AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोणगावात घरफोडी करणारे चोरटे सीसीटीव्हीत बिनधास्त फिरताना कैद, नागरिकांनी आवाज देताच पसार झाले…

चोरांनी घर फोडून घरातील 50 हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. त्यानंतर गावात फिरत असताना गावातील दोन नागरिकांनी चोरट्यांना आवज दिला. तेव्हा त्यांनी नागरिकांना दगड फेकून मारले आणि त्या ठिकाणाहून पसार झाले.

डोणगावात घरफोडी करणारे चोरटे सीसीटीव्हीत बिनधास्त फिरताना कैद, नागरिकांनी आवाज देताच पसार झाले...
चोरी केल्यानंतर गावात बिनधास्त फिरणारे चोर सीसीटीव्हीत कैद
| Edited By: | Updated on: Nov 10, 2021 | 4:48 PM
Share

औरंगाबादः दिवाळीच्या काळात औरंगाबाद शहरासह जिल्ह्यातील (Aurangabad crime) ग्रामीण भागातदेखील अनेक ठिकाणी घरफोडी आणि चोरीच्या घटना घडल्या. गंगापूर तालुक्यातील (Gangapur Talika) डोणगाव येथेही चोरट्यांनी एक घर फोडून 50 हजार रुपये किंमतीचे दागिने लंपास केले. मात्र या घरात चोरी करणारे चोर रस्त्यावरील सीसीटीव्हीत कैद झाले असून त्यात ते गावातील रस्त्यांवरून बिनधास्त फिरताना दिसत आहेत. चोरी करण्यासाठी आलेले हे एवढे बिनधास्त कसे फिरू शकतात, याबद्दल गावकऱ्यांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

लोकांनी आवाज दिला तेव्हा दगड फेकले

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या अधिका माहितीनुसार, डोणगाव येथील अजय सागरे यांचे घर चोरट्यांनी फोडले. चोरांनी घर फोडून घरातील 50 हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. त्यानंतर गावात फिरत असताना गावातील दोन नागरिकांनी चोरट्यांना आवज दिला. तेव्हा त्यांनी नागरिकांना दगड फेकून मारले आणि त्या ठिकाणाहून पसार झाले. या घटनेची माहिती गावकऱ्यांनी शिल्लेगाव पोलीस ठाण्याला दिली. त्यानंतर उपनिरीक्षक अमोल ठाकणे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

शॉर्टसर्किटमुळे 20 एकर जळून खाक

अन्य एका घटनेत विहामांडवा येथून जवळ असलेल्या शिवारात विजेच्या लोंबकळलेल्या तारेचे एकमेकांवर घर्षण होऊन आग लागली. या आगीत अठरा ते वीस एकर ऊस जळून खकाक झाला. यात संबंधित शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. महावितरण कंपनीने व महसूल विभागाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त उस उत्पादक शेतकरी दत्तू खराद, अरुण खराद, विनायक खराद, अनुसया गायकवाड आदींनी केली आहे.

इतर बातम्या-

औरंगाबादेत नवाब मलिक यांचा पुतळा जाळला, मलिक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची भाजप नेत्यांची मागणी

उद्या सरसंघचालक औरंगाबादेत, 10 वर्षांनंतर प्रथमच मोठा दौरा, प्रचारकांच्या भेटीगाठी, आढावा बैठकांचे आयोजन

एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच, मराठवाड्यात 120 जणांचे निलंबन, नादेंडमध्ये सर्वाधिक 58 जणांवर कारवाई

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.