Aurangabad | Raj Thackeray यांची तोफ धडाडणार, उरले फक्त काही तास, भाषणातले 10 संभाव्य मुद्दे कोणते?

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेवरील नाराजी कॅश करण्यासाठी राज ठाकरेंनी हिंदुत्वाचं शस्त्र हाती घेतलं असून मुंबई, ठाणे, पुण्यानंतर थेट औरंगाबदमध्ये सभा भरवली आहे. औरंगाबादच्या आजच्या सभेत राज ठाकरे कोणत्या विषयावर बोलतील, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

Aurangabad | Raj Thackeray यांची तोफ धडाडणार, उरले फक्त काही तास, भाषणातले 10 संभाव्य मुद्दे कोणते?
राज ठाकरे यांचं औरंगाबादेत जंगी स्वागतImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 01, 2022 | 7:29 AM

औरंगाबादः मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या सभेला आता फक्त काही तास उरले आहेत. औरंगाबादमधील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर आज महाराष्ट्र दिनी होणारी राज ठाकरे यांची सभा ऐतिहासिक असेल, असा दावा मनसेकडून (MNS) करण्यात येत आहे. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या एकानंतर एक अशा विजयी सभा गाजवलेलं हे मैदान आज राज ठाकरे यांच्या सभेनं भरणार असून पुन्हा एकदा ठाकरी आवाज येथे घुमणार आहे. औरंगाबाद हा शिवसेनाचा बालेकिल्ला होता… तो भूतकाळ होता, सध्याचं चित्र वेगळं आहे. बहुतांश औरंगाबादकर शिवसेनेच्या कामगिरीवर नाराज आहे, अशी टीका मनसेकडून करण्यात येतेय. तर हा राज ठाकरेंनी कितीही जनसमुदाय जमवला तरीही ते केवळ नकला पाहण्यासाठी येतील, औरंगाबादमधील शिवसेनेचं स्थान अढळ आहे, असा विश्वास शिवसेनेनं व्यक्त केला आहे. एकूणच, आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेवरील नाराजी कॅश करण्यासाठी राज ठाकरेंनी हिंदुत्वाचं शस्त्र हाती घेतलं असून मुंबई, ठाणे, पुण्यानंतर थेट औरंगाबदमध्ये सभा भरवली आहे. औरंगाबादच्या आजच्या सभेत राज ठाकरे कोणत्या विषयावर बोलतील, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. त्यांच्या भाषणातील संभाव्य 10 मुद्दे पुढील प्रमाणे असतील.

  1.  मस्जिदिवरील भोंगे उतरवण्यासंदर्भात राज ठाकरे आक्रमक बोलू शकतील.
  2.  मस्जिदिवरील भोंग्यांबाबत दिलेल्या अलटीमेटम बाबत निर्णायक भूमिका जाहीर करू शकतील.
  3. औरंगाबादनंतर राज ठाकरे अयोध्या दौरा करणार आहेत. त्याबाबत भूमिका मांडण्याची शक्यता आहे.
  4. हिंदुत्ववादी भूमिकेबद्दल आक्रमक भूमिका घेतील.
  5. औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर करण्याबाबत बोलण्याची शक्यता आहे.
  6. औरंगाबाद शहरातील एमआयएमच्या वाढत्या ताकतीबद्दलबद्दल राज ठाकरे टीकेची झोड उठवणार
  7. औरंगाबाद शहराच्या विकासाबद्दल शिवसेनेवर हल्लाबोल करणार
  8. औरंगाबाद शिवसेनेचा गड आहे की नाही याबाबत तुफान टीका करणार
  9. इम्तियाज जलील यांच्या इफ्तार पार्टीच्या निमंत्रणाचा समाचार घेण्याची शक्यता आहे.
  10. हनुमान चालीसाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका मांडणार

बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा.
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?.
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्..
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्...