Aurangabad : मुलाला कामावरुन काढल्याचा राग! बापाने मित्रांसह औरंगाबादेत खासगी रुग्णालय फोडलं

Aurangabad Crime : खुर्च्या ,टेबल या टोळक्यानं फेकून देत संताप व्यक्त केला. सुदैवानं या तोडफोडीत कुणालाही जखम झाली नाही.

Aurangabad : मुलाला कामावरुन काढल्याचा राग! बापाने मित्रांसह औरंगाबादेत खासगी रुग्णालय फोडलं
रुग्णालयाची तोडफोडImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 22, 2022 | 7:59 AM

औरंगाबाद : मुलाला कामावरुन कमी केल्याच्या रागातून वडिलांनी चक्क रुग्णालय फोडलंय. ही घटना औरंगाबाद मधील (Aurangabad) बजाजनगर परिकरात घडली. बजाजनगर (Bajaj Nagar) परिसरात असलेल्या खासगी रुग्णालयात तीन ते चार जणांच्या टोळीनं रुग्णालयावर हल्ला करत तोडफोड केली. आपल्या मुलाला कामावरुन कमी केल्याचा राग या मुलाच्या वडिलांना सहन झाला नाही. या रागातूनच वडिलांनी आपल्या मित्रांना सोबत घेत रुग्णालयात तुफान तोडफोड केली आहे. खासगी रुग्णालयात करण्यात आलेल्या या तोडफोडीमध्ये रुग्णालयाचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी (Aurangabad Police) गुन्हा दाखल करुन घेत चौघांना अटकही केली आहे. तोडफोड करतानाही ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली आहे.

Video : रुग्णालयात तोडफोड

रुग्णालयात राडा

औरंगबादच्या वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका खासगी रग्णालयावर तीन चे चार जणांनी हल्ला चढवला. यावेळी रुग्णालयाच्या सामानाची नासधूस करण्यात आलं. खुर्च्या ,टेबल या टोळक्यानं फेकून देत संताप व्यक्त केला. सुदैवानं या तोडफोडीत कुणालाही जखम झाली नाही. मात्र रुग्णालयातील सामानाचं मोठं नुकसान झालंय.

हे सुद्धा वाचा

पाहा व्हिडीओ :

तोडफोड करणाऱ्यांना अटक

वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये या हल्ल्याप्रकरणी तक्रार नोंदवण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतलाय. तसंच तोडफोड करणाऱ्यांना ताब्यातही घेतलंय. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींच्या चौकशीतून या तोडफोडीचं कारण समोर आलंय. मुलाला नोकरीवरुन कमी केल्याच्या रागातून वडिलांनी हे कृत्य केलंय. मात्र मुलाला नोकरीवरुन काढून का टाकण्यात आलं, याचं कारण समजू शकलेलं नाही.

रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तोडफोडीची ही घटना कैद झाली होती. या सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी तोडफोड करणाऱ्या या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.