AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी ! आणखी 50-60 लाख लाडक्या बहिणींची नावे कापली जाणार? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ; आदिती तटकरेंच्या राजीनाम्याची मागणी

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने परभणीतून मुस्लिम उमदेवार दिला आहे. त्यावर अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शिंदेंच्या शिवसेनेने टीका केली म्हणून मी टीका करणारा नाही. त्यांच्यासारखी नालायक भूमिका घेणार नाही नाही. संघटनेसाठी काम करणाऱ्याला संधी दिली पाहिजे. परभणीच्या उमेदवाराचा इतिहास तपासाला पाहिजे. हा उमेदवार कसा आहे? हे तपासावेॉ, असं दानवे म्हणाले.

मोठी बातमी ! आणखी 50-60 लाख लाडक्या बहिणींची नावे कापली जाणार? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ; आदिती तटकरेंच्या राजीनाम्याची मागणी
ladki bahinImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 02, 2026 | 4:54 PM
Share

राज्यातील अत्यंत महत्त्वाच्या लाडकी बहीण योजनेबाबतची मोठी अपडेट समोर आली आहे. राज्यातील 80 लाख लाडक्या बहिणींना योजनेतून अपात्र ठरवण्यात आलं आहे. त्यामुळे खळबळ उडालेली आहे. या महिलांनी मुदतीच्या आधी केवायसी केलं नाही. त्यामुळे या महिला योजनेतून वगळल्या गेल्या आहेत. मात्र, या महिलांना पुन्हा एकदा केवायसी करण्याची संधी दिली जाणार आहे. कुणालाही वगळण्याचा आमचा हेतू नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे राज्याचे विरोधी पक्षनेते राहिलेले आणि ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी वेगळाच दावा केला आहे. राज्यातील आणखी 50 ते 60 लाडक्या बहिणींची नावे योजनेतून वगळली जाणार आहेत. ही योजना फक्त नावापुरतीच राहणार आहे, असा दावा अंबादास दानवे यांनी करून खळबळ उडवून दिली आहे.

ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेवरून सरकारला धारेवर धरलं. सरकार या योजनेत फसवणूक करत आहे. अदिती तटकरे यांनी राजीनामा दिला पाहिजे. 80 लाख महिला गळली आहे. केवायसीसह अनेक अटी लावून योजनेतून महिलांची कपात केली आहे. आणखी 50-60 लाख महिला या योजनेतून कमी होतील. यानंतर वर्षभरात राज्यातील लाडक्या बहिणी नावापुरत्या राहतील, असा दावाच अंबादास दानवे यांनी केली आहे.

शिवसेना नेस्तनाबूत होण्यास सुरू

शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांनी भाजपवर जोरदार हल्ला केला आहे. विधान परिषद निवडणुकीत मुलाला तिकीट न मिळाल्याने सत्तार भडकले आहेत. त्यावरही दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जो बुंद से गाई ओ हौद से नाही आती… शेवटी काय भूमिका मांडायच्या त्या त्यांनी मांडल्या आहेत. शिंदे सेनेत भाजपमध्ये काय लाथाड्या आहे ते समोर येत आहे. पालकमंत्री बोलू शकत नाहीत. सत्तार यांनी जी भुमिका मांडली ती कोणती अयोग्य मांडली आहे? आम्ही शिवसेना आहे म्हणत असाल तर ही शिवसेनेची जागा आहे. मी निवडून आलो होतो. मग यांना जागा का नाही मिळाली? शिवसेनेला भाजपने नेस्तनाबूत करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, असं दानवे म्हणाले.

अब्दुल सत्तार यांची अवस्था ममता बॅनर्जींसारखी झालीय का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. भाजपचा तसा स्वभाव आहे. नितीश कुमार यांचं काय झालं? गोव्यात देखील आणि अनेक राज्यात ज्या पक्षाला हाताशी धरलं त्या पक्षाला भाजपने संपवलं आहे, असा हल्लाच त्यांनी चढवला.

तर परत या…

ज्यांना शिंदेंच्या सेनेत राहून पश्चात्ताप होत आहे, त्यांनी परत यावे, असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. त्यावरही दानवे यांनी प्रतिक्रिया दिली. संजय राऊत यांनी जी भूमिका मांडली ती योग्य आहे. ज्यांना पश्चाताप होत असेल तर त्यांनी घेतलेल्या भूमिकेचा पुनर्विचार केला पाहिजे, असं ते म्हणाले.

Follow Us
बोगस SRA फॉर्म भरणं हाच मोदींनी दिलेला रोजगार! ठाकरेंचा भाजपवर घणाघात
Uddhav Thackeray | बोगस SRA फॉर्म भरणं हाच मोदींनी दिलेला रोजगार! उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात
दिशा सालियन प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही! ठाकरेंचं मोठं वक्तव्य
Aaditya Thackeray | दिशा सालियन प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही! आदित्य ठाकरेंचं मोठं वक्तव्य; राम कदमांचा थेट सवाल
मारहाणीची कबुली देणारा हिंदुत्ववादी कार्यकर्ता मोकाट कसा? CJP आक्रमक
Delhi | मारहाणीची कबुली देणारा हिंदुत्ववादी कार्यकर्ता मोकाट कसा? CJP आक्रमक; दिल्लीच्या संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर मोठं आंदोलन
हल्ल्यानंतर विद्यानंद बापट आक्रमक; DJ बंदीच्या मागणीवर म्हणाले...
Vidyanand Bapat | भावना म्हणजे हात-पाय दुखण्यासारख्या नाहीत! हल्ल्यानंतर विद्यानंद बापट आक्रमक; DJ बंदीच्या मागणीवर म्हणाले...
मीरा भाईंदरमध्ये मांस विक्री बंदीवरून राजकीय रणकंदन! 8 दिवस बंदी
मीरा भाईंदरमध्ये मांस विक्री बंदीवरून राजकीय रणकंदन! भाजपच्या नगरसेवकांची 8 दिवस बंदीची मागणी; मनसेचा तीव्र विरोध
जरांगे पाटील आणि सरकारची बोलणी पुन्हा फिस्कटली? 58 लाख कुणबी...
Manoj Jarange Patil | जरांगे पाटील आणि सरकारची बोलणी पुन्हा फिस्कटली? 58 लाख कुणबी प्रमाणपत्रांवर ठाम; GR झाल्याशिवाय माघार नाहीच
फडणवीस दिल्लीत जाणार; राऊतांचा मोठा दावा; भाजपच्या अंतर्गत घडामोडींवर
Sanjay Raut | फडणवीस दिल्लीत जाणार; संजय राऊतांचा मोठा दावा; भाजपच्या अंतर्गत घडामोडींवर सूचक विधान
मत व्यक्त केलं म्हणून हल्ला? बापटांवरील हल्ल्यावर पवारांचा संताप
Sharad Pawar | मत व्यक्त केलं म्हणून हल्ला? विद्यानंद बापटांवरील हल्ल्यावर शरद पवारांचा संताप; हा लोकशाही आणि मूलभूत अधिकारांवर हल्ला
मुंबईसाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन! पुढील 10 वर्षांत मुंबई...
CM Fadnavis | मुंबईसाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन! पुढील 10 वर्षांत मुंबई झोपडपट्टीमुक्त करणार; तिसऱ्या मुंबईचेही संकेत
जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?