AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिस्तीत करा बाप्पांचे विसर्जन, गणेश मूर्ती- निर्माल्य विहिरींत टाकू नका, औरंगाबाद महापालिकेचे आवाहन

औरंगाबाद: कोरोना विषाणूच्या संसर्गाचे प्रमाण काहीसे कमी झाल्यामुळे यंदा सार्वजनिक गणेशोत्सवात उत्साहाचे (Ganesh Festival, Aurangabad) वातावरण दिसून आले. सर्व निर्बंधांचे पालन करत शक्य होईल, तेवढे उपक्रम गणेश मंडळांतर्फे घेण्यात आले. तसेच घरोघरीही बाप्पांचे यथासांग आणि जल्लोषात पूजन करण्यात आले. आता रविवारच्या गणपती विसर्जनाच्या दिवशीदेखील नागरिकांनी पर्यावरण आणि सामाजिक आरोग्याची काळजी घेतच बाप्पांचे विसर्जन करावे, असे […]

शिस्तीत करा बाप्पांचे विसर्जन, गणेश मूर्ती- निर्माल्य विहिरींत टाकू नका, औरंगाबाद महापालिकेचे आवाहन
गणेश मूर्ती संकलनासाठी औरंगाबाद महापालिकेतर्फे 40 ठिकाणी व्यवस्था केली आहे.
| Edited By: | Updated on: Sep 18, 2021 | 7:33 PM
Share

औरंगाबाद: कोरोना विषाणूच्या संसर्गाचे प्रमाण काहीसे कमी झाल्यामुळे यंदा सार्वजनिक गणेशोत्सवात उत्साहाचे (Ganesh Festival, Aurangabad) वातावरण दिसून आले. सर्व निर्बंधांचे पालन करत शक्य होईल, तेवढे उपक्रम गणेश मंडळांतर्फे घेण्यात आले. तसेच घरोघरीही बाप्पांचे यथासांग आणि जल्लोषात पूजन करण्यात आले. आता रविवारच्या गणपती विसर्जनाच्या दिवशीदेखील नागरिकांनी पर्यावरण आणि सामाजिक आरोग्याची काळजी घेतच बाप्पांचे विसर्जन करावे, असे आवाहन औरंगाबाद महापालिकेकडून (Aurangabad Municipal Corporation) करण्यात येत आहे. बाप्पांच्या मूर्ती विसर्जनासाठी महापालिकेकडून विशेष व्यवस्थाही करण्यात आली आहे.

40 ठिकाणी संकलन 11 ठिकाणी विसर्जन केंद्र

महापालिकेतर्फे दरवर्षी शहराच्या विविध भागात गणेश विसर्जनासाठी व्यवस्था केली जाते. यंदाही 11 ठिकाणी विहिरींची साफ-सफाई करून ज्या विहिरीत पाणी नसेल तिथे पाणी टाकत, ही व्यवस्था करण्यात आली. कोरोना काळात नागरिकांनी थेट विसर्जन विहिरींवर न जाता विविध झोनमध्ये नियोजित मूर्ती संकलन केंद्रांवरच मूर्ती जमा कराव्यात असे आवाहन करण्यात आले आहे. महापालिका एकत्रितपणे गणेशमूर्तींचे विसर्जन करेल, असे मनपातर्फे सांगण्यात आले आहे.

निर्माल्यही विहिरीत टाकू नका

संपूर्ण गणेशोत्सव आणि गौरींच्या उत्सवात जमलेले निर्माल्य स्वीकारण्याची व्यवस्थाही महापालिकेने केली आहे. त्यामुळे गणेशभक्तांनी निर्माल्यदेखील विहिरींमध्ये न टाकता महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे जमा करावेत. निर्माल्यावर प्रक्रिया करून त्यापासून खत तयार केले जाणार आहे.

मूर्तींची संकलन केंद्रे कुठे?

महापालिकेने झोन निहाय गणेश मूर्तींची संकलन केंद्रे नियोजित केली आहेत. ती पुढीलप्रमाणे झोन 1– खडकेश्वर महादेव मंदिराजवळ, माजी नगरसेवक श्री पांडे यांच्या घराजवळ बेगमपुरा, संत विश्राम बाबा शाळेजवळ नंदनवन कॉलनी, वाणी कॉम्प्लेक्स जवळ पढेगाव, गांधी पुतळ्या जवळ. झोन 2– शहागंज चमन,गुलमंडी पार्किंग,सावरकर चौक, समर्थनगर. झोन 3- साखरे मंगल कार्यालय समोर,पोलीस कॉलनी सभागृह जवळ. झोन 4- शॉपिंग कॉम्प्लेक्स जवळ टीव्ही सेंटर चौक, सेंट्रल जेल समोर जाटवाडा रोड,स्मृतिवन गार्डन जवळ हर्सूल तलाव,एसबीओ शाळेजवळ मयुर पार्क. झोन 5- रामलीला मैदान एन 7,राजीव गांधी मैदान एन 5,चिकलठाणा आठवडी बाजार,गरवारे स्टेडियम. झोन 6- मुकुंदवाडी बस स्टॉप ,कामगार चौक एन 2 ,डॉ आंबेडकर चौक चिकलठाणा,रामनगर चौक एन 2 सिडको. झोन 7- कॅनॉट गार्डन परिसर टाऊन सेंटर, गजानन महाराज मंदिर चौक गारखेडा, विजयनगर चौक,सूतगिरणी चौक,विसर्जन विहीर शिवाजी नगर,हनुमान चौक,हनुमान नगर पाणी टाकी जवळ,रिद्धी सिद्धी हॉल समोर उल्का नगरी. झोन 8- 106 कंचनवाडी/नक्षत्रवाडी विठ्ठल रुक्मिणी मंदिर, 110 मयूरबन कॉलनी ,जबिंदा लॉन्स जवळ,114 देवळाई चौक देवळाई, 114,115 देवळाई सातारा,रेणुकामाता मंदिर कमान, 115 सातारा ,सातारा मुख्य गाव विसर्जन विहीर. झोन 9- ज्योतिनगर अंतर्गत पाण्याच्या टाकी जवळ,क्रांती चौक अंतर्गत संत एकनाथ रंग मंदिर,उस्मानपुरा, रेल्वे स्टेशन मुख्य रस्ता कर्णपुरा

(Special Arrangement done by Aurangabad Municipal corporation for Ganesh idol visarjan ceremony)

इतर बातम्या- 

Aurangabad Weather: मराठवाड्यात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता, वाचा औरंगाबादसह कोणते जिल्हे यलो अलर्टवर?

खबरदार साक्ष फिरवलीत तर!!! हत्या प्रकरणी फितूर आई-मुलावर खटला भरण्याचे औरंगाबाद सत्र न्यायालयाचे आदेश

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.