चांगली बातमी: प्रदूषण कमी करण्यासाठी औरंगाबादला पाच वर्षात मिळणार 87 कोटींचा निधी

केंद्र शासनाच्या पर्यावरण, वन आणि वातावरणीय बदल मंत्रालयातर्फे संवेदनशीलता आणि पुनरावलोकन कार्यशाळेचे आयोजन नुकतेच करण्यात आले. या कार्यशाळेत औरंगाबाद महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांचा सहभाग होता. मुंबईत यासंदर्भातला करार करण्यात आला.

चांगली बातमी: प्रदूषण कमी करण्यासाठी औरंगाबादला पाच वर्षात मिळणार 87 कोटींचा निधी
औरंगाबादेत प्रदूषण कमी करण्यासाठी राज्य व केंद्र सरकारकडून विशेष निधी
Follow us
| Updated on: Nov 24, 2021 | 5:54 PM

औरंगाबाद: केंद्र शासनाच्या राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमांतर्गत औरंगाबादला शहरात ‘स्वच्छ वायू'(Clean Air) साठी आणि प्रदूषणावर आळा घालण्यासाठी पुढचे 5 वर्षात टप्प्या-टप्प्यात 87 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. बुधवारी मुंबई येथे यासंदर्भातील करार करण्यात आला. मुंबई येथील केंद्र शासनाच्या पर्यावरण, वन आणि वातावरणीय बदल मंत्रालयातर्फे संवेदनशीलता आणि पुनरावलोकन कार्यशाळेचे आयोजन नुकतेच करण्यात आले. या कार्यशाळेत औरंगाबाद महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आणि औरंगाबाद स्मार्ट सिटीचे सीईओ आस्तिक कुमार पाण्डेय (Astik Kumar Pandey) यांचा सहभाग होता.

मुंबईच्या कार्यशाळेत मनपा प्रशासकांचे सादरीकरण

मुंबईतील या कार्यशाळेसाठी पश्चिम भारतातील गोवा, गुजरात, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र चे मोठे शहरांचे मनपा आयुक्तांनी भाग घेतला. या कार्यशाळेच्या 23 नोव्हेंबरचा सत्रात आस्तिक कुमार पाण्डेय यांनी औरंगाबाद शहराने राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली. यामध्ये शहरातील वायूप्रदूषण कमी करण्यासाठी राबविण्यात आलेल्या घनकचरा व्यवस्थापनाच्या 350 टन क्षमता असणाऱ्या तीन प्लांट्सची माहिती देण्यात आली. त्याचबरोबर सार्वजनिक ट्रान्सपोर्ट द्वारे सिटी बस सुरू करून शहरातील वैयक्तिक वाहनांद्वारे होणारे प्रदूषण टाळणे, सायकल ट्रॅकची निर्मिती करणे, शहरात वृक्षारोपण करणे, शहरात कारंजे बसवणे, रस्त्यावरील धूळ साफ करण्यासाठी स्वीपिंग मशीन, खाम नदी पुनरूज्जीवन, वर्टीकल गार्डन इत्यादी उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती यावेळी औरंगाबाद मनपा आयुक्तांनी दिली.

15 व्या वित्त आयोगाअंतर्गत करार

औरंगाबाद महानगरपालिकेने या कार्यशाळेत केंद्र सरकार आणि राज्य सरकार सोबत एक करार केला आहे. या करारांतर्गत औरंगाबाद शहरात स्वच्छवायू मिळविण्यासाठी नियमबद्ध पाऊले उचलण्यात येतील. पर्यावरण, वन आणि वातावरणीय बदल मंत्रालय केंद्र शासन, नगर विकास विभाग महाराष्ट्र शासन आणि औरंगाबाद महानगपालिके मध्ये 15 वा वित्त आयोग अंतर्गत हा करार आहे. या करारानुसार औरंगाबाद महानगरपालिकेला पाच वर्षांसाठी 87 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पाच वर्षात टप्प्या टप्प्यात हा निधी महानगरपालिकेला मिळेल. या कार्यशाळेसाठी केंद्रीय पर्यावरण, वन आणि वातावरणीय बदल मंत्री भूपेंदर यादव, महाराष्ट्र शासनचे पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे आणि महाराष्ट्र शासनचे पर्यावरण आणि वातावरणीय बदल राज्यमंत्री संजय बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

इतर बातम्या-

धक्कादायक: दोन मुलांसमोर जावयाकडून सासूवर चाकूचे वार, डोक्यात फरशी घालून खून, जालन्यात घटना

एमपी गजब है, लेडीज स्पेशल वाईन शॉप उघडणार, चार शहरात ‘ओ वुमनियाचा’ प्रयोग, वाईन फेस्टिव्हलही घेणार

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.