AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘जिभेवर आणि विधानांवर ताबा ठेवा नाहीतर…’, भाजप खासदाराला थेट धमकी, अमरावतीत वातावरण तापले, कारण तरी काय?

Islamic Information Centre signboard : गेल्या काही वर्षांपासून अमरावती हे धार्मिक कट्टरता वाद्यांचा अड्डा होत असल्याचे समोर येत आहे. काही देशविघातक संघटनांचे स्लीपर सेल येथे सक्रिय असल्याचेही समोर आले होते. अशाच एका वादातून भाजप खासदाराला थेट धमकीचा ई-मेल आला आहे.

'जिभेवर आणि विधानांवर ताबा ठेवा नाहीतर...', भाजप खासदाराला थेट धमकी, अमरावतीत वातावरण तापले, कारण तरी काय?
भाजप खासदाराला थेट धमकी
| Updated on: Nov 16, 2025 | 3:42 PM
Share

MP Anil Bonde : अमरावतीत तीन दिवसांपूर्वी इस्लामिक इन्फॉर्मेशन सेंटरचे फलक लागल्याचे प्रकरण समोर आले होते. या बॅनर विरोधात आवाज उठवल्या नंतर आता भाजप खासदार अनिल बोंडे यांना धमकी वजा इशारा देणारा ई-मेल हैदराबादमधून आला आहे.बोंडे यांच्या कार्यालयाकडून अमरावतीच्या राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. काल रात्री अनिल बोंडे यांना हा मेल आला. मुख्य चौकांमध्ये इस्लामच्या प्रचाराचे फलक लागतेच कसे, असा सवाल खासदार अनिल बोंडेंनी पोलिसांनाही विचारला होता. त्यानंतर त्यांना धमकीचा ई-मेल आल्याने अमरावतीत वातावरण तापले आहे.

नेमकं काय आहे मेल मध्ये?

अस्सलामुअलेकुम डॉ. साहेब, अशी या ई-मेलची सुरुवात आहे. इस्लामिक इन्फॉर्मेशनच्या विरोधात आपण जे शब्द वापरले, त्यांनी हैदराबादच्या मुसलमानांच्या मनात अशी आग लावली आहे की येथील वातावरण आता अतिशय तंग आणि तापलेले आहे. आपल्या बोलण्याने आमच्या मजहबी गैरतला जेवढा धक्का पोहोचला, तो राग आता लोकांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. वृद्ध, तरुण, युवक, कुणाच्याही मनावर आता ताबा राहिलेला नाही.

आपण समजून घ्या डॉ. साहेब, ही सामान्य नाराजी नाही, हा तो राग आहे जो एका ठिणगीवर वणवा बनू शकतो. आपण आमची ओळख, आमचा दिन, आमची तालीम या सगळ्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचं धाडस केलं,आणि त्यामुळे संपूर्ण समुदायाच्या भावना जखमी झाल्या.

आज हैदराबादच्या महोल्ल्यांमध्ये आपल्या वक्तव्यामुळे अशी बेचैनी आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे, की लोक आपला त्रास आणि आपला राग लपवूही शकत नाहीत. आम्ही तुम्हाला एवढंच सांगतो. आपण जी आग लावली, तिचा धूर आता खूप दाट झाला आहे. आपल्या प्रत्येक हावभावात येथील मुस्लिम समाजाला एक उघड्या जखमेप्रमाणे वेदना जाणवत आहे.

म्हणूनच, आपल्या जिभेवर आणि आपल्या विधानांवर संयम ठेवा. कारण, डॉ. साहेब, यावेळी आवरणे खूप अवघड झाले आहे. एक चुकीचा शब्दही वातावरण बिघडवण्यासाठी पुरेसा आहे. असा या ई-मेलमध्ये म्हटले आहे. हैदराबादची नाराज मुस्लिम बिरादरी म्हणून ई-मेलच्या अखेरीस उल्लेख आहे.

भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा.