राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना मुंबईत बोलावलं, नवा उपमुख्यमंत्री कोण? मोठी बातमी समोर
अजित पवार यांच्या निधनानंतर आता नवा उपमुख्यमंत्री कोण असणार? अशी चर्चा सुरू झालेली असतानाच मोठी बातमी समोर आली आहे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात घडामोडींना वेग आला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला, या अपघातामध्ये अजित पवार यांचं निधन झालं आहे. गुरुवारी शोकाकूल वातावरणामध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे, दरम्यान अजित पवार यांच्या निधनानंतर आता नवा उपमुख्यमंत्री कोण? अशी चर्चा सुरू झाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्रिपदासाठी सुनेत्रा पवार यांचं नाव आघाडीवर आहे, उपमुख्यमंत्रिपदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या गोटात हालचालींना वेग आला असून, मोठी बातमी समोर येत आहे.
ती म्हणजे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उद्या राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना मुंबईत बोलावण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्रिपदाबाबत एकमुखी निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती समोर येत आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे देखील आज मुंबईच्या पक्ष प्रदेश कार्यालयात दाखल झाले आहेत. राष्ट्रवादीकडे असलेल्या उपमुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय घेण्यासाठी सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावलं जाणार आहे. सर्व आमदारांना मुंबईमध्ये बोलावून एकमुखानं उपमुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या मुंबईत कार्यालयात कार्यकर्त्यांनी देखील मोठी गर्दी केली आहे.
सुनेत्रा पवार यांचं नाव चर्चेत
दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार अजित पवार यांच्या निधनानंतर आता राष्ट्रवादीकडे असलेलं उपमुख्यमंत्रिपद हे राष्ट्रवादीकडेच राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यासाठी आता सुनेत्रा पवार यांचं नाव चर्चेत आहे, उद्या पक्षाच्या सर्व आमदारांना मुंबईत बोलावण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे, याचवेळी उपमुख्यमंत्री कोण असणार? यावर एकमुखानं निर्णय होण्याची शक्यता आहे. यामध्ये सुनेत्रा पवार यांचं नाव चर्चेत असून, सुनेत्रा पवार यांच्याच नावावर उपमुख्यमंत्रीपदासाठी शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. इतरही दोन ते तीन नावांची चर्चा सुरू आहे, त्यामुळे नवा उपमुख्यमंत्री कोण असणार? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे, राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे.
