पाच महिलांची हातचलाखी, बसमध्ये बँक मॅनेजरच्या बॅगेतून अडीच लाख लांबवले, पुढे काय घडले?

दत्ता कानवटे

| Edited By: |

Updated on: Aug 14, 2021 | 11:42 AM

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 5 लाख रुपयांची रक्कम घेऊन मॅनेजर बसने प्रवास करत होता. यावेळी बसमध्ये बसलेल्या पाच महिला प्रवाशांनी हातचलाखी केली आणि त्यातील अडीच लाख रुपयांची रक्कम काढून घेतली

पाच महिलांची हातचलाखी, बसमध्ये बँक मॅनेजरच्या बॅगेतून अडीच लाख लांबवले, पुढे काय घडले?
औरंगाबादमध्ये बँक मॅनेजरचे पैसे चोरणाऱ्या महिला जेरबंद
Follow us

औरंगाबाद : पाच महिलांनी हातचलाखी दाखवत बँक मॅनेजरच्या बॅगेतून अडीच लाख रुपयांची रक्कम लंपास केली. मॅनेजरला वेळीच हा प्रकार लक्षात आला आणि त्याने समयसूचकता दाखवत कंडक्टरला ही गोष्ट सांगितली. त्यानंतर पोलिस स्टेशन गाठत मॅनेजरने तक्रार नोंदवली आणि शेतीच्या बांधावरून पळून जाणाऱ्या महिलांकडे घबाड सापडले. औरंगाबादमध्ये हा थरारक प्रसंग घडला.

नेमकं काय घडलं?

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 5 लाख रुपयांची रक्कम घेऊन मॅनेजर बसने प्रवास करत होता. यावेळी बसमध्ये बसलेल्या पाच महिला प्रवाशांनी हातचलाखी केली आणि त्यातील अडीच लाख रुपयांची रक्कम काढून घेतली. ही रक्कम घेऊन या महिला गोळेगाव या गावात उतरल्या, त्यावेळी मॅनेजरच्या हा प्रकार लक्षात आला.

शेतीच्या बांधावरुन महिलांचा पळून जाण्याचा प्रयत्न

मॅनेजरने तात्काळ ही गोष्ट बस वाहकाच्या कानावर घातली. त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनीही तातडीने तपासाची चक्र फिरवली आणि शेतीच्या बांधावरुन पळून जाणाऱ्या महिलांना गाठले. त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे अडीच लाख रुपयांची रक्कम आढळून आली.

पोलिसात गुन्हा, महिला जेरबंद

त्यानुसार औरंगाबादमधील अजिंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घडलेल्या प्रकारामुळे प्रवासात अत्यंत सतर्क आणि सावध राहणं किती जास्त गरजेचं झालं आहे, हे अधोरेखित आहे. त्याच बरोबर बँक मॅनेजर, बस वाहक, बस चालक आणि पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेचंही सर्वत्र कौतुक केलं जात आहे.

नवी मुंबईत चोरीसाठी आलेला चोरटा घरातच झोपला

दुसरीकडे, चोरीसाठी घरात घुसलेला चोरटा त्याच ठिकाणी झोपी गेल्याने हाती लागल्याची घटना नवी मुंबईत शुक्रवारी पहाटे घडली. यावेळी त्याला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर काही वेळातच अस्वस्थ वाटू लागले. यामुळे त्याला रुग्णालयात घेऊन जात असतानाच मृत्यू झाला. त्याचा मृत्यू घटनास्थळी झालेल्या मारहाणीत झाला की पोलिसांच्या मारहाणीत, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट होऊ शकले नसल्याने या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

चोरी करायला गेला आणि तिथेच झोपला, चोप देऊन उठवला, पोलिसात नेताच भलतंच घडलं

बड्या पोलिस अधिकाऱ्याच्या दीड कोटींचं लाच प्रकरण, तपासात उकललं विवाहबाह्य संबंधातून झालेल्या एका हत्येचं गूढ

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI