पावसाचे संकेत देतोय ठिपकेदार पिंगळा, औरंगाबादेतील सोयगावच्या जंगलात दुर्मिळ पक्षी, शेतकऱ्यांमध्ये उत्साह!

औरंगाबाद: जिल्ह्यातील सोयगावच्या वेताळवाडीच्या जंगलात मृगाच्या पावसाचे (Rainfall) संकेत देणारा ठिपकेदार पिंगळा पक्षी (Pingla Bird) आढळल्याने शेकतऱ्यांमध्ये उत्साह संचारला आहे. अशा प्रकारच्या ठिपकेदार पिंगळा पक्ष्याचे दर्शन म्हणजे संबंधित भागात मृगाची जोरदार हजेरी लागण्याचे संकेत असतात. त्यामुळे पिंगळ्याच्या दर्शनानं सोयगावातला शेतकऱ्यालाही उत्साहाचं भरतं आलंय. औरंगाबाद जिल्ह्यातील विविध भागात सध्या पावसानं हजेरी लावली आहे. मात्र सोयगाव (Soygaon) […]

पावसाचे संकेत देतोय ठिपकेदार पिंगळा, औरंगाबादेतील सोयगावच्या जंगलात दुर्मिळ पक्षी, शेतकऱ्यांमध्ये उत्साह!
Follow us
| Updated on: Jun 12, 2022 | 10:34 AM

औरंगाबाद: जिल्ह्यातील सोयगावच्या वेताळवाडीच्या जंगलात मृगाच्या पावसाचे (Rainfall) संकेत देणारा ठिपकेदार पिंगळा पक्षी (Pingla Bird) आढळल्याने शेकतऱ्यांमध्ये उत्साह संचारला आहे. अशा प्रकारच्या ठिपकेदार पिंगळा पक्ष्याचे दर्शन म्हणजे संबंधित भागात मृगाची जोरदार हजेरी लागण्याचे संकेत असतात. त्यामुळे पिंगळ्याच्या दर्शनानं सोयगावातला शेतकऱ्यालाही उत्साहाचं भरतं आलंय. औरंगाबाद जिल्ह्यातील विविध भागात सध्या पावसानं हजेरी लावली आहे. मात्र सोयगाव (Soygaon) तालुक्यात मृगनक्षत्र कोरडे जाण्याची भीती व्यक्त केली जात होती. अशातच वेताळवाडीच्या जंगलात मृगाच्या पावसाचा सांगावा घेऊन येणारा पक्षी दिसलाय. त्यामुळे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. पिंगळा पक्षी आकाशाकडे टक लावून पाहतो, तेव्हा जोरदार पाऊस पडण्याचे संकेत मानले जातात.

वनविभागानं घेतली दखल

मृग नक्षत्र सुरु होऊन एक आठवडा संपत आलाय. तरीही पावसानं हजेरी न लावल्यामुळे सोयगावचे शेतकरी चिंचेच होते. यावर्षी मृग नक्षत्र कोरडेच जाते की काय, अशी भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत होती. मात्र अशातच पावसाचे संकेत देणारा दुर्मिळ पिंगळा पक्षी अचानक आढळल्याने शेतकऱ्यांच्या मनात आशा पल्लवित झाल्या आहेत. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या निरिक्षणात हा पक्षी आढळला असून, वन विभागाने त्याचे छायाचित्र टिपले. हा पक्षी आकाशाकडे टक लावून पाहण्याच्या हालचालीही टिपल्या. या पक्ष्यानं आकाशात एकटक पाहिलं की, पुढील काही दिवसात जोरदार पाऊस पडतो, असे संकेत मानले जातात. वनविभागाने या पक्ष्याच्या हजेरीची माहिती शेतकऱ्यांना देऊन त्यांनाही दिलासा दिला आहे.

मराठवाड्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस

मराठवाड्यातील औरंगाबाद, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु झाला आहे. या वर्षी मराठवाड्यात अतिपावसाचा इशारा देण्यात आला आहे. काल अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यात औरंगाबाद जिल्ह्यातील दोन तर जालन्यातील तिघांचा वीज पडून मृत्यू झाला. औरंगाबादमध्ये सिल्लोडमधील सावखेडा येथील संजय नथ्थू उटाडे, पैठण येथील गजानन हरिश्चंद्र दराडे, भोकरदन येथील गंगाबाई पांडुरंग जाधव, मंठा येथील अनिल भारत शिंदे, तर वसंत वामनराव जाधव यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.