नौकरी देण्याच काम भाजपने केले. भाजपने सातत्याने सफाई कामगार बंधू, वाल्मिकी सुदर्शन समाजाला एकत्रित घेऊन कल्याणासाठी काम केले.’

भाजपच्या झेंड्याखाली आला याचा कधी पस्तावा होणार नाही

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, ‘मुख्यमंत्री झाल्यावर अनेक निर्णय घेतले, मधल्या सरकारने जीआर बदलला, पण 2022 मध्ये पुन्हा जीआर काढला, आपण तो जीआर संपूर्ण महाराष्ट्र मध्ये लागू केला. सफाई कामगार हक्कांसाठी भाजप लढणारा पक्ष असल्याचं दाखवून दिलं. वाल्मिकी समाजाला मत पाहिजे, आम्ही न्याय देत आहे. सगळी संघटना भाजपच्या झेंड्याखाली आणली आहे. श्रम साफल्य योजने अंतर्गत पक्के घर देण्याचा निर्णय घेतला आहे, नागपूरचे काम सुरू झाले आहे, सफाई कर्मचारी यांना मालकी हक्क देणार आहे. तुम्हाला भाजपच्या झेंड्याखाली आला याचा कधी पस्तावा होणार नाही, सर्वांचे भाजपात स्वागत करतो.’