100 टक्के रोजगार देणाऱ्या पॉलिटेक्निकला विद्यार्थ्यांची गर्दी, औरंगाबाद जिल्ह्यात 3 हजार जागांसाठी 5 हजार अर्ज

ऑनलाइन आणि डिजिटल कामाचे महत्त्व कोरोनामुळे स्पष्टपणे अधोरेखित झाले. त्यामुळे भविष्याचा वेध घेत विद्यार्थी संगणक, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन तसेच मेकॅनिकल सिव्हिल इत्यादी अभ्यासक्रमांना प्राधान्य देत आहेत.

100 टक्के रोजगार देणाऱ्या पॉलिटेक्निकला विद्यार्थ्यांची गर्दी, औरंगाबाद जिल्ह्यात 3 हजार जागांसाठी 5 हजार अर्ज
प़ॉलिटेक्निकसाठी जिल्ह्यातील एकूण 13 महाविद्यावयांतील 3 हजार 910 जागांसाठी यावर्षी 5 हजार 260 अर्ज दाखल झाले आहेत.

औरंगाबाद: दहावी-बारावीनंतर उच्च शिक्षणाकरिता (Higher Education) आजच्या काळातील विद्यार्थी शंभर टक्के रोजगार मिळवून देणाऱ्या अभ्यासक्रमांची निवड करत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर पॉलिटेक्निकला (Diploma in Polytechnic Engineering) पसंती देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. औरंगाबाद जिह्ल्यात नुकतीच पॉलिटेक्निकच्या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली. जिल्ह्यातील एकूण 13 महाविद्यावयांतील 3 हजार 910 जागांसाठी यावर्षी 5 हजार 260 अर्ज दाखल झाले आहेत. रोजगाराभिमुख अभ्यासक्रम असल्याने विद्यार्थ्यांनी याला जास्त पसंती दिली आहे. पॉलिटेक्निकमध्ये तीन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर रोजगाराची संधी मिळत असल्याने तो अधिक व्यवहार्य अभ्यासक्रम समजला जातो.

दहावीनंतर केल्यास एक वर्ष कमी

दहावीनंतर पॉलिटेक्निकला प्रवेश घेतल्यास पॉलिटेक्निकची दोन वर्षे आणि पुढे इंजिनिअरिगंच्या दुसऱ्या वर्षात प्रवेश मिळतो. त्यामुळे इंजिनिअरिंगची चार वर्षे, असे एकूण सहा वर्षात इंजिनिअरिंगची पदविका आणि पदवी अभ्यासक्रम पूर्ण होतो. तर बारावीच्या विद्यार्थ्यांना बारावीपर्यंतची दोन, पॉलिटेक्निकची दोन आणि इंजिनिअरिगंची चार वर्षे असा सात वर्षात अभ्याक्रम पूर्ण होतो. विशेष म्हणजे बारावीच्या ज्या विद्यार्थ्यांचा सायन्स शाखेत फिजिक्स, केमेस्ट्री, बायोलॉजी असा ग्रुप असलेल्या विद्यार्थ्यांनाही पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश मिळतो. त्यासाठी मॅथ विषय असणे आवश्यक नाही.

22 सप्टेंबरपर्यंत पहिल्या फेरीची प्रवेश प्रक्रिया

तंत्र शिक्षण संचालयालयातर्फे पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सध्या सुरु आहे. पहिल्या फेरीचे जागा वाटप शनिवारी करण्यात आले. या वेळापत्रकानुसार, संस्था, शाखांकरिता ऑनलाइन पर्याय नोंदवण्यासाठी 16 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. दरम्यान, प्रक्रियेनुसार, पहिल्या फेरीचे जागावाटप शनिवारी जाहीर झाले. त्यानंतर प्रवेश स्वीकृती, प्रवेश निश्चितीची प्रक्रिया 19 ते 22 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करावी लागणार आहे. या वर्षी जिल्ह्यातील एकूण 3 हजार 910 जागांसाठी सुमारे 5 हजार 260 अर्ज प्राप्त झाले आहेत.

जिल्ह्यात किती कॉलेजमध्ये पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम?

औरंगाबाद जिल्ह्यातील एकूण महाविद्यालयांती एकूण प्रवेश क्षमता 13 हजार 910 अशी आहे. जिल्हाभरात एकूण 13 महाविद्यालये आहेत. यापैकी 2 शासकीय तर 11 खासदी महाविद्यालये आहेत. शासकीय महाविद्यालयातील प्रवेश क्षमता 750 तर खासगी महाविद्यालयांती प्रवेश क्षमता 3160 अशी आहे.

लॉकडाऊनमध्येही विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांत निवड

ऑनलाइन आणि डिजिटल कामाचे महत्त्व कोरोनामुळे आणखीच अधोरेखित झाले. भविष्याचा वेध घेत विद्यार्थी संगणक, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन तसेच मेकॅनिकल सिव्हिल इत्यादी अभ्यासक्रमांना प्राधान्य देत आहेत, अशी माहिती शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी दिली. तसेच गेल्या पाच वर्षांपासून शासकीय महाविद्यालयात 100 टक्के प्रवेश होतात. सीईटी न घेताच अभियांत्रिकीचे शिक्षण करण करण्याचा पॉलिटेक्निक हा उत्तम मार्ग असल्यामुळे क्लासेससाठीचे शुल्कही वाचते. पदवीच्या थेट द्वितीय वर्षासाठी प्रवेश मिळतो. म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थी रोजगाराची हमी देणाऱ्या या कोर्सला प्राधान्य देतात. लॉकडाउनच्या काळातही गेल्या वर्षी नामांकित कंपन्यांमध्ये 140 विद्यार्थ्यांना रोजगार मिळाल्याची माहिती, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य एफ. ए. खान यांनी दिली.

इतर बातम्या- 

BHEL Recruitment 2021: भारत हेवी इलेक्ट्रिकल्समध्ये इंजिनिअर्सची भरती, डिप्लोमाधारकांना देखील संधी

Job Alert | पुण्यात रोजगाराच्या सुवर्णसंधी, पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचा रोजगार मेळावा, असा करा अर्ज

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI