AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Pawar: नागरी विमान वाहतूक मंत्र्यांकडे बोट…रोहित पवारांची मोठी मागणी, एकच खळबळ

Rohit Pawar on Kinjarapu Rammohan Naidu: अजितदादांच्या विमान अपघाताप्रकरणी आमदार रोहित पवार यांनी आज तिसरी पत्रकार परिषद दिल्लीत घेतली. यावेळी त्यांनी थेट नागरी विमान वाहतूक मंत्र्यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली. त्यांनी यावेळी मोठा आरोप केला. काय म्हणाले रोहित पवार?

Rohit Pawar: नागरी विमान वाहतूक मंत्र्यांकडे बोट...रोहित पवारांची मोठी मागणी, एकच खळबळ
रोहित पवार, किंजरापू राममोहन नायडूImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Feb 21, 2026 | 12:05 PM
Share

Rohit Pawar on Kinjarapu Rammohan Naidu: माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा 28 जानेवारी 2026 रोजी बारामती विमानतळावर विमान अपघातात मृत्यू झाला. हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. वैमानिकाचा वापर करून हे विमान कोसळण्यात आल्याची शंका त्यांनी यापूर्वी व्यक्त केली आहे. तर VSR कंपनीला आणि त्याच्या मालकाला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी यापूर्वी केला होता. आज दिल्लीत आमदार रोहित पवार यांनी तिसरी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू यांचा राजीनामा घेण्याची मोठी मागणी केली. त्यावेळी त्यांनी मोठे वक्तव्य केले.

नागरी उड्डाण मंत्र्यांचा राजीनामा घ्या

नागरी उड्डाण मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. आम्ही मोदी आणि अमित शाह यांच्याकडे मागणी करत आहोत. राहुल गांधी यांनीही हा विषय हाती घ्यावा ही विनंती करतो. टीडीपीचे मंत्री आहेत. त्यांचा राजीनामा घ्यावा. ही आमची मागणी आहे, असे रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत म्हटले. यापूर्वी सुद्धा त्यांनी व्हीएसआर कंपनीच्या मालकाचे आणि देशातील बड्या राजकारण्यांचे हितसंबंध असल्याचा आरोप केला होता. तर एक खासदार या कंपनीचा भागीदार असल्याचा आरोपही पवार यांनी केला होता.

तेलगू देसमचे व्हीएसआरसोबत चांगले संबंध

व्हीएसआर कंपनीचे मालक आणि तेलुगु देसम पक्षाचे चांगले संबंध आहेत. सध्याचे केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री हे त्याच पक्षाचे आहेत. त्यामुळे विमान अपघात प्रकरणात निष्पक्ष तपास होईल का अशी शंका यापूर्वी रोहित पवार यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे मंत्री के. राममोहन नायडू यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी रोहित पवार यांनी या अगोदरही केली होती. अपघाताला आता इतके दिवस उलटून गेले आहेत. त्यामुळे या काळात खोटी कागदपत्रे तयार केली जात तर नाही ना, अशी शंकाही त्यांनी आजच्या पत्रकार परिषदेतून व्यक्त केली.

अजितदादांच्या मृत्यूमागे व्यापक कट

तर रोहित पवार यांनी पुन्हा अजितदादांच्या मृत्यूमागे व्यापक कट असल्याचे संकेत दिले. हा अपघात नसून घातपात असल्याबाबत रोहित पवार यांनी पुन्हा केला आहे. व्हीएसआर कंपनी, नागरी उड्डाण वाहतूक महासंचालनालय यांच्याविषयीची शंका त्यांनी पुन्हा बोलून दाखवली. विमानातील इंधनटाक्यावरून त्यांनी पुन्हा एकदा हा एक व्यापक कट असल्याची शंका उपस्थित केली.  त्यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याप्रकरणात लक्ष्य घालण्याची मागणी रोहित पवार यांनी केली.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...