AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठी बातमी… वाल्मिक कराड अखेर पोलिसांसमोर शरण, व्हिडीओ शेअर करत दावा काय?

बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर सध्या राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

सर्वात मोठी बातमी... वाल्मिक कराड अखेर पोलिसांसमोर शरण, व्हिडीओ शेअर करत दावा काय?
| Edited By: | Updated on: Dec 31, 2024 | 12:39 PM
Share

Beed Valmik Karad Surrender : बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर सध्या राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या घटनेचा सर्वच स्तरावरुन निषेध केला जात आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचे बोलले जात आहे. वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा आहे, असा आरोप संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांकडून केला जात आहे. त्यातच आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. बीडच्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड अखेर सीआयडीला शरण आला आहे. पुण्यात त्याने सीआयडी समोर शरणागती पत्करली आहे. आता सीआयडी त्याची कसून चौकशी करणार असून त्याला कोर्टात हजर केले जाणार आहे.

वाल्मिक कराडने शरणागती पत्करण्यापूर्वी एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्याने एक मोठा दावा केला आहे. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन 22 दिवस उलटले आहेत. या प्रकरणातही वाल्मिकी कराडचं नाव घेतलं जात आहे. त्याअनुषंगाने आता त्याची चौकशी होणार आहे. वाल्मिक कराड याच्यावर खंडणीचे आरोप आहेत. त्यांच्यावर इतरही गंभीर आरोप आहेत. पण खंडणी प्रकरणात तो सीआयडीला हवा होता. त्यामुळे सीआयडीने 9 पथकं तयार केली होती. त्याचा महाराष्ट्रासह कर्नाटकात शोध घेण्यात येत होता.

वाल्मिक कराड हा उज्जैनला गेल्याचंही सांगितलं जात होतं. त्यामुळे पोलीस आणि सीआयडी अलर्ट झाले होते. अखेर आज त्याने स्वत:हून पुणे पोलीस आणि सीआयडीसमोर शरणागती पत्करली आहे. त्यामुळे आता त्याची कसून चौकशी होणार असून तपासातून अधिक माहिती समोर येणार आहे.

वाल्मिकवर हत्येचा गुन्हा दाखल करावा

वाल्मिक कराड हा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड असल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणात वाल्मिक कराडविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा. त्याला हत्याकांडातील आरोपी करण्यात यावं, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. त्यामुळे सीआयडी वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा दाखल करणार का? असा सवाल करण्यात येत आहे.

वाल्मिकचा व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, शरणागती पत्करण्यापूर्वी वाल्मिकीने एक व्हिडीओ शेअर  करून आपला संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंध नसल्याचा दावा केला आहे. मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी सीआयडीसमोर हजर होत आहे. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करावी, फाशी द्यावी. राजकीय कारणासाठी माझं नाव घेऊ नये. या प्रकरणात मी जर दोषी असेल तर मला शिक्षा द्यावी, असं वाल्मिक कराडने म्हटलं आहे.

Follow Us
जय पवार यांची प्रतिक्रिया:निर्णय बारामतीकरांचा, विरोधकांना खुलं आव्हान
जय पवार यांची प्रतिक्रिया:निर्णय बारामतीकरांचा, विरोधकांना खुलं आव्हान.
बारामती पोटनिवडणुकीत ठाकरेंचा पाठिंबा कोणाला? मोठी माहिती समोर!
बारामती पोटनिवडणुकीत ठाकरेंचा पाठिंबा कोणाला? मोठी माहिती समोर!.
दमानिया यांच्या खुलाशांवरून जयश्री खाडिलकर यांनी व्यक्त केला संताप
दमानिया यांच्या खुलाशांवरून जयश्री खाडिलकर यांनी व्यक्त केला संताप.
बारामती पोटनिवडणुकीवरून मुख्यमंत्री फडणवीस यांचं आवाहन काय?
बारामती पोटनिवडणुकीवरून मुख्यमंत्री फडणवीस यांचं आवाहन काय?.
दमानियांकडे कॉल्स डिटेल्स आल्या कुठून? राऊतांनी या मंत्र्याच्या....
दमानियांकडे कॉल्स डिटेल्स आल्या कुठून? राऊतांनी या मंत्र्याच्या.....
ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही?
ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही?.
शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील, सिल्व्हर ओकवर खलबतं सुरू
शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील, सिल्व्हर ओकवर खलबतं सुरू.
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग.
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू.
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण.