“भाजपची जिथं विचारधारा रुजली, तेथील पराभवाचं चिंतन करू”; पोटनिवडणुकीच्या निकालाचा या नेत्यानी कारण सांगितलं

भाजपच्या बालेकिल्ल्यातच महाविकास आघाडीच्या उमेदवाराने धूळ चारल्यामुळे कसबा पोटनिवडणुकीचा निकाल आता भाजपच्या वर्मी लागला आहे.

भाजपची जिथं विचारधारा रुजली, तेथील पराभवाचं चिंतन करू; पोटनिवडणुकीच्या निकालाचा या नेत्यानी कारण सांगितलं
Follow us
| Updated on: Mar 02, 2023 | 11:29 PM

बीड : कसबा पोटनिवडणुकीमध्ये भाजपचा पराभव झाला आहे, मात्र ज्या मतदार संघात भारतीय जनता पक्षाचा विचार रुजला होता, त्या मतदार संघात पराभव का झाला आहे त्याचे आम्ही आत्मचिंतन करू असं स्पष्ट मत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले. भाजपच्या माजी आमदार आणि नेत्या पंकजा मुंडे यांनी या निवडणुकीचं विश्लेषण करताना त्यांनी या मतदार संघाचा इतिहास सांगितला.

कसबा मतदार संघ हा भाजपचा बालेकिल्ला होता, मात्र कित्येक वर्षानंतर या मतदार संघामध्ये भाजपचा पराभव झाला आहे.

याच मतदार संघामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी भाजपला विजयी करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली होती. तरीही या मतदार संघामध्ये भाजपचा पराभव झाला आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींपासून ते अगदी कार्यकर्त्यांपर्यंत या पराभवाचे आत्मचिंतन करणार असल्याच पंकजा मुंडे यांनी सांगितेल.

पंकजा मुंडे यांनी कसबा पोटनिवडणुकीविषयी बोलताना त्यांनी या निवडणुकीत झालेला पराभव आम्ही स्वीकारला आहे. मतदारांच्या भावनांची आम्ही कदर करतो असं सांगत भविष्यात मतदारांना सोयी सुविधा देण्याबरोबरच विकासासाठी आम्ही प्रयत्न करु असंही त्यानी यावेळी अश्वासन दिले आहे.

कसबा पोटनिवडणूक ही महाविकास आघाडी आणि शिंदे फडणवीस सरकार असल्यामुळे शिवसेना आणि भाजपसाठी ही प्रतिष्ठेची बाब बनली होती. या निवडणुकीच्या प्रचारासाठी सरकारमधील अर्ध्यापेक्षा अधिक मंत्री हे कसबा पोटनिवडणुकीसाठी ठाण मांडून बसले होते.

देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपच्या अनेक नेत्यांनी या ठिकाणी सभा घेऊन अश्वासनांचा पाऊस पाडला होता. या निवडणुकीच्या प्रचारावेळी रवींद्र धंगेकर यांनी भाजपवर पैसे वाटल्याचा गंभीर आरोप केला होता. तसेच पैसे वाटणाऱ्या नेत्यांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली होती

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.