AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: फडणवीसांनी आमचं संभाषण चोरासारखं ऐकलं, अनिल गोटेंची पोलीस आयुक्तांकडे तक्रार

प्रवीण चव्हाण स्टिंग ऑपरेशन प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटे यांनी आज मुंबई पोलीस आयुक्तांकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात तक्रार केली आहे. फडणवीसांनी आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला आहे, असं गोटे यांनी तक्रारीत म्हटलं आहे. फडणवीस यांच्या विरोधात मी तक्रार केली आहे.

VIDEO: फडणवीसांनी आमचं संभाषण चोरासारखं ऐकलं, अनिल गोटेंची पोलीस आयुक्तांकडे तक्रार
फडणवीसांनी आमचं संभाषण चोरासारखं ऐकलं, अनिल गोटेंची पोलीस आयुक्तांकडे तक्रारImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Mar 15, 2022 | 5:20 PM
Share

मुंबई: प्रवीण चव्हाण (pravin chavan) स्टिंग ऑपरेशन प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटे (anil gote) यांनी आज मुंबई पोलीस आयुक्तांकडे (mumbai police commissioner) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात तक्रार केली आहे. फडणवीसांनी आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला आहे, असं गोटे यांनी तक्रारीत म्हटलं आहे. फडणवीस यांच्या विरोधात मी तक्रार केली आहे. असं कुणाचंही कुणाला संभाषण ऐकता येत नाही. ते जाहीर तर करताच येत नाही. पण त्यांनी चोरासारखं ऐकलं. लबाडासारखं रेकॉर्ड केलं. केलं ते खोटं केलं. काही तरी तोडमोड करून, आमचा आवाज तोडमोड करून केलं आहे. हे कृत्य केवळ गुन्हेगारच करू शकतो. या संभाषणानुसार आम्ही काही केलं असतं तर ते खरं ठरलं असतं. आम्ही केलंच नाही. काही झालंच नाही. मी माझ्या केससाठी गेलो होतो. तिथे त्यांनी कॅमेरे लावले. उद्या त्यांच्या घरी कुणी कॅमेरे लावले तर चालेल का त्यांना? असा साल अनिल गोटे यांनी केला.

अनिल गोटे यांनी मीडियाशी संवाद साधताना फडणवीसांवर टीका केली. फडणवीसांबद्दल यापूर्वीही मी बोललो आहे. फडणवीस हे लबाड, कपटी, कारस्थानी, दगलबाज आहेत. मराठीतील जेवढी विशेषणे असतील तेवढी कमी पडतील असा माणूस आहे हा, असा हल्ला गोटे यांनी लगावला.

फडणवीसांवर गोटेंचा राग का?

चार दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत पेन ड्राईव्ह बॉम्ब टाकला होता. सरकारी वकील प्रवीण चव्हाण हे काही नेत्यांना हाताशी धरून भाजप नेते गिरीश महाजन यांच्याविरोधात कट रचत असल्याचा दावा फडणवीस यांनी केला होता. त्यांनी चव्हाण आणि काही नेत्यांचं संभाषणही वाचून दाखवलं होतं. त्यात अनिल गोटे यांचंही संभाषण होतं. त्यामुळेच गोटे यांनी आज फडणवीसांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

व्हिडीओ-34-जे

सरकारी वकिल म्हणतात, नवाब मलिक यांनी सांगायचे असते की, हा जो फ्रॉड आहे तो मला देवेंद्र फडणवीस यांनीच करायला सांगितला. जे 10 कोटी भाजपाला दिले, ते डोनेट करायला मला देवेंद्र फडणवीस यांनीच सांगितले आणि मी ते केले, असेही सांगायचे. ते गोटे यांना विचारतात, 2014 मध्येच डोनेट केले ना? केव्हा केले निवडणुकीच्या आधी की नंतर? जोरदार पत्रपरिषद घ्या! जयंत पाटील यांना कॉल अनिल गोटे जयंत पाटील यांना फोन लावतात आणि म्हणतात, आम्हाला भेटायचे आहे, तुम्हाला अर्जंट. उद्या मुंबईत भेटायचे काय? मग हा फोन अ‍ॅड. चव्हाण यांना देतात. मग ते बोलू लागतात, मागचे विषय राहिले आहेत. आता पांडे साहेब आले आहेत. मेडिकलची फाईल आहे. उद्या किती वाजता? 3 वाजता का? यांना एक तक्रार ड्राफ्ट करून देतो आहे. उद्या ते ईडीकडे जाणार आहेत. या कॉलवर बोलले तर चालेल ना. जयंतराव सांगतात, फेसटाईमवर बोला. मग फेसटाईमवर फोन लावला जातो. पण, जयंतराव उचलत नाहीत.

संबंधित बातम्या:

अजितदादा हे तुमच्याबद्दल आहे, फडणवीसांचा सभागृहात पेनड्राईव्ह बॉंब, अजित पवार काय बोलणार?

फडणवीसांनी विधानसभेत मांडला महाविकास आघाडीचा “महाकत्तलखाना”, सरकारवर आरोपांची सरबत्ती

अंबरनाथचा पारा 42 अंशांवर, विदर्भालाही टाकलं मागे; राज्यातील इतर जिल्ह्यांची स्थिती काय?

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.