औरंगाबाद विद्यापीठात कुलसचिवांच्या कार्यालयात पदाधिकाऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

विद्यापीठाच्या कुलसचिव डॉ. जयश्री सुर्यवंशी यांच्या कार्यालयात त्यांच्यासमोर पदाधिकाऱ्याने अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. विद्यापीठ फंडातून एकत्रित वेतनावर रोजंदारी कामगारांना नियुक्त करण्यात यावे या मागणीसाठी पदाधिकाऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला.

औरंगाबाद विद्यापीठात कुलसचिवांच्या कार्यालयात पदाधिकाऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न
कुलसचिवांच्या कार्यालयात पदाधिकाऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कामगार संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला. विद्यापीठाच्या कुलसचिव डॉ. जयश्री सुर्यवंशी यांच्या कार्यालयात पदाधिकाऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी कार्यालयात राडा झाला. पदाधिकारी आक्रमक झाला होता तर डॉ. जयश्री सुर्यवंशी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत होता.

औरंगाबाद विद्यापीठात कुलसचिवांच्या कार्यालयात राडा

विद्यापीठाच्या कुलसचिव डॉ. जयश्री सुर्यवंशी यांच्या कार्यालयात त्यांच्यासमोर पदाधिकाऱ्याने अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. विद्यापीठ फंडातून एकत्रित वेतनावर रोजंदारी कामगारांना नियुक्त करण्यात यावे या मागणीसाठी पदाधिकाऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला.

थकीत वेतनाच्या मागणीसाठी पदाधिकाऱ्याचा आत्महदनाचा प्रयत्न

रोजंदारी कर्मचारी, सफाई कर्मचारी, सुरक्षा रक्षकांचे थकित वेतन मिळावं, यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी कोणत्याही परिस्थितीत थकित वेतन मिळावं, यासाठी पदाधिकाऱ्याने कुलसचिवांच्या कार्यालयातच धिंगाणा घातला.

कार्यालयात यावेळी पदाधिकाऱ्यांनी मोठी घोषणाबाजी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, कामगारांचं शोषण करणाऱ्यांचा धिक्कार असो, अशा घोषणा यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिल्या. वेतन थकवण्याला जे कुणी संबंधित असतील त्यांच्यावर अॅक्शन घ्या, त्यांना मेमो पाठवा, असं सांगत आमचं वेतन तात्काळ जमा करण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी केली.

(Attempt of self-immolation in the DR babasaheb Ambedkar Marathwada University Aurangabad)

हे ही वाचा :

रावसाहेब दानवेंच्या मनात 40 वर्षांपासून एकच सल, भागवत कराड यांना भर सभेत मिश्किल टोला, नेमकं काय म्हणाले ?

पैठणमध्ये ‘लाल चिखल’, औरंगाबादमध्ये शेतमालाला मातीमोल दर, शेतकऱ्यांची परवड सुरुच

गोपीनाथ मुंडे नसते तर पारावर हरिपाठ करत बसलो असतो: रावसाहेब दानवे

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI