AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनाचे मृत्यूतांडव, अंबाजोगाईत एकाचवेळी 28 जणांवर अंत्यसंस्कार

त्यामुळे नागरिकांनी निदान आता तर गर्दी टाळून कोरोनापासून दूर झाले पाहिजे. (Beed Ambajogai 28 people funeral)

कोरोनाचे मृत्यूतांडव, अंबाजोगाईत एकाचवेळी 28 जणांवर अंत्यसंस्कार
प्रातिनिधीक फोटो
| Updated on: Apr 26, 2021 | 9:28 AM
Share

बीड : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. दुसरीकडे कोरोनाबाधित मृतांचा आकडाही वाढत चालला आहे. बीडमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका फटका बसत आहे. बीडच्या अंबाजोगाईत 30 जणांचा काल एका दिवसात मृत्यू झाला आहे. यातील 28 जणांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. राज्यात अनेक ठिकाणी अशाप्रकारे एकाचवेळी अनेकांवर अंत्यसंस्काराची वेळ आली. त्यामुळे कोरोनाचे हे मृत्यूतांडव अनेकांना धडकी भरवत आहे. (Beed Ambajogai 28 people funeral at one time Horrible Corona situation)

अंबाजोगाईत 30 जणांचा मृत्यू

राज्यात कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन जाण्याचे प्रमाण सर्वाधिक असले तरी मृत्यूचे प्रमाण देखील वाढत चालले आहे. काल अंबाजोगाईत 30 जणांचा मृत्यू झाला. यातील 28 जणांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले तर दोन मृतांचा दफनविधी करण्यात आला. त्यामुळे दिवसेंदिवस कोरोना बळीची संख्या वाढत चालल्याने भय इथले संपत नाही, अशीच परिस्थिती होत चालली आहे.

बीडच्या अंबाजोगाईत एकाच वेळी 28 जणांना अग्नीडाग दिल्याने स्मशानभूमी नि:शब्द होऊन हळहळ व्यक्त केली जात आहे. पुन्हा एकदा अंबाजोगाईत असे भयावह चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे नागरिकांनी निदान आता तर गर्दी टाळून कोरोनापासून दूर झाले पाहिजे. अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाण्याची मोठी शक्यता आहे.

अंबाजोगाईत एकाच सरणावर 8 जणांचा अंत्यविधी

याआधीही अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ कोव्हिड सेंटरमध्ये (Swami Ramanand Tirth covid center) कोरोनाने मृत्यू झालेल्या 8 जणांवर एकाच सरणावर अंत्यविधी करण्याची दुर्दैवी वेळ अंबाजोगाई नगर पालिकेवर आली. अंबाजोगाई नगर पालिकेने पठाण मांडवा रस्त्यावरील कोव्हिड रुग्णांच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणी एकाच सरणावर या 8 जणांना अग्निडाग दिला. यामध्ये 1 महिला असून सर्व मयत रुग्ण 60 वर्षापुढील आहेत.

राज्यभरात अनेक ठिकाणी अशाप्रकारे अंत्यसंस्कार

कोरोनाने महाराष्ट्रात इतकं थैमान घातलंय की राज्यात अनेक ठिकाणी अशाप्रकारे एकाचवेळी अनेकांवर अंत्यसंस्काराची वेळ आलीय. त्यामुळे कोरोनाचं हे मृत्यूतांडव अनेकांना धडकी भरवत आहे. अनेकांना आपल्या जवळच्या लोकांना यात गमवावं लागत आहे. (Beed Ambajogai 28 people funeral at one time Horrible Corona situation)

संबंधित बातम्या : 

VIDEO: यवतमाळमध्ये एकाच वेळी 26 चिता पेटल्या, आप्तेष्ट स्पर्शही करायला तयार नसताना अंत्यसंस्कार करणाऱ्यांची बातमी

पूजेनिमित्त एकत्र येणारं जाधव कुटुंब 15 दिवसात कोरोनाने संपवलं, पुणेकरांनो सावध व्हा

VIDEO : एकाच वेळी 23 जणांचा अंत्यसंस्कार, अंतिम दर्शनासाठी नातेवाईकांची पायपीट, उस्मानाबादेत मनाला चटका लावणारं दृश्य

स्मशानभूमी खचाखच, रहिवाशी कॉलनीतच मृतदेहावर अंत्यसंस्कार, भयावह स्थिती

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.