Amravati Election Reservation 2022 : अमरावती महापालिका निवडणुकीची आरक्षण सोडत जाहीर; जाणून घ्या वॉर्डनिहाय सविस्तर आरक्षण

Amravati Election Reservation 2022 : अमरावती महापालिका निवडणुकीसाठी आज आरक्षण सोडत जाहीर झाली. महापालिकेच्या 33 प्रभागातील 98 जागांसाठी मंगळवरी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. अमरावती महापालिकेचे आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी महानगरपालिकेच्या संत ज्ञानेश्वर नाट्यगृहात आरक्षण सोडतीची घोषणा केली.

Amravati Election Reservation 2022 : अमरावती महापालिका निवडणुकीची आरक्षण सोडत जाहीर; जाणून घ्या वॉर्डनिहाय सविस्तर आरक्षण
महापालिका निवडणूक आरक्षण सोडत
Follow us
| Updated on: Jun 17, 2022 | 5:07 PM

राज्यात महापालिका निवडणुकांचे (Municipal Elections) वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारविरुद्ध भाजप अशी रंगतदार लढत आगामी पालिका निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने 14 महापालिकांना 31 मेपर्यंत प्रभागनिहाय आरक्षण (Ward wise reservation) सोडत जाहीर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सोडत प्रक्रिया पार पडली. अशावेळी राज्यातील महापालिकांची आरक्षण सोडत कशी असेल, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. सर्व राजकीय पक्षांसह इच्छुक उमेदवारांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये मुंबई, नवी मुंबई, वसई विरार, उल्हासनगर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, नागपूर, सोलापूर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, कल्याण डोंबिवली आणि ठाणे महापालिकांचा समावेश आहे. चला तर जाणून घेऊया  अमरावती महापालिकेची इत्यंभूत वॉर्डनिहाय आरक्षण.

AMT

अमरावती महापालिका आरक्षण सोडत

अमरावती महापालिका निवडणुकीसाठी आज आरक्षण सोडत जाहीर झाली. महापालिकेच्या 33 प्रभागातील 98 जागांसाठी मंगळवरी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. अमरावती महापालिकेचे आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी महानगरपालिकेच्या संत ज्ञानेश्वर नाट्यगृहात आरक्षण सोडतीची घोषणा केली. या आरक्षण सोडतीमध्ये 49 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तर अनुसूचित जातीसाठी एकूण 17 जागा राखीव असून, यापैकी 9 जागा या एससी महिलांसाठी आहेत. 2 जागा या ST साठी आरक्षीत आहेत. त्यापैकी 1 जागा महिलांसाठी राखीव आहे. तर 39 जागा ओपन महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

मागील निवडणुकीत 22 प्रभागातून 87 सदस्य निवडून आले होते तर यावेळी 33 प्रभागातून 98 सदस्य निवडून दिले जाणार आहेत. महीला आरक्षणामुळे काही निवडणूक इच्छूक उमेदवारांचे गणित बिघडले आहे. तर काहींसाठी मात्र ही आरक्षणाची सोडत सोयीची झाली आहे.

अमरावती महापालिकेतील पक्षीय बलाबल

भाजप – 45

शिवसेना – 7

काँग्रेस – 15

एमआयएम – 10

बीएसपी – 5

रिपाई (आठवले गट )- 1

स्वाभिमानी पार्टी – 3

अपक्ष – 1

एकूण संख्या-87

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.