AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

छगन भुजबळ यांच्यावर शस्त्रक्रिया, आता प्रकृती कशी? पहिला फोटो समोर

मनसेचे नेते बाळा नांदगांवकर यांनी मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली आहे. भुजबळ यांच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया झाली आहे. त्यामुळे भुजबळ लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना नांदगांवकर यांनी केली आहे.

छगन भुजबळ यांच्यावर शस्त्रक्रिया, आता प्रकृती कशी? पहिला फोटो समोर
bala nandgaonkar and chhagan bhujbalImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Dec 13, 2025 | 7:24 PM
Share

Chhagan Bhujbal : राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांची प्रकृती सध्या बिघडलेली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. 28 ऑक्टोबर रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी भुजबळ यांना नियमित तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, असे सांगण्यात आले होते. सध्या त्यांच्यावर नुकतेच शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या शस्त्रक्रियेनंतर भुजबळ यांची प्रकृती कशी आहे, असे विचारले जात होते. असे असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा माजी गृहराज्यमंत्री बाळा नांदगांवकर यांनी भुजबळ यांची भेट घेतली आहे. भुजबळ यांचा शस्त्रक्रियेनंतर एक फोटो समोर आला आहे.

भुजबळ यांच्यावर करण्यात आली शस्त्रक्रिया

बाळा नांदगांवकर यांनी आज (13 डिसेंबर) छगन भुजबळ यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. याच भेटीचा एक फोटो त्यांनी इन्स्टाग्राम या सोशल मीडिया खात्यावर अपलोड केला आहे. या फोटोमध्ये छगन भुजबळ दिसत असून बाळा नांदगांवकर त्यांच्याची संवाद साधत आहेत. भुजबळ यांच्या हातावर सलाईनची सुई लावलेली दिसत आहे. बाळा नांदगांवकर यांनी भुजबळ यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना केली आहे. या भेटीनंतर आमच्यात मतभेद आहेत पण मनभेद नाहीत, असेही मत बाळा नांदगांवकर यांनी इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केले आहे.

भुजबळ यांनी व्यक्त केला आनंद

‘राज्यातील ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ साहेब यांची आज भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. त्यांच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया झाली. यावेळी त्यांच्याबरोबर जुन्या आठवणींना उजाळा दिला. शिवसैनिक म्हणून काम करत असताना भुजबळ साहेब हे आमचे ज्येष्ठ नेते होते. दोघांमधील सारखा दुवा म्हणजे “ठाकरे परिवार”. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने त्यांनीही मनापासून आनंद व्यक्त केला,’ अशी भावना बाळा नांदगांवकर यांनी व्यक्त केली.

आम्ही दोघेही भावूक झालो

‘त्यांची आणि माझी राजकीय विचारधारा नंतरच्या काळात वेगळी असली तरी ज्येष्ठ नेते म्हणून त्यांच्याबद्दल मनात आदरच आहे. वयाच्या या टप्प्यात ही त्यांचा सगळ्यात मोठा गुण म्हणजे त्यांचा लढवय्या स्वभाव. अनेकदा प्रवाहाविरोधात जाऊन लढणारे भुजबळ साहेब वयाच्या या टप्प्यात ही लढवय्ये आहेत. बाळासाहेब ठाकरे व एकूणच ठाकरे परिवारातील जुन्या आठवणी, आधीच्या काळातील केलेला संघर्ष त्यातून मिळविलेले यश, राजकारणाची बदलेली शैली याबद्दल ते मनापासून व्यक्त झाले. हॉस्पिटलमध्ये असले आणि शस्त्रक्रिया झाली तरी एकदम मनापासून ते व्यक्त होत होते. आम्ही दोघेही जुन्या गोष्टी आठवून भावूक झाले,’ असेही नांदगांवकर यांनी इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे.

आपल्या राज्याची संस्कृती आहे की आपल्या इथे राजकीय विरोधक असतात पण दुश्मन नव्हे. कारण राजकारणात मतभेद असावे पण मनभेद नसावे. ही संस्कृती हळूहळू लुप्त होत आहे असे सध्या जाणवते आहे, अशी खंत व्यक्त करत राजकारणातील धडधडती तोफ म्हणून ओळखले जाणारे भुजबळ साहेब हे लवकरात लवकर स्वस्थ होऊन परत सक्रीय व्हावे, अशी प्रार्थना नांदगांवकर यांनी केली आहे.

अजित पवारांच्या निधनावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया...
अजित पवारांच्या निधनावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया....
फडणवीस, शिंदेंकडून सुनेत्रा पवारांचं सांत्वन; बारामतीत अलोट गर्दी
फडणवीस, शिंदेंकडून सुनेत्रा पवारांचं सांत्वन; बारामतीत अलोट गर्दी.
अजित पवारांच्या निधनाने राज्यावर शोककळा! छगन भुजबळही बारामतीत दाखल
अजित पवारांच्या निधनाने राज्यावर शोककळा! छगन भुजबळही बारामतीत दाखल.
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेच्या वेळीचा आणखी एक व्हिडीओ समोर
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेच्या वेळीचा आणखी एक व्हिडीओ समोर.
अजितदादांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी कुठे ठेवलं जाणार?
अजितदादांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी कुठे ठेवलं जाणार?.
मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदे बारामतीच्या रुग्णालयात दाखल
मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदे बारामतीच्या रुग्णालयात दाखल.
Ajit Pawar Death : अजित पवार यांच्या सासरवाडीत कडकडीत बंद!
Ajit Pawar Death : अजित पवार यांच्या सासरवाडीत कडकडीत बंद!.
अजितदादा वाचतील असं वाटलेलं; पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया
अजितदादा वाचतील असं वाटलेलं; पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया.
विमान अपघाताचं प्राथमिक कारण काय? मुरलीधर मोहोळांनी दिली माहिती
विमान अपघाताचं प्राथमिक कारण काय? मुरलीधर मोहोळांनी दिली माहिती.
अश्रूंचा बांध फुटला! बारामतीत पोहोचताच सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर
अश्रूंचा बांध फुटला! बारामतीत पोहोचताच सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर.