AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमची मैत्री कायम… दादा भुसेंसमोरच संजय राऊत यांचं भुवया उंचावणारं विधान; पडद्यामागे काही घडणार?

Dada Bhuse And Sanjay Raut: 178 कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपाप्रकरणी मालेगाव कोर्टात आज खासदार संजय राऊत आणि मंत्री दादा भुसे हे हजर झाले. दोघांनी एकत्र येत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊतांना भुसेंसोबतची मैत्री कायम असल्याचे मोठे वक्तव्य केले.

आमची मैत्री कायम... दादा भुसेंसमोरच संजय राऊत यांचं भुवया उंचावणारं विधान; पडद्यामागे काही घडणार?
दादा भुसे, संजय राऊत मैत्री कायमImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Edited By: | Updated on: Feb 21, 2026 | 12:29 PM
Share

Dada Bhuse And Sanjay Raut: खासदार संजय राऊतांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर 178 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर बदनामी केल्याचे सांगत फौजदारी खटला भुसे यांनी मालेगाव न्यायालयात दाखल केला होता. या खटल्याच्या सुनावणाीसाठी आज संजय राऊत आणि भुसे मालेगाव कोर्टात हजर झाले. यावेळी दादा भुसे यांनी राऊतांवरील दाखल खटला मागे घेतल्याचा दावा केला. तर आमची मैत्री कायम असल्याचे वक्तव्य करून राऊतांनी अनेकांच्या विकेट काढल्या. त्यामुळे पडद्यामागे काही घडणार का, अशा चर्चांना उधाण आले आहे.

आमचे मैत्रीचे संबंध कायम

हा खटला मागे घेतल्यानंतर दोन्ही नेते एकत्रच माध्यमांसमोर आले. त्यावेळी संजय राऊत यांनी दादा भुसे यांच्यांसोबतची मैत्रीचे संबंध कायम राहतील अशी ग्वाही दिली. कोर्टात खटला चालू होता. दादा भुसे आणि आमच्यात तोडगा निघाला आहे. मी जे विधान केलं होतं. ते चुकीचं होतं, असे राऊत म्हणाले. हे नंतर माझ्या पडताळणीनंतर लक्षात आलं. त्यामुळे मी खटला मागे घेण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणाशी आमचा थेट संबंध नव्हता. अद्वैत हिरे यांनी जी माहिती दिली त्यामुळे आम्ही त्यात गुंतलो.आता आम्ही खटला मागे घेतला. अद्वैत हिरे सत्तेत आहेत. त्यांना लढायचं तर ते लढू शकतात, असा टोलाही त्यांनी लगावला.

आम्हाला दोघांना न्यायालयाने पहिले. आता वादाचा विषय संपला आहे. ज्यांच्यामुळे हा विषय आला तेही दुसऱ्या पक्षात गेले आहेत. दादा भुसे आणि माझे मैत्रीचे संबंध कायम आहेत. मालेगावच्या शेतकऱ्यांचा आणि नागरिकांचा संभ्रम आणि त्यांच्या तब्बेतीचा विचार करता हा दावा संपवला आहे. राऊत यांनी दिलगिरी व्यक्त करून संपवला असे दादा भुसे यावेळी म्हणाले.

दादा भुसे म्हणाले काय?

यावेळी माध्यमांशी बोलताना दादा भुसे म्हणाले की, राऊतांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यांच्या तब्येतीचंही कारण आहे. त्यामुळे खटला मागे घेऊ. त्यांचा मान राखू असं शेतकर्‍यांनी सांगितलं आहे. आम्ही राऊत यांच्या हाताखाली काम केलं आहे. दादा भुसे काय करतो आणि काय करू शकतो हे त्यांना माहीत आहे. त्यांनी खातरजमा केली नाही. पण नंतर माहिती घेतल्यावर त्यांनी चूक दुरूस्त केली.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली