केवढी हिंमत? थेट स्मशानभूमीच्या जागेवरच प्लॉटिंग! औरंगाबादेत महापालिकेकडून कारवाई

औरंगाबाद महापालिकेने बेकायदा प्लॉटिंग करणाऱ्यांविरोधात मोठी मोहीम हाती घेतली असून गेल्या काही दिवसांपासून अतिक्रमणांवर कारवाई सुरु आहे. त्यातच शहरातील शाहनूरमिया भागातील स्मशानभूमीवरच अवैध प्लॉटिंग केल्याची माहिती उघड झाली. सोमवारी पालिकेने या ठिकाणी कारवाई केली.

केवढी हिंमत? थेट स्मशानभूमीच्या जागेवरच प्लॉटिंग! औरंगाबादेत महापालिकेकडून कारवाई
प्रातिनिधिक छायाचित्र

औरंगाबादः शहरातील महापालिकेच्या हद्दीत बेकायदा प्लॉटिंगचे (Illegal plotting) प्रकार नेहमीच घडतात. मात्र आता तर स्मशानभूमीच्या राखीव जागेवरदेखील प्लॉटिंग केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. शहरातील शहानूरवाडी भागात स्मशानभूमीसाठी राखीव असलेल्या दोन एकर जागेवर अशाच पद्धतीने बेकायदा प्लॉटिंग करण्यात आली होती. महापालिकेच्या (Aurangabad Municipal corporation) अतिक्रमणविरोधी पथकाने सोमवारी ही प्लॉटिंग निष्कासित करून स्मशानभूमीची जागा मोकळी केली.

भूमाफियांकडून बेकायदा प्लॉटिंगची सर्रास विक्री

गेल्या काही दिवसांपासून शहरात महापालिकेने अतिक्रमण विभागातर्फे अवैध प्लॉटिंगविरोधात मोहीम उघडली आहे. शहरात बहुतांश परिसरात नो डेव्हलपमेंट झोनमध्ये अनधिकृत प्लॉटिंगचे पेव फुटले आहे. भूमाफियांकडून बेकायदा प्लॉचिंग करून त्याची सर्रास विक्री केली जाते. आता तर स्मशानभूमीच्या जागेपर्यंतही भूमाफियांची मजल गेल्याचे दिसून आले आहे. शहानूरवाडी येथील सर्व्हे नंबर 42 मधील गट क्रमांक 1 मध्ये स्मशानभूमीसाठी राखीव जागा आहे. त्यावर अनधिकृत प्लॉटिंग करून प्लॉट विक्रीची व्यवसाय सुरु होता. मनपाच्या अतिक्रमण विभागाला त्याची माहिती मिळाली, त्यानंतर सोमवारी येथे कारवाई करण्यात आली.

जागा बळकावणाऱ्यांवर कारवाई होणार

महापालिकेने शहानूरवाडी येथे स्मशानभूमीसाठी जागा आरक्षित केलेी आहे. त्या जागेवर राजेंद्र वाणी, सुमित्रा वाणी, आशा पाचपुते आणि इतर काही जणांनी अनधिकृत प्लॉटिंग केली होती. त्याची विक्रीही सुरु झाल्याची माहिती मिळाल्यावर महापालिकेने येथए कारवाई केली. याप्रकरणी नियमानुसार पुढील कार्यवाही होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

इतर बातम्या-

सोमय्यांचे धक्के सुरूच, आणखी चार मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढणार; नावं गुलदस्त्यात ठेवल्याने तर्कांना उधाण

महापौर दालनातून टेंडरच्या फायली गायब, पालिकेतील वाझे कोण?; भाजप करणार एसीबीकडे तक्रार

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI