AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video Amravati fatal attack | रेती तस्करी करणारे ट्रॅक्टर पुढं पुढं तलाठ्यांची गाडी मागे, चालकाचा तलाठ्यांवर जीवघेणा हल्ला!

अमरावतीत रेती तस्कराला पकडण्यासाठी तलाठी पाठलाग करत होते. ट्रॅक्टर पुढं पुढं आणि तलाठ्यांची गाडी मागे मागे. शेवटी तलाठ्यांनी ट्रॅक्टर चालकाला थांबवलं. पण, त्याने तलाठ्यांच्या गाडीवरच जीवघेणा हल्ला केला. ट्रॅक्टर कसा सुसाट पळत होता पाहा व्हिडीओ...

Video Amravati fatal attack | रेती तस्करी करणारे ट्रॅक्टर पुढं पुढं तलाठ्यांची गाडी मागे, चालकाचा तलाठ्यांवर जीवघेणा हल्ला!
अमरावतीत सुसाट वेगाने पळताना रेती तस्करांचा ट्रक्टर. Image Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: Apr 13, 2022 | 2:27 PM
Share

अमरावती : जिल्ह्यातील दर्यापूर (Daryapur) तालुक्यातील नांदेड (Nanded) बुद्रुक रेती घाटामध्ये अवैधरित्या रेतीची तस्करी होत होती. याची गुप्त माहिती दर्यापूर तहसीलच्या तहसीलदार यांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे तहसीलदार यांनी आपले सहकारी अतुल दाळू तलाठी दारापूर, तलाठी राहुल आवारे नांदेडा, तलाठी भारत महाजन मार्कंडा, तलाठी सौरभ वानखडे वडुरा या चार तलाठ्यांना घटनास्थळी पाठविले. सदर रेती घाटातून रेती तस्करी करणारा ट्रॅक्टर चालक मालक रेती घेऊन घाटातून (Reti Ghat) फरार होत होता. तलाठ्यांनी त्याचा पाठलाग केला. थांबविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने तलाठ्यांच्या वाहनावर ट्रॅक्टर चढवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तलाठ्यांना काही वेळ ट्रॅक्टरचा पाठलाग देखील केला. यात तलाठ्यांची चारचाकी गाडीचा धडक दिली. ट्रॅक्टर पळून जाण्यात यशस्वी ठरला.

बालबाल बचावले

सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण, सरकारी गाडी चेपकली. तिचा काच फुटला. तलाठी थोडक्यात बचावले. त्यानंतर रेती तस्कर हा घटनास्थळावरून फरार झाला. सदर घटनेची माहिती फिर्यादी तलाठी राहुल आवारे यांनी दर्यापूर पोलीस स्टेशनला दिली. ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. रेती तस्कराच्या या दादागिरीमुळे महसूल विभागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशी माहिती तलाठी राहुल सहारे यांनी दिली.

पाहा व्हिडीओ

अशी घडली घटना

राहुल सहारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चार तलाठी निघत होतो. सलमान शेख यांचा मुलगा रेतीचे उत्खनन करतो, अशी माहिती मिळाली. दोन ट्राल्या प्लाटवर टाकल्या होत्या. तिसरी ट्रीप ट्रक्टर चालक काढत असताना लपून बसलो. त्याच्या गाडीकडं गेलो होतो. तेव्हा त्याचा पाठलाग केला. ट्रक्टरसमोर गाडी लावली. सहकारी उतरले. गाडी लावली तशीच त्याला थांब म्हटलं, तो थांबला नाही. सहकारी सौरभ वानखेडे यांच्यावरून वाहन चालविण्याचा प्रयत्न केला. रेती रस्त्यावर उतरवून रस्ता थांबवला. मालक आले. त्यांनी कशाला त्रास देता म्हटलं. शिवाय तलाठ्यांवरच अरेरावी करत होता. त्यामुळं रेती तस्कराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Video Nagpur freestyle | सात युवतींमध्ये जोरदार फ्रिस्टाईल, भर रस्त्यावर सुरू आहे झटापट, नागपुरात व्हिडीओ व्हायरल

Nanded Murder : प्रेयसीच्या मुलाच्या हत्येप्रकरणी आरोपी प्रियकराला 10 वर्षे सक्तमजुरी

Chandrapur Crime | चंद्रपुरातील युवतीचे हत्या प्रकरण, मुख्य आरोपी गजाआड, दोन मैत्रिणींच्या द्वेषातून हत्या?

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.