AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nanded | वाळू तस्करांना पोलिसांचं अभय? सामाजिक कार्यकर्त्याचा आरोप, ट्रक सोडवण्यासाठी आलेल्या पोलिसांचा व्हिडिओ व्हायरल

नांदेडः नदीकाठच्या गावांमधून मोठ्या प्रमाणावर वाळू तस्करी होत असते आणि बहुतांश वेळा या तस्करांना (Sand Smuggling) पोलिसांचेच अभय असते, असा आरोप केला जातो. नांदेड (Nanded city) येथील एका सामाजिक कार्यकर्त्याने (Social Worker) असाच एक खळबळजनक आरोप केला आहे. देगलूर, बिलोली येथून मोठ्या प्रमाणावर वाळू तस्करी होत आहे. महसूल, पोलीस आधिकारी याविरोधात काहीच कारवाई करत नसल्याने […]

Nanded | वाळू तस्करांना पोलिसांचं अभय? सामाजिक कार्यकर्त्याचा आरोप, ट्रक सोडवण्यासाठी आलेल्या पोलिसांचा व्हिडिओ व्हायरल
Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Apr 22, 2022 | 2:03 PM
Share

नांदेडः नदीकाठच्या गावांमधून मोठ्या प्रमाणावर वाळू तस्करी होत असते आणि बहुतांश वेळा या तस्करांना (Sand Smuggling) पोलिसांचेच अभय असते, असा आरोप केला जातो. नांदेड (Nanded city) येथील एका सामाजिक कार्यकर्त्याने (Social Worker) असाच एक खळबळजनक आरोप केला आहे. देगलूर, बिलोली येथून मोठ्या प्रमाणावर वाळू तस्करी होत आहे. महसूल, पोलीस आधिकारी याविरोधात काहीच कारवाई करत नसल्याने सामाजिक कार्यकर्त्यानेच पुढाकार घेण्याचा प्रयत्न केला. त्याने वाळूचे ट्रक अडवून ठेवले. मात्र काही वेळातच ते ट्रक सोडवण्यासाठी स्वतः पोलीस अधिकारी तेथे दाखल झाले. पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यादरम्यान यावेळी बरेच वाद झाले. या वादाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी पैसे घेऊन हे ट्रक सोडवण्याचं काम केल्याचा पुरावा देत असूनही पोलिसावर कारवाई होत नाहीये, यामुळे सामाजिक कार्यकर्त्याने संताप व्यक्त केला आहे.

व्हिडिओमध्ये काय दिसतंय?

सदर व्हिडिओ हा देगलर तालुक्यातील हाणेगाव येथील असल्याचा दावा ककरण्यात आला आहे. व्हिडिओत सामाजिक कार्यकर्त्याने काही वाळूचे ट्रक अडवल्याचे दिसून आले. ते सोडवण्यासाठी पोलीस अधिकारी आल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यानं केला आहे. तुम्ही पैसे घेऊन हे ट्रक सोडवण्यासाठी आल्याचा आरोप कार्यकर्ता करतोय. तर पोलीस अधिकारीदेखील सामाजिक कार्यकर्त्यावर तुम्ही पैसे खाण्यासाठी ट्रक अडवलेत, असा आरोप करत आहेत. पैशांसाठी कायदा विकू नका, एवढं लाचार होऊ नका, अशी विनंती सामाजिक कार्यकर्ता करतोय. तर याविरोधात निवेदन देणार असं तो म्हणतोय. पोलीस अधिकारीदेखील मला धमकी देऊ नका, तुम्हाला ट्रक अडवण्याचा अधिकार काय, असा सवाल करत आहेत. सामाजिक कार्यकर्ता आणि पोलिसांमधील हा वाद बराच वेळ चालू राहिला. त्यानंतर पोलीस तेथून निघून जाताना व्हिडिओमध्ये दिसतंय.

पुरावा देऊनही कारवाई होणार का?

वाळू तस्करीचे ट्रक सोडवण्यासाठी स्वतः पोलीस आल्याचा पुरावा या व्हिडिओद्वारे देण्यात आला आहे, आता तरी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, असा सवाल सामाजिक कार्यकर्त्याने केला आहे. सोशल मीडियातून हा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे सामान्य नागरिकांमधूनही पोलिसांवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

इतर बातम्या–

कुठलंही वक्तव्य करताना समाजाचा अपमान होताना काळजी घ्यायलाच हवी- अजित पवार

छत्तीसगडमधून कोळशाची खाण घेण्याचा विचार सुरू; कोळसा टंचाईवर अजित पवार यांची माहिती

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.