कोरोना लस घ्या, दाढी-कटिंग मोफत, लसीकरण जनजागृतीसाठी बीडच्या सलून चालकाचा भन्नाट उपक्रम

बीड जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजारांच्या वर कोरोनाचे बळी ठरले आहेत. अशात अफवेला बळी पडलेले अनेक जण लसीकरणासाठी पाठ फिरवत आहेत. Ravindra Gaikwad Corona Vaccine

कोरोना लस घ्या, दाढी-कटिंग मोफत, लसीकरण जनजागृतीसाठी बीडच्या सलून चालकाचा भन्नाट उपक्रम
रवींद्र गायकवाड

बीड: जिल्ह्यात कोरोना महामारीने हाहाकार घातला आहे. बीड जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजारांच्या वर कोरोनाचे बळी ठरले आहेत. अशात अफवेला बळी पडलेले अनेक जण लसीकरणासाठी पाठ फिरवत आहेत. लसीकरण करून घेण्यासाठी आष्टीच्या कडा येथील एका सलून चालकाने पुढाकार घेतला आहे. सलून चालक रवींद्र गायकवाड याने लसीकरण करून घेणाऱ्या व्यक्तीची दाढी आणि कटिंग मोफत करण्याची घोषणा केली आहे. (Beed saloon owner Ravindra Gaikwad offer free shaving and hair cutting offer those who taken two dose of corona vaccine)

रवींद्र गायकवाड काय म्हणाले?

बीड जिल्ह्यातील कडा शहरात सलून चालक रवींद्र गायकवाड 20 वर्षांपासून सलून व्यवसाय करतात. कोरोना विषाणू संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा त्यांनाही फटका बसला आहे. ते म्हणतात कोरोना संसर्गाच्या काळात हजारो माणसांचा जीव गेला आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी लस घेणं आवश्यक आहे. लस घेणं गेरजेचं असतानाही काही लोक लस घेत नाहीत, असं रवींद्र गायकवाड म्हणाले.

मोफ दाढी आणि मोफत कटिंगची योजना कुणासाठी?

आष्टी तालुक्यातील कडा शहरात रवींद्र गायकवाड यांनी मोफत दाढी आणि मोफत कटिंगची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. रवींद्र गायकवाड यांनी ही योजना कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या व्यक्तींसाठी असेल, अशी माहिती दिली.

बीड अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्यात

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना अन लॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. बीड जिल्हा तिसऱ्या टप्प्यात अनलॉक झाला आहे. जवळपास 65 दिवसांनंतर जिल्ह्यातील निर्बंध हटवण्यात आले. दुसऱ्या लाटेमध्ये छोट्या व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला, त्यामुळे राज्य सरकारने पॅकेजची घोषणा करून आधार द्यावा, अशी मागणी व्यापारी वर्गातून केली जातेय.

वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचा उपक्रम

कोरोना माहामारीत बीड जिल्ह्यात रक्ताचा मोठा तुटवडा आहे. रुग्णांना तात्काळ रक्त उपलब्ध व्हावे यासाठी आष्टी येथील तारकेश्वर गडाचे मठाधिपती महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तब्बल 53 रक्तदात्यांनी रक्तदान करून वाढदिवस साजरा केला.

संबंधित बातम्या:

म्युकरमायकोसिसच्या उपचाराचा खर्च 100 पट कमी होणं शक्य, पुण्याच्या डॉ. समीर जोशींनी सांगितला पर्याय

अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन सज्ज राहा, मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश

Beed saloon owner Ravindra Gaikwad offer free shaving and hair cutting offer those who taken two dose of corona vaccine

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI