Video : पुढं पोलीस गाडी, मागं एसटी, औरंगाबादमध्ये 10 दिवसानंतर धावली पहिली बस

पैठण आगारातून पोलीस बंदोबस्तात पहिली एसटी बस रवाना झालीय. पैठण पाचोड या रस्त्यावर 10 दिवसानंतर पहिली बस धावली आहे.

Video : पुढं पोलीस गाडी, मागं एसटी, औरंगाबादमध्ये 10 दिवसानंतर धावली पहिली बस
पैठण डेपोतून धावली पहिली एसटी
दत्ता कानवटे

| Edited By: Yuvraj Jadhav

Nov 20, 2021 | 7:42 PM

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण आगारात एसटी संपात फूट पडल्याचं समोर आलं आहे. पैठण आगारातून पोलीस बंदोबस्तात पहिली एसटी बस रवाना झालीय. पैठण पाचोड या रस्त्यावर 10 दिवसानंतर पहिली बस धावली आहे. तर, सागंली जिल्ह्यात देखील काही आगारांमध्ये एसटीच्या फेऱ्या सुरु झाल्याची माहिती आहे.

पुढे पोलीस मागं एसटी

एसटी कर्मचाऱ्यांचा संप गेल्या 10 दिवसांपासून सुरु आहे.विलिनीकरण या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचारी संपावर गेलेले आहेत. त्यामुळं राज्यभरातील प्रवासी वाहतूक विस्कळीत झालीय. संपावर तोडगा निघत नसल्यानं आणि एसटी प्रशासनाकडून निलंबनासारखी कारवाई सुरु असल्यानं काही ठिकाणी संपकरी कर्मचारी कामावर परतत असल्याचं चित्र आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण आगारात एक चालक आणि एक वाहक कामावर रुजू झाल्यानंतर एसटी बस धावली आहे. पुढे पोलीस गाडी आणि मागे बस गाडी आशा स्थितीत ही बस सुटली आहे.

सांगलीत शिवसेनेचं एसटीला संरक्षण

गेल्या अनेक दिवसांपासून सांगली मध्ये एसटी कर्मचाऱ्याचा संप सुरू आहे. जनतेला एसटीची सोय व्हावी यासाठी शिवसेना रस्त्यावर उतरली आहे. तर काही भाजपचे मदार या एसटी कर्मचाऱ्याच्या बरोबर संप करत आहेत. प्रवाशांना वेठीस धरून चालणार नाही. प्रवासी यायचे बंद झाले तर एसटी कशी चालेल. यासाठी शिवसेना रस्त्यावर आली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी शिवसेनेने एसटी बसच्या माघे पुढे आपल्या गाड्या लावून एसटीला संरक्षण दिले आहे. सांगली जिल्हयात अनेक बस डेपो मध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने बस सेवा सुरु आहे. इस्लामपूर पाठोपाठ आज तासगाव आगारातून काही मार्गावरील बस सेवा सूरु तर इस्लामपूर – ताकारी बसवर रयत क्रांती संघटनेच्या एका कार्यकर्त्याकडून दगडफेक करण्यात आली.

संप मागं घ्या, अनिल परब यांचं आवाहन

मी महाधिवक्ता यांच्याशी बोलावं असं त्यांनी सांगितलं. महाधिवक्त्यांशी चर्चा करायला तयार असल्याचं मी सांगितलं आहे. मी एसटी संपकरी कर्मचाऱ्यांना संप मागं घेण्याचं आवाहन केलं. सरकार कुठल्याही कर्मचाऱ्याचं नुकसान करु इच्छित नाही. लोकांना पर्यायी व्यवस्था देण्याची जबाबदारी सरकार म्हणून आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागं घ्यावा,असं आवाहन अनिल परब यांनी केलं.

इतर बातम्या:

VIDEO: ‘बिरोबाच्या नावानं चांगभलं…’ आझाद मैदान दुमदुमले, कोणत्याही परिस्थितीत परबांच्या बंगल्यावर धडक देणारच; एसटी कामगार इरेला पेटले

महाधिवक्त्याशी बोलेन, पण तुम्ही संप मागे घ्या; अनिल परब यांचं एसटी कामगारांना पुन्हा आवाहन

Aurangabad with police protection fist st departs form Paithan Depot

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें